BluepadDon't worry be happy 😀😊
Bluepad

Don't worry be happy 😀😊

J
Janhavi kali
17th Jun, 2020

Share

नुकत्याच घडलेल्या सुशांत सिंग राजपूत चा आत्महत्ये नंतर प्रत्येक जण जागरूक झालंय कारण त्याचा सोबत जे झालय ते आपल्या जवळच्या व्यक्तींन सोबत कधीही न व्हाव ही प्रत्येकाची इच्छा असते. किमान काही दिवस तरी आपण आपल्या माणसांची अधिक काळजी घेतोय.

एखादा प्रसंग जो आपल्या जीव्हारी‌ लागत जस सतत येणारे failures , किंवा कोणी खूप गोष्टी मनात ठेवणे तर सहजा डीपरेशन येत . पण आता असा विचार करा नां......की हा मुद्दा जो पर्यंत ताजा आहे तो पर्यंतच आपण खूप काळजी घेतो, आपल्या मित्र - मैत्रीणीना आश्र्वासन देतोय की आपण त्यांच्या सोबत नेहमी आहोत काहीही सांगायचं असेल तर तुम्ही हमखास सांगू शकता. जरा महिनाभर जाऊं द्या .......... आपण कसं या गोष्टीला विसरतो ते बघा.
आता आपण अशा वळणावर आहोत की आपण आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकां साठी उपलब्ध आहोत पण जरा विचार करा नां.... जेव्हा आपणच त्या माणसाला एकटं टाकतो तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल??? आता आपलं Routine हळूहळू सुरू ह़ोतय पण एकदाका आपण व्यस्त झालो की ज्या मित्रांना आपण आता सांगितलंय की ....... U can share anything I am there always... त्याचं मित्रांना आपण आठवडा- आठवडा फोन देखील करत नाही..... कारण आपण. Busy झालोय😒😒😒😒
म्हणून माझं म्हणय की जरी तुम्ही व्यस्त झाला तरी आपल्या माणसांच्या नेहमी संपर्कात राहा कारण नोकरी एक दिवस संपेल पण आपली माणसं जर दूर गेली तर ती पुन्हा येणार नाही.

आपण कधी विचार केलाय का .... की आपण रागवतो तेव्हा नक्की काय करतो. सोप्या भाषेत सांगायच तर आपल्या 👅 जीभेवरचा ताबा सूटतो..आपला संताप संताप होतो... रागाच्या भरात आपण काय बोलून जातो हेच आपल्याला कळत नाही... रागाच्या भरात आपण सहज बोलून जातो...' हिला सांगून काही उपयोग नाही' किंवा "डोकं फिरलय".... नेमकं काय होतं आपण असे अनेक वाक्य सहज बोलून जातो आणि राग शांत झाल्यावर विसरूनही जातो .

पण जर एखाद्या व्यक्तीने ते मनावर घेतल ...तर मग अचानक एकटेपणा येतो.... आपल्याच माणसांन कडून आलेला "एकटेपणा",🙇🙇 आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कदाचित जे बोलतो ते दुसऱ्याला लागू शकतं म्हणून राग ताब्यात आणि शब्दांचा जपून वापर .... हे एकमेव औषध आहे आपल्या लोकांना एकटं पाडायचं नसेल तर...‌
शेवटी काय? आपण फक्त काळजी घेऊ शकतो दुसऱ्यांची . शेवटी काय माणसाचा स्वत:शी होणारा संवाद फक्त त्याचा त्यालाच माहीती असतो . कारण कधी तो संवाद खूप छान तर कधी वाईट.. आणि वाईट असेल तर त्याच्यावर आपणच त्येचावर मार्ग काढून ते मिळवतो.

एक मला समजलेली गोष्ट की माणसांनी व्यक्त व्हायला हव!!.... मग ते कुठल्याही मार्फत असू शकत कोणी रडत , कोणी हसत , कोणी बोलत, क़ोणी चिडत तर कोणी आपले विचार कागदावर लिहून ठेवतो... जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा आपल मन हलकं होतं आणि मग डीपरेशन वगैरे येणारच नाही. प्रत्येक गोष्टी कडे जर आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल तर वाईट विचार येणारच नाही ....... नाही का??

काय मग कसा वाटला लेख??...🤔🤔🤔

- जान्हवी राजेश काळी
््च ््क््््क्््क््््क््क््््क्््क््््््क््््क्््क््््क््क््््क्््क्््््क््््क्््क््््क््क््््क्््क््् ् ््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््
् ् ््््््््््््््््््््््््््््््््् ् ् ्््््््््््््््््््््््््््््््््

14 

Share


J
Written by
Janhavi kali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad