Bluepadभारतातील
Bluepad

भारतातील राष्ट्रवाद

तेजल
25th Jun, 2020

Share

रवींद्र नाथ टागोर यांच्या मते, भारताची खरी अडचण राजकीय नसून सामाजिक आहे. खरंतर, ही समस्या सर्व राष्ट्रांची आहे. पश्चिमेकडील राजकारणाने तेथील मूल्यांवर वर्चस्व गाजवले आहे आणि भारतही त्याचे अनुकरण करत आहे.
टागोर सांगतात, भारताने खूप संकटातून काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. आपला देश विभिन्न वंशांसोबत एकता शोधत असतो. इथले संत, जसं की नानक, कबीर आणि चैतन्य इ. एकाधिश्र्वराची शिकवण देतात.
ते पुढे म्हणतात," संपूर्ण जग विज्ञानाच्या साहाय्याने एक बनत आहे. आणि असा क्षण येतो जेव्हा आपण समजतो की, एकतेचे मूळ हे अराजकीय आहे." मानवाचा इतिहास हा एकच इतिहास आहे. सर्व राष्ट्रीय इतिहास हे फक्त त्यातील धडे आहेत. आणि भारतीय ह्या महान गोष्टीचा एक भाग आहेत .
केवळ तीच लोकं टिकतात जी सहकार्यात पुढे असतात.
सुरुवाती पासूनच इतिहासात जेव्हा प्रत्येक देशाच्या भौगोलिक मर्यादा  होत्या आणि संवादाच्या सुविधा कमी होत्या ,तेव्हा संघर्ष आणि जुळवून घेणे ह्या गोष्टीही तुलनेने कमी होत्या. ह्याच काळात विशिष्ट वंशाची माणसं इतरांच्या संपर्कात येत होती व ह्या स्थितीला आत्मसात करणाऱ्यांनी इतिहासात आपलं स्थान अधोरेखित केलंय.
वर्तमानात सगळे वंश जवळ आलेय. यावेळी एकमेकांसोबत तडजोड करायची की वाद घालायचा हे पर्याय समोर असतात.
टागोरांना असं म्हणण्यात काहीच वावगं वाटत नाही की, ज्यांच्या कडे प्रेमाचे मूल्य आहे, एकात्मतेची दृष्टी आहे, शत्रुत्वाची भावना कमी आहे आणि स्वतःला इतरांच्या जागी ठेऊन बघण्याची नजर आहे ते समोर ठाकलेल्या काळात आपली खास जागा बनवतील व सतत लढाई आणि असहिष्णुता दाखवतील ते नगण्य म्हणून उरतील. लुटारू आणि मागे खेचणे हे अवगुण उच्चतम नागरिकी करणामध्ये मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी अडचणीचे आहे .
जर हव्यास आणि द्वेष ह्याच गतीने पुढे सरसावले व यंत्र आणि गोदामे यांनी पृथ्वीला असंच दूषित आणि कुरूप केले तर सर्व जग स्वतःहून खाईत गेल्या सारखे असेल. म्हणून अशी वेळ आली आहे की हे संपूर्ण विश्व मानवतेचे बनून राहावे आणि फक्त राष्ट्रीयतेचे संघ नाही बनावे. नवीन पहाट उजाडावी, ज्यात मानवी एकता दिसेल.
अमेरिकेच्या चमकीचे मूळ तिच्या भविष्यात आहे, भूतकाळात नाही. एखाद्या व्यक्ती कडे हकक मागण्याची ताकद असेल तर ती व्यक्ती अमेरिकेला तिच्या असलेल्या स्थितीत प्रेम करू शकते.  युरोप मधील सर्व राष्ट्रांचे बळी जगाच्या प्रत्येक भागात असल्या सारखे आहेत. ते कधीच भारतीयांना समजू शकत नाही .
भारताला कधीच राष्ट्रवादाचे खरे भान नव्हते. टागोर नमूद करतात की, त्यांना लहानपणापासून शिकवले आहे - राष्ट्राची पूजा ही नेहमीच देव आणि माणुसकीच्या पुढे असते. टागोरांची इच्छा आहे की, भारतीय हे शिकतील की, देश हा मानवतेच्या तत्वापेक्षा जास्त नसतो .
आपण कधी कुणाचा इतिहास चोरू शकत नाही . जर आपण कुणाचं उसणं अवसान घेतलं जे कधीच आपलं नसतं, तर ही उसणी गोष्टच आपलं आयुष्य तोडण्यास कारणीभूत ठरते .
हे सगळ्यांनी जाणले पाहिजे - एकच भविष्य आहे, जे नैतिकतेचे आहे.
भारत हा पाश्चिमात्यदेशांसमोर झुकणारा नाही.
राष्ट्रवाद ही भिती आहे, भारताच्या अनेक गोष्टींच्या आड आलेली ही संकल्पना आहे.
परंतु, भारतातून इंग्रज लवकर गेले असते तर? तर भारताला दुसऱ्या युरोपियन राष्ट्राने चालवले असते. आपल्याला आत्ता गरज आहे ती, सामाजिक रूढी संपवण्याची, ज्यामुळे इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. युरोप मध्ये एका देशाचे अनेक देश झाले. भारत सध्या अनेक भौगोलिक सिमांमध्ये एक वसलाय. खरी एकता, पृथ्वी सारखी आहे, सगळा भार झेलत फिरत असते. भारतातील जातीव्यवस्था इथल्या सहिष्णुतेतून आली असल्याचे टागोर म्हणतात.
भारत हे समजायला चुकला आहे की, माणसा माणसांमधले फरक हे एखाद्या पर्वता सारखे अडचणीचे नसतात जे कायमचे तसेच राहतील. ते जीवनाच्या प्रवाहा सोबत वाहत असतात, स्वतःचा आकार आणि दिशा बदलत..
भारतात उत्पादन गरजेनुसार केले जाते. पश्चिमेत स्पर्धा आणि वैयक्तिक फायदा बघितला जातो. परंतु, लोभ कधीच टिकू शकत नाही. असे यातून टागोरांना सांगायचे आहे.
अन्न हे शरीराला घडवते.  जसं, आपली सामाजिक मूल्ये माणसांचं जग घडवतात. परंतु, या मुल्यांपासून दूर गेल्या नंतर हे विसरायला होते की, आपली ताकद आपले आरोग्य आहे आणि राजकीय स्वातंत्र्य मनाला मोकळे करू शकत नाही. गाड्या आपल्याला  एका जागे वरून दुसरीकडे नेऊन स्वतंत्र् करू शकत नाही, जेव्हा व्यक्ती स्वतः स्वतंत्र असते तेव्हा ती मोकळी होऊन गाडी चा वापर करू शकते.
टागोर असे मानतात की सौंदर्य आणि सत्य हे जुळे भाऊ बहीण आहेत. ज्यांची वाढ होणं गरजेचं असेल तर स्व नियंत्रण त्यावर असावे लागते. पण हव्यास फक्त उत्पत्ती आणि उपभोगाला जवळ करू शकते. चांगुलपणाला आयुष्यातून काढून टाकण्याचे काम लोभ करत असतो.
थोडक्यात, ह्या पुस्तकात  त्यांना असे सांगायचे आहे - आपले जीवन बाहयरूपाने साधे हवे. परंतु, अंतर्गत मनाला श्रीमंती हवी. आपले नागरिकीकरण सामाजिक सहकऱ्यावर आधारित हवे, आर्थिक शोषण व संघर्ष त्याचे मूळ नसावे.

18 

Share


Written by
तेजल

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad