Bluepad | Bluepad
Bluepad
पाऊस धारा.......
S
Shraddha Ambre
29th Jun, 2020

Shareतुझ्या बरसण्याची आस ह्या मनाला
तप्त धरणीला तुझा ओलावा
रिमझिम झरझर बरस तू आता
दरवळू दे सुंगध ओल्या मातीचा
काय काय घडले इथे
कसे आणि काय सागूं तुला
तुझाच आसरा हया क्षणाला
माझ्या अति क्षिणलेल्या मनाला
कुठलेसे विषाणू सर्वत्र विखुरले
अन माणसाचे जगणेच हरवले
अनामिक भिती उराशी
आणि काळजी उदयाच्या जगण्याची
दोष तरी दयायचा इथे कोणाला
माणसाच्याच कर्माचा हा पसारा सारा
तुझ्या येण्याने दिसतील वाटा
धुसर झालेल्या त्या रंग छटाना
नाहून निघू दे तुझ्या दवाने
हळूच घे मग तुझ्या कलेने
हिरवळ छान दाटू दे चोहीकडे
वाहून जाऊ दे जे थबकले इथे
तुझा गारवा झोबूं दे अगांला
शहारू दे या तनामनाला
अधिर झालेल्या या मनाची
सागंड घाल तुझ्या धारांशी
जीव डोळ्यात येऊन वाट पाहे तुझी
मनी ध्यास तुझ्या येण्याची
अतं बा पाहू नको रे माझा......
रिमझिम झरझर बरस तू आता.......


17 

Share


S
Written by
Shraddha Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad