Bluepad | Bluepad
Bluepad
गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ..!!
A
Anand Sakpal
24th Jun, 2020

Share

तुमची मुलगी मोठी झाली ना दादा, तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जाता.. सगळ्या भावानी खर सांगा... तुम्ही तुमची मुलगी मोठी झाली की, आपोआप तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला विसरून जाता दादा..पण बहीण कधी विसरत नाही तुम्हाला, अरे बहिण भाऊ असावे.. कुठेतरी आता तीच लग्न झालं आहे, तिची परिस्थिती थोडी नाजूक आहे..पण तिच्या नवऱ्याची परिस्थिती खूप खराब आहे..तो कामाला आहे कुठेतरी त्याला दहा हजारची नौकरी आहे..पण दादा त्या पगारात काय भागत नाही.. दादा जीवनात कशाचं पण सोंग घेता येईल, पण पैशाचं खोट सोंग घेता येणार नाही..तिकडे भाऊ चांगल्या नौकरीला लागला आहे, भावाची प्रगती होत आहे, अन बहिणीची खुप वाईट परिस्थिती असते... बहिणीचा कसतरी प्रपंच चालला असतो..भाऊ मुंबई सारख्या शहरात राहतो,, आता भाऊबीज आली आहे तिला एक मुलगा आहे दादा.. प्रत्येक मुलीला भाऊबीजेसाठी माहेरी जावंस वाटत ना दादा, तर त्या मायमाऊली ला पण तसच वाटत होतं, की आपला भाऊ आपल्याला भाऊबीजसाठी सासरी येऊन घेऊन जाईल..कस असत ना दादा घरामध्ये दावणीला बांधलेली गाय अन सुनबाई सारखीच असते ना...कितीही स्वतंत्र असलं तरी तिला पण मन आहे ना, तिला पण दादा काहीतरी वाटतच असेल ना, ती उचलली बॅग न निघाली माहेरी अस ती बोलू अन करू ही शकत नाही ना..।।

सगळ्या महिला नटून थटून आपल्या माहेरकडे निघाल्या, तिला पण आस आहे की, तिचा दादा तिला एकदा तरी कॉल करून सांगेल की, मी येतो आहे ताई तुला भाऊबीजेला घेऊन जायला.. बहीण इकडे दिवसभर भावाच्या कॉलची वाट पाहत बसते परंतु त्याचा कॉल काही येत नाही.. भाऊबीजेच्या दिवशी ती घरामध्ये आतबाहेर करत असते, तिला माहित असत तिचा दादा काही तिला भाऊबीजेसाठी घेऊन जाण्यासाठी येणार नसतो.. पण दादा ती एक बहीण असते रे, तिला तिच्या सासर समोर तिच्या भावाची व माहेरच्या लोकांची मान खाली घालायची नसते.. म्हणून ती बिचारी कोणाला बोलूनही दाखवत नाही..मग ती एकटी रूम मध्ये जाऊन एक पेन अन कागद घेते, त्या कागदा वरती आपल्या मनातलं लिहत असते, लिहित असतानी तिच्या डोळ्यातील अलगद पाणी त्या कागडावरती पडत असत दादा.. बहिणीचा खुप जीव असतो रे, तिच्या भावावरती अन माहेरच्या लोकांवर्ती खुप प्रेम असत..

*#तिच्या हृदयात काही वाक्य असतात, ती त्या कागदावरती लिहते...!!*

*गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ।।*
*गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ।।*
*सांग ना रे दादा मी तुला कोणत्या पत्यावर भेटायला येऊ..*

दादा तु मोठा आहेस रे..तू श्रीमंत झाला रे दादा....बर ठीक आहे ना तुझ्या आजूबाजूला माणस आहेत ना, मला फक्त पत्ता दे..मी तुला भेटायला येते, तू नाही भेटायला आला तरी चालेल...!!

*गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ।। सांग ना रे दादा मी तुला कोणत्या पत्यावर भेटायला येऊ..*

अरे दादा नको घरधार, नको पैसापाणी देवाकडे करते माझ्या दादाच्या सुखाची विनवणी...गरीब ये मी पण सांग ना कोणत्या रंगाचा शर्ट तुला घेऊ,, सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्ता वर भेटायला येऊ...।।।

पुढे ती बहीण त्या कागदावर लिहते.. दादा तुला माहीत नाही रे, सहा महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय,, सहा महिने झालं तुझ्या दाजींचं काम गेलंय..गावाकडे आलोय आम्ही, मी रोज दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाते रे, सवय नाहीये मला शेतातल्या कामाची तरी देखील ते काम करते..माझ्या हातावर फोड आली आहेत त्या फोडाना पाहिलं की, दादा मला तुझी खूप आठवण येते रे...

जाऊदे तू नको वाईट वाटून घेऊ, सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्तावर भेटायला येऊ....।।।

अन पुन्हा ती बहीण लिहते, तु उचलत नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला।।१।।,, wrong नंबर म्हणून तिने माझा फोन कट केला..आहे माझं प्रारब्ध तू नको मनाला लावून घेऊ, सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्तावर भेटायला येऊ...!!


*मित्रांनो पुढची वाक्य अगदी मनाला चटका लावून जाणारी आहेत..!!*

आई बाबा गेले रे, घर पोरखं झालं..।। आई बाबा गेले चपल सोडायला माहेर शिल्लक नाही राहिल माझं..!!
आई बाबा गेले, घर पोरखं झालं..।।
त्यांच्या आठविनीचा आधार माझ्या डोळ्यात आलं.. दादा वाईट वाटत मला, शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ...।। सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्तावर भेटायला येऊ....।।। सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्तावर भेटायला येऊ..।।१।।

सरकार मनत असेल ,अर्धी वाटणी घे,, पण नको ना मला..नको घरधार नको, जमिनीची वाटणी सुखाने खाईल तुझ्या घरची भाकरी अन चटणी..!! दादा साडी नको घेऊ, दोन घास घाल जेवू..।।
सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्तावर भेटायला येऊ....।।। सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्तावर भेटायला येऊ..।।१।।

सर्वांना हात जोडून विनंती आहे दादा.. मुलगी आहे, अरे एक आजी किती म्हातारी झाली तरी ती आपल्या नातवाला विचारेल, का रे माझ्या भाच्याचा फोन आला होता का अस म्हातारपणाला..दादा ती नाळ जोडली असते, श्वास गेल्यानंतर, जीव गेल्यानंतर ती नाळ तुटेल दादा.. तशी माहेरची नाळ त्या मुलींसाठी कधी तुटू शकत नाही..!!!

म्हणून सगळ्यांनी चांगलं जगा व चांगल वागा.. या समाजात दादा खुप प्रकारची माणस तुम्हाला भेटतील पंरतु बहिणी सारखी जीव लावणारी न प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला शोधून पण भेटणार नाही...।।।

देवाने जे आयुष्य माणसाला दिल आहे, त्याचा चांगला वापर करून घ्या...।।

12 

Share


A
Written by
Anand Sakpal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad