Bluepadऑनलाइन शॉपिंग : सुविधाजनक खरेदीचा पर्याय
Bluepad

ऑनलाइन शॉपिंग : सुविधाजनक खरेदीचा पर्याय

RD Bhosale
RD Bhosale
24th Jun, 2020

Shareशॉपिंग करणं हे स्त्रियांचं आवडतं काम. हो कामच. ज्यात आवश्यक वस्तू विकत घेतल्या जातात आणि शिवाय आपली आवडही जोपासली जाते. दुकानात जाणं आणि “हे नको आणखी काही दाखवा” म्हणत दुकानदाराला साड्या आणि ड्रेसेस काढायला लावून तासन् तास एका जागी ठाण मांडून बसायला बायकांना फार आवडतं. आता बदलत्या काळानुसार ही ठाण मांडण्याची जागा बदलली आहे पण ते वेड अजून कायम आहे. आता ज्यांना ज्यांना म्हणून शॉपिंग करायची असते ते एक तर आपल्या कम्प्युटर समोर नाहीतर मोबाइल घेऊन बसलेले असतात. त्यांची ही सवय बदलली आहे ती मिंत्रा, अॅमेझोन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सनी.

तुम्ही दुकानात जाता तेंव्हा बाकी काही नाही तरी एक गोष्ट नक्कीच आधी ठरवता आणि ती म्हणजे आपलं शॉपिंगचं बजेट. त्या बजेटमध्ये जास्तीतजास्त आवश्यक वस्तू ते “आता घेऊन ठेऊया, उद्या मिळेल की नाही माहीत नाही” ह्या कॅटेगरी पर्यन्त वस्तू खरेदी करीत असता. कोणतीही वस्तू घेताना, खास करून कपडे घेताना तुम्ही त्याची क्वालिटी आणि दर यात मेळ घालून बघता. तुम्हाला माहीत असलाच तर एखाद्या ब्रॅंडसाठी आग्रह धरता. हीच गोष्ट तुम्हाला ऑनलाइन खरेदीमध्ये आरामात करायला मिळते.

मिंत्रावर मेन, विमेन, किड्स, होम अँड लिविंग आणि ईसेन्शियल हे मुख्य मेन्यू आहेत आणि त्या प्रत्येकाच्या खाली ४० ते ५० कॅटेगरीज आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या, हर तर्‍हेच्या आणि खिशाला परवडतील अशा वस्तूंची निवड करता येते.

ह्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्सचं महत्वाचं फीचर म्हणजे त्यांचे फिल्टर्स. ह्या फिल्टर्समध्ये तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे किमतींची रेंज, रंग, पोत, नॅशनल - इंटरनॅशनल ब्रॅंडचे प्रॉडक्ट्स एवढंच नाही तर तुम्हाला किती डिसकाऊंट असणारे प्रॉडक्ट हवे आहेत त्याचा सुद्धा फिल्टर इथे आहे.
शॉपिंग म्हटलं की एका वेळी अनेक वस्तू घ्यायच्या असतात. त्या सगळ्या लक्षात राहत नाहीत आणि राहिल्या तरी आपल्याला हव्या तशा त्या मिळतील हे सांगता येत नाहीत. लग्नसराईत बाजारात गर्दीही खूप असते अशा वेळी आपल्याला हवी तशी वस्तू मिळणं दुरापास्त असतं. यासाठी मिंत्रा, अॅमेझोन आणि फ्लिपकार्ट वरचं “विशलिस्ट” हे ऑप्शन खूप उपयोगी पडतं. आपण शॉपिंगला गेलो आणि दुकानदाराला अनेक वस्तू काढायला सांगितल्या आणि काही कारणाने त्यातली एकही वस्तू न घेता तिथून निघालो तर पुढच्या वेळी तो दुकानदार दारात तरी उभा करील काय? शिवाय तुम्हाला आवडलेली वस्तू तुम्ही बजेट नसल्यामुळे तेंव्हाच खरेदी करू शकत नाहीत पण ती पैसे असतील तेंव्हा उपलब्ध असेलच हे सांगता येत नाही. ऑनलाइन शॉपिंग करताना “विशलिस्ट” हे ऑप्शन यासाठीच उपयोगी पडतं. तुम्हाला जेंव्हा कधी वेळ असेल तेंव्हा ऑनलाइन फेरफटका मारा. एखादी आवडलेली वस्तू तिच्या साइज वगैरे डिटेल्स सह “विशलिस्ट” मध्ये ठेवून द्या. आणि मग जेंव्हा तुम्हाला घ्यायची असेल तेंव्हा तिला विकत घ्या आणि घरपोच आणण्याचे सर्व डिटेल्स भरा.

एवढं हे सोपं असल्यामुळे स्त्रियांचा कल याकडे वाढतो आहे. त्यांची विशलिस्ट कोण कोणत्या गोष्टींनी भरलेली असेल याची नुसती कल्पना करा. कारण नुसते कपडेच नाहीत तर बूट, लिपस्टिक, मेकअपचं सामान, घड्याळ, एअररिंग्ज, व्यायामाचं सामान, पर्सेस, हँड बॅग, ब्युटी प्रॉडक्टस, स्कीन केअर यापासून पुरुषांच्या आणि मुलांच्या सर्व वस्तू, घरासाठी आवश्यक वस्तू त्यांच्या “विशलिस्ट” मध्ये असतील.

आपल्याला जर दहा प्रकारच्या वस्तू हव्या असतील तर दहा दुकानं फिरावी लागतील. त्यातूनही हवी तशी वस्तू मिळेल याची शाश्वती नाही. ऑनलाइन शॉपिंग म्हणजे एका छताखाली सर्व वस्तू ठेवलेलं एखादं जादूचं गार्डन असतं. बस एक क्लिक करा आणि तुमची वस्तू तिच्या सर्व डिटेल सह तुमच्या समोर हजर होते. लग्न आणि सण समारंभांच्या धबडग्यात सतराशे साठ कामं करायची असतात. त्यात जर तुमची शॉपिंग अशी घर बसल्या झाली आणि तुमच्या वस्तू घरी पोहोचवल्या गेल्या तर किती भार हलका होईल याचा विचार करा. स्त्रियांनी या संधीचा फायदा घेतला नसता तरच नवल.

आज कोरोना नंतरचं जग हे ऑनलाइन शॉपिंगचं असेल असंच बोललं जात आहे. त्यावेळी फक्त लाइफस्टाइल नाही तर जीवनावश्यक वस्तू देखील अशाच प्रकारे विकत घ्याव्या लागणार आहेत. आधुनिक युगातील ही शॉपिंग प्रक्रिया आपल्याला जगण्यासाठी सुद्धा आवश्यक ठरेल असं सध्या तरी दिसतंय. चला तर मग आपली “विशलिस्ट” तयार ठेवा. मग लॉकडाउन उठलं की तुमचे प्रोडक्टस तुमच्या घरी येतील. हॅप्पी शॉपिंग.

16 

Share


RD Bhosale
Written by
RD Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad