पाऊस पडून गेला ना की सगळ कस छान वाटत.
तुला भेटून सख्या तसेच मन मोरपीस बनत.
सगळे काही विसरते दुख,वेदना,सल.
तुझ्या खांद्यावर अलगद जेव्हा विसवते मन.
तू आहेसच असा चाफया सारख्या,
दूर असूनही मनात माझ्या दरवळनारा.
मनसोक्त भेटून सुद्धा कुठेतरी,
मागे मागे माझ्या रेगाळनारा.
मी ही अडखळते नकळतपणे,
गहिऱ्या तपकिरी अथांग तुझ्या डोळ्यात .
मन तर कधीच अडकून पडलंय,
तुझ्या गालावरच्या अवखळ खळयात..!!
संगीता.देवकर.प्रिंट&मीडिया रायटर...