Bluepadअबोल....जवळीक.
Bluepad

अबोल....जवळीक.

डॉ अमित.
डॉ अमित.
28th Jun, 2020

Share

अबोल....जवळीक.


तू अशी जवळ बस ...
भले बोलू नकोस काही...
फक्त हात हातात घे
स्पर्श बोलतील सारे मनातले..
जे सांगायचे आहे ते नी
कळेल मला ते ही
जे शब्दांनाही आहे अव्यक्त
भावनेचा भार पहा मग
कसा होईल हलका क्षणातं
तू अशी जवळ बस....भले बोलू नकोस काही..


तू अशी जवळ बस...
भले बोलू नकोस काही
फक्त माझ्या डोळ्यातं बघ
दिसेल तुला प्रेमच प्रेमं
जे आजपर्यंत साठलेलं
तुला झालेल्या त्रासानं
नकळत अश्रूंनी हे दाटलेलं
पापण्यांना झाले ओझे आता
वाट मोकळी होवू दे क्षणातं
तू अशी जवळ बस...भले बोलू नकोस काही..


तू अशी जवळ बस...
भले बोलू नकोस काही
फक्त खांद्यावर डोकं ठेव
होशील एकदम मोकळी
भरून निघेल मनातली
रिक्त असलेली पोकळी
देवून जाईल हे स्वर्ग सुख
तुझ्या नी माझ्याही मनाला
अवेळी ही सही वेळ येईल क्षणातं
तू अशी जवळ बस...भले बोलू नकोस काही..


तू अशी जवळ बस
भले बोलू नकोस काही
माझ्या श्वासांना घे तुझ्या
श्वासांशी एकरूप करून
होतील की नाही मग पहा
दोन देह हे एकजीव
धडधड हृदयाची ही भासेल
जसं एकच संगीत सुरेल
आसमंत ही स्वर्गरूप होईल क्षणातं
तू अशी जवळ बस...भले बोलू नकोस काही..


डॉ अमित.

16 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad