Bluepadस्वातंत्र्याचा सूर्य...!
Bluepad

स्वातंत्र्याचा सूर्य...!

Hemant Dinkar Sawale
Hemant Dinkar Sawale
30th Nov, 2021

Share

#स्वातंत्र्याचा_सूर्य...!

ये उठं, पुस डोळ्यातील अश्रू
फेकून दे साखळदंड हातापायातले
संस्कृती बिंस्कृती च्या भानगडीत पडू नको अजिबात
सरळ वाट धर अवघड असली तरीही
थांबू नकोस, कारण पल्ला आहे खूप लांब
वाटेत भेटेतील विषकन्या
त्यांना बाजूला सार
विजा पडतील तेव्हा हिरव्यागार झाडाकडे दुर्लक्ष कर
अत्तरे शिंपडलेल्या रस्त्यांना मागे सार
मोहू नकोस अजिबात परीस स्पर्शाला
पाय ठेचाळलेत तरीही चालत राहा
चालत रहा उन्हातानातून
आणि शेवटी शोधून काढ की
कोणी लावले ग्रहण स्वातंत्र्याच्या सूर्याला...?

#हेमंत_दिनकर_सावळे

20 

Share


Hemant Dinkar Sawale
Written by
Hemant Dinkar Sawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad