Bluepadप्रेम आंधळं असतं.. पण इतकं ..!!!!
Bluepad

प्रेम आंधळं असतं.. पण इतकं ..!!!!

अकल्पिता
अकल्पिता
29th Nov, 2021

Share

(भाग -१)

माधुरी आणि अमित दोघे नुकतेच नवीन घरात शिफ्ट झाले होते. अमितच्या नौकरीमुळे त्यांना सारखं शिफ्ट व्हावचं लागत. त्यामुळे दर तीन वर्षांनी नवीन गाव, नवीन ठिकाण त्यांना अनुवभवता येत.
माधुरीला आता या सगळ्याची सवय झाली असल्यामुळे ती आता पटकन नवीन ठिकाणी adjust होत असते. अमितला पण याचं काही tension नसतं की तिला करमेल का किंवा काही अडचण तर येणार नाही ना... ?
एव्हाना माधुरीची शेजारी - पाजारी चांगलीच ओळख झाली होती. नम्रता बरोबर तिची चांगली गट्टी जमली होती.अमित आॅफिसला गेला की नम्रता आणि माधुरीचा दिवस एकत्रित जात असे.हळूहळू माधुरीची आसपास देखील चांगली ओळख होऊ लागली.
त्यांच्या काॅलनीमध्ये एक कुंटूब होते की जे खुप शांत आणि सगळ्यांशी मिसळून राहत. माधुरीला खुप कौतुक वाटल, ती नम्रताला त्या कुंटूबाबद्दल बोलली की खरचं किती छान सगळे मिळून मिसळून राहतात. आई,वडील,भाऊ,वहिनी,बायको सगळे एकमेकांना समजून घेत असतील जे आजच्या जगात खुप कमी पाहायला मिळते.
नम्रताने फक्त स्मितहास्य केले आणि निघून गेली. माधुरीला नम्रता यांवर काहीच का बोलली नाही हे कळत नव्हतं. नंतर पण जेव्हा जेव्हा माधुरी त्या कुंटुबा बद्दल बोलत असत तर नम्रता काहीच बोलत नसतं.
माधुरीला समजत नसे नेमक काय झालं आणि नम्रता त्यांच्याबद्दल काहीच का बोलत नाही.
एके दिवशी न राहून माधुरीने नम्रताला विचारले की असं काय झालं आहे की तू त्या कुंटूबाविषयी बोलायच टाळत आहेस. बऱ्याच दिवसापासून मी पाहत आहे, की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. आज तुला सांगावेच लागेल.
माधुरी हे सगळं बोलत असतानाच नम्रताच्या डोळ्यात पाणी येऊ लागले...
नम्रता त्याच स्वरात बोलू लागली ,” काय आणि कसं सांगू ? कुठूनं सुरूवात करु? “

आता माधुरीलाही काही समजेनासे झाले. ती नम्रताचे बोलणे ऐकून घेत होती.
नम्रता पुढे म्हणाली ,” हे जितकं साधं सोपे दिसत आहे तसं मूळीच नाही. सात वर्ष झाले असतील आता त्या गोष्टींला. तुला जे दुरून सगळे गुण्यागोविंदाने राहताना दिसत आहेत ते फक्त दिसण्यापुरत आहे. त्यांच खरं रुप खुप वेगळं आहे.”
नम्रता काही बोलणार तेव्हढ्यात माधुरी म्हणाली,”असं कसं बोलु शकतेस तु? तुझा काही तरी गैरसमज झाला असेल. मी पाहिल आहे ना. आता परवाच तर त्यांनी त्यांच्या धाकट्या सूनेचा वाढदिवस साजरा केला ना. मी गेले होते तेव्हा तर मला काहीच विपरीत असं दिसलं नाही. सगळं काही अलबेल होत.”
नम्रता म्हणाली,” तुला जे दिसतं त्यांवर तु बोलत आहेस पण जे घडून गेले आहे ते जर तु ऐकलेस तर तुला ह्या लोकांचा तिरस्कार वाटेल.”
”असं काय केलं आहे या लोकांनी “ माधुरी म्हणाली ” ह्यांनी कोणाचा खून तर नाही ना केला??” असं म्हणून माधुरी हसु लागली.
”हो!!! केला आहे.” नम्रता असं सांगून तिच्या घरी निघून गेली.

(क्रमश:)

(तुम्हांला काय वाटतं? नक्की काय झालं असेल. अभिप्राय अपेक्षित... कमेंट्स मध्ये नक्की सांगा)


1 

Share


अकल्पिता
Written by
अकल्पिता

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad