या विषयावर लिहायचं ठरवलं.... कारण उद्या पितृ दिन....खरंतर माझ्या भावना शब्दात मांडणं जमत नाही मला कारण त्या भावना माझ्याच कडे मला जतन करायचंय ... कारण बाबां बद्दल मी बोलण्या इतकी नक्कीच मोठी नाही.आपल्या सगळ्या साठी सगळं काही करतात.पण आपल्याला आनंदी पाहुन ते समाधानी होतात. कीतीही टेंशन असलं, तरी चेहरा मात्र सतत हसतमुख.जरा चिडचिड झाली तरी त्या मागचं कारण कधी कळू देत नाही.आपण यशस्वी झालो की तो आनंद त्यांच्या डोळ्यात दिसतो.आपण खचलो की आपला हात कधी सोडत नाही.कितीही काही. ही झाल तरी ते आहेत पाठीशी हे नेहमी माहिती असतं. तरी मला आपलं सतत वाटत...
बाबा माझा सतत हरवतो
बाबा रागावतो, चिडतो
तरी प्रेमाने जवळ घेतो
आई रागवते तर
तोंच तर वाचवतो
बाबा माझा सतत हरवतो
मुलाचा आधार असतो तो
मुलीचा श्र्वास असतो तो
सगळ्यांना आनंदाने जपतो
बाबा माझा सतत हरवतो
तो वारंवार सुधारतो
कधी तोच आपल्याला सावरतो
तरीही वाईट वाटून न घेता
उराशी घेऊन कवटाळतो तरी
बाबा माझा सतत हरवतो
बाबा आम्ही तुम्हाला त्रास देतो
हट्टही करतो
तरी तुमच्या मनातल
नाही ओळखू शकतो
सगळयां साठी झूरंतो
बाबा माझा सतत हरवतो.
््
मनातून कधी खचतो
मुखावर कधी हसतो
कधी कधी तो रडतो
पण तोच हरवणारा बाबा
मला मात्र सापडत़ो
कारण तेव्हा
मी मुलगी आणि तो बाबा असतो
बाबा माझा सतत हरवतो
- जान्हवी राजेश काळी