Bluepadवासे....
Bluepad

वासे....

Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
24th Jun, 2020

Share

घरादाराची पडझड होताना
आधाराचे वासे गळून पडताना
विसाव्याच्या भिंतीच हातपाय गाळताना
स्वस्थ बसून नजारे बघत बसणं
कसं समजावू स्वत:ला ?
मातीमोल झालेलं पाहायचंच आहे
आकांड आणि तांडवानी आधीच
जमिनीच्या भेगा दऱ्यांमध्ये बदलल्यात
तरीही स्वस्थ बसून कोलमडणं पाहायचं
कसं समजावू स्वत:ला ?
एकच विनंती आहे...
भाकरी करपतेय... परतवा
एक करा...
घर पडायचं पडू द्या
आपापले संसार थाटा
चुली वेगळ्या करा
दुरून डोंगर साजरे ठेवा
अन्यथा...
वासे सांभाळा, गोवर्धन उचला
भिंती उभारा, जमिनी सारवा,
येऊ द्या गारवा
विसावा सर्वांचा असावा
सर्वांनाच मिळावा
एक हि न गळावा
एक्क हि न गाळावा....


13 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad