Bluepadकुछं ना करो......कुछं भी ना करो.
Bluepad

कुछं ना करो......कुछं भी ना करो.

डॉ अमित.
डॉ अमित.
27th Jun, 2020

Share

कुछं ना करो......कुछं भी ना करो.


कुछं ना करो....कुछं भी ना करो.
अरेच्चा मी हे काय सांगतोय तुम्हाला..मला नेमकं झालं तरी काय? असेचं वाटतंय ना तुम्हाला?
कुछं तो सब्र करो...म्हणजे थोडस थांबा,सर्व काही सांगतो.
हो खरंच थोडंसं थांबा..तुम्ही जे करताय,जे तुमचं रूटीन आहे... त्यातही थोडंसं थांबा.
बऱ्याचदा होतं असं की आपण एकसारखं काही काम करत राहतो पण त्यातून म्हणावं तसं आपल्या हाती काही लागत नाही.आपली उत्पादन क्षमता जणू काही पूज्य(पूज्य म्हणजे पूजनीय नव्हे... शून्या लाही पूज्य म्हणतात बरका😃😃) झाली आहे असे वाटत राहते...असे जेंव्हा होते तेंव्हा थोड निवांत बसा.अगदी काहीचं करू नका.कधी कधी काहीचं न करणे हे ही बरेच काही करून जावू शकते.
जेंव्हा आपण अगदी काहीचं करत नसतो तेंव्हा आपला मेंदू एका वेगळ्याच ऊर्जेने जणू रिचार्जच होत असतो..नवनवीन कल्पना त्याला सुचू शकतात,झालेल्या चुका त्याला सापडू शकतात, निसटणारे दुवे तो पकडू शकतो,न सुटणाऱ्या काही गाठी तो सोडवू शकतो आणि महत्वाचे म्हणजे मनातला आतला आवाजही तो ऐकू शकतो.
हे जेंव्हा घडत असते तेंव्हा आपलं काहीच न करणं ही बरचं काही करू शकतं.

शुन्यालाही असते किंमत..
येता दुसऱ्या अंकांनंतर
काहीच न करणे हे ही करते
कधी कधी जादू छू-मंतर..


एक छोटीसी गोष्ट सांगतो.दोन मित्र रोज जंगलात लाकडे तोडण्यासाठी एकत्रचं जात असतात आणि संध्याकाळी एकत्रचं लाकडे तोडून परत येत असतात.मात्र एका जवळ तोडलेली भरपूर लाकडे असतात तर दुसऱ्या मित्राची फार थोडीच लाकडे तोडलेली असतात.दोघेही तितक्याच वेळ मेहनत करून परत येत असतात.असे काही दिवस रोज होत असते.जेंव्हा तो आपल्या दुसऱ्या मित्राला याचे कारण विचारतो तेंव्हा तो मित्र म्हणतो...मी थोडा वेळ काम झालं की थोडी विश्रांती घेतो, थोडं निवांत बसलो तेंव्हा मला असे लक्षात आले की झाडे तोडून तोडून कुऱ्हाडीची धार बोथट झाली असेल.मग मी त्यानंतर थोडा वेळ कुऱ्हाडीला धार करतो आणि परत नव्या जोमाने कामाला लागतो.या थोड्या काहीच न करण्याच्या वेळात माझी कुऱ्हाड आणि माझा मेंदू दोन्ही पुन्हा जास्त सक्षम होतात आणि माझी जास्त लाकडे तोडली जातात.
ही छोटीशी गोष्ट जरी असली तरी हे अगदी खरं आहे आणि शास्त्रीय दृष्ट्या देखील हे सिद्ध झाले आहे.

सोचता हुं कभी कभी की
मैं कुछं भी ना सोचू
चाहता हुं कभी कभी की
मैं कुछं भी ना करू...
तेंव्हा मित्रांनो वेळ योग्य नाही असे जेंव्हा तुम्ही म्हणता,एखादे काम व्यवस्थित होत नाही असे जेंव्हा तुम्हाला वाटते..तेंव्हा तुम्हीही काहीच न करता थोडा ब्रेक घ्या...हा ब्रेक तुमचा ब्रेन नक्कीच बूस्ट करेल आणि तुम्हाला तुमच्या इच्छित ध्येया पर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत करेल.
चला तर मग असेच कधी मधी हे जीवन जगताना असचं गुणगुणत थोडा ब्रेक घेवूयात...

कुछं ना करो...कुछं भी ना करो.🙏

डॉ अमित लाड.
शुक्रवार.
२६ जून २०२०.

17 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad