Bluepadएका आईच मनोगत.......
Bluepad

एका आईच मनोगत.......

S
Shraddha Ambre
28th Jun, 2020

Share

काय चाललयं काय आजच्या जगात ?? एक तरी न्यूज चँनल बघितल की एकच बातमी चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार, एका युवतीवर सामुहीक अत्याचार. अनेक क्षेत्रांतून काम करणाऱ्या अनेक स्त्रियांच लैंगिक शोषण.......पेपरात तर एक तरी बातमी बलात्काराची असतेच. शी.....आणि असल्या घाणेरड्या समाजाची मी एक घटक आहे. अरे हो मीच काय पण तूम्ही सगळे या समाजाचे एक घटक आहात. कारण माणसांनीच समाज बनतो. स्वताचीच खूप लाज वाटते. एकविसाव्या शतकातले पुढारलेले 'आम्ही' असे म्हणणारे जरा आजूला बाजूला बघा. आपल्या पोरी बाळी शेजारच्या लेकी बाळी सुरक्षित आहेत का ते ? आज मी दोन मुलींची आई आहे ते म्हणतात ना " वैरी ना चिंते ते मनी चिंते" मनात सतत नको नको ते विचार येतात. आजची स्थिती अशी आहे की, आपल्या मुली रस्त्यावरून एकट्या फिरू शकत नाही. शाळा, कॉलेज, क्लास साठी बाहेर पडल्या की, घरी येईपर्यंत जीवात जीव नसतो. की कुठल्या लाडंग्याची माझ्या मुलीवर नजर पडली तर. आणि आता काय तर शाळा, कॉलेज ही सुरक्षित नाहीत. विद्येच्या मंदिरात लहान मुंलीवर असे कृत्य करून त्यालाही काळीमा लावत आहेत. किती भंयकर आहे हे सगळं.......ह्याचं गांभीर्य कसं कुणालाच कळू नये. अरे आपली मुलं जन्मायच्या आधी पासून आपलं प्लँनिग चालू होतं की त्यांच्या सुरक्षित जन्मासाठी कुठलं हॉस्पिटल निवडायचं ते........ते जन्मल्यावर त्यांच्या संगोपनासाठी जगातली सगळ्यात चागंली वस्तू वापरायचा प्रयत्न करतो. त्यांच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा काढून त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी चागंल्या शाळेची निवड करतो. आपल्या नंतर त्यांना काही कमी पडू नये यासाठी एल. आय. सी. पॉलिसी काढतो. मग सुज्ञान आणि जबाबदार पालक म्हणून त्यांच्या सुरक्षतेसाठी काहीच करूस वाटत नाही. माझ्या सारख्या ब-याच आया असतील ज्या काहीतरी करायला हवं असं स्वतः पुरतीच बोलत असतील. पण आता असं चालणार नाही. आपल्या पोरी बाळीकडे वाकडया नजरेनं बघणा-याचे डोळेच काढून घेतले पाहीजे. हयांना फाशी ही एकमेव शिक्षा व्हायला पाहीजे. ही शिक्षा पण कमीच आहे. असहय शरीर वेदना देवून आयुष्यातून उठवणा-या नराधामांना एकाच झटकेत इहलोकी पाठवणे ही शिक्षाही काहीच नाही हया नराधमांना तर असहय वेदना देवून तीळ तीळ मरण दिलं पाहीजे. आपल्या देशात असा कडक कायदा कानूनच नाही. गुन्हा घडतो, केस फाईल होते आणि मग कित्येक वर्षे विषय चघळून चोथा करून फार तर वर्षाची शिक्षा देवून फाईल बंद होते. आणि मग असे घाणेरडं कृत्य करायला ही माणसं मोकळी. ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायला हवी. अजूनही वेळ गेली नाही आहे. सगळया पालकांनी एकत्र या. याकडे गांभीर्याने बघा. आणि सरकारला अशा कडक शिक्षा देण्याबाबत निक्षून सांगीतल पाहीजे. तर आणि तरचं असे निच कृत्य होण्यापासून थांबेल. आणि आपल्या मुली बिनधास्तपणे ख-या अर्थानं रणरागिणी म्हणून समाजात वावरू शकतील. हे लिखाण लिहण्या मागचं एकच कारण एक तरी ठिणगी पेटून ह्या नीच कृत्याला आळा बसायलाच हवा..........

17 

Share


S
Written by
Shraddha Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad