Bluepadपहिला पाऊस..
Bluepad

पहिला पाऊस..

Sangieta Devkar
Sangieta Devkar
26th Jun, 2020

Share

हवेहवेसे आणि नकोनकोसे क्षण देणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात हमखास येतात. "पाऊस" ही त्यापैकी एक. मनातल्या खोल कप्प्यातील आठवणीना भिजवणारा.पाऊस म्हटले तर हवाही असतो आणि म्हणटल तर कुठल्या तरी वेदना जागविणारा ही असतो".  उन्हाच्या झळानी तप्त झालेली वसुंधरा अगदी आतुरतेने पावसाची वाट पहात असते. तो पहिला वहिला पाऊस,तो मातीचा मस्त गंध मनात खोलवर भरून घ्यावसा वाटतो. नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो.एक लिंबू झेलूबाई, दोन लिंब झेलूसारखीच एक गार वेचू बाई दोन गारा वेचू, अशी उन्मादावस्था  पहिल्या पावसात येते.एखाद्या पाहुण्याची किंवा मित्रा ची आपण  बराच वेळ वाट पहात असतो पण काही कारणाने त्याच येणं रद्द होत . तसच काहीसं पावसाचं होत तो येणार येणार म्हणून आपण वाट पहात असतो. पहिला पाऊस त्या पावसात भिजण्याचा आनंद लुटायचा असतो पण तो वाट पाहून ही येत नाही तेव्हा आपली निराशा होते मग अचानक एक दिवस तो येतो कधी धो धो बरसतो तर कधी हळुवार येतो. पहिल्या पावसाच्या वेळी आभाळ भरून येत जणू आकाशाच्या निळ्या गाभाऱ्यात सावळ रूप साकार उभं राहत. झाडे वेली आपल्या फांद्या पसरवून उंच धरून जणू त्या पहिल्या पावसाच स्वागत करत असतात. वाऱ्याच्या तालावर जणू झाड वेलींची पाने सळसळ करतात  तेव्हा जणू ती पाने टाळ मृदुंग वाजवत आहेत असा भास होतो. कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच ! असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो.आला पाऊस मातीच्या वासात गं मोती गुंफीत मोकळ्या केसात गं.(शांता शेळके)असा हा पाऊस..तो कसाही असला तरी मराठी कवितांच्या पुस्तकांच्या पानावर कवीच्या शब्दातून तो बरसत राहिला आहे आणि पुढेही बरसेल. संगीता देवकर..प्रिंट &मिडिया रायटर.


19 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad