Bluepad | Bluepad
Bluepad
विचार करतोय आजवर..!
P
Payal
24th Jun, 2020

Share

कालचीच गोष्ट...दोन महिन्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकलं हातात ग्लोज आणि तोंडला N95 चा माक्स....दरवेळी घराच्या बाहेर पडताना प्रसन्न वाटायचं पण काल प्रश्नांनी घेरल होत...काही औषध हवी होतीत आणि घरातल किराणा सामान म्हणून बाहेर पडले होते..रस्ता पूर्ण सामसूम जिथे तिथे बॅनर...स्वताःची काळजी कशी घ्यावी. त्यात गर्मी चे दिवस डोक तापल होत चालण्याची इच्छा होत नव्हती...त्यात कोणत्याही गोष्टीला हात लावताना दहा वेळा विचार करावा लागत...शेवटी घर गाठल फ्रेश होऊन खिडकीत बसले हातात पाण्याचा ग्लास आणि इतक्यात प्रश्नांनी घेरल... कधी नाही ती..खिडकीत चिमणी आली ती चिव-चिव करत होती तिची भाषा मला नव्हती समजत पण ती खूप आनंदात होती हे नक्कीच मला समजतं होतं...आणि माझ्या विचारांच्या विचारात त्या चिव-चिव करणार्या चिमणीने प्रकाश टाकला विचार भरकटले...जे प्रश्न मला सकाळ पासून पडले..ज्या पद्धतीने मी स्वताला खूप सुरक्षित करून घराच्या बाहेर पाऊल टाकलं तसंच तिचही होत असेल ना...? घरट्या मधून निघताना तिलाही माझ्या सारखेच प्रश्न पडत असतील का??? मी माझ्या पिल्लांना उद्या खाऊ देऊ शकेन? मी त्यांना परत पाहू शकेन?? मी तिला पाहतच होते...ती माझ्याशी या गोष्टी जवळीक साधून सांगत होती आणि मी तिच्या आनंदा मागच कारण शोधत होते... यात मला कारण सापडलं ते एवढंच...आज आपण अडीज महिने घरात बसून आहोत..कोण म्हणतं आम्ही पक्ष्यां सारखे बंदिस्त पिंजर्यात अडकलो, कोण म्हणतं घुसमट होतेय...मग ती चिमणी किती गोष्टी सहन करत असेल?? तिच नाही तर सर्वच मुके पक्षु-पक्षी....या गोष्टीना सामोरे जातच असतात... मोबाईल असो किंवा मोठ मोठी उपकरणे यातून बाहेर पडणार्या रेडियेशन मुळे किती पक्ष्यांचा जीव जात असेल..याचा फक्त विचार करतोय आजवर...! ~पायल चव्हाण ✍

13 

Share


P
Written by
Payal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad