Bluepadटाईम महा महाराष्ट्रन्युज-आणखी 9 जणांना कोरोनाची लागण आकडा 12 वर.
Bluepad

टाईम महा महाराष्ट्रन्युज-आणखी 9 जणांना कोरोनाची लागण आकडा 12 वर.

टाईम महाराष्ट्र
टाईम महाराष्ट्र
23rd Jun, 2020

Share

आणखी 9 जणांना कोरोनाची लागण आकडा 12 वर.

टाइम महाराष्ट्र न्यूज वैजापूर प्रतिनिधी.
शिऊर गावात कोरोनाने शिरकाव करतानाच एकाच कुटुंबातील तिघांना बाधित केले यातच शिऊरकरांच्या काळजीत वाढ झाली असून त्या कुटुंबातील आणखी तिघे जण तसेच गावातील एक पत्रकार व बळेगाव येथील एक व्यक्ती असे पाच जण पॉझीटिव्ह आले आहे.
शिऊर येथील डॉक्टर व मेडिकलचालक सह त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने बाधित झाले होते त्यांच्या संपर्कातील 37 लोकांचे swab घेण्यात आले होते त्यात बाकी swab अहवाल हे निगेटिव्ह आले असून 8 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, यात त्याच कुटुंबातील तिघे असून गावातील एक पत्रकार व तसेच बधितांच्या संपर्क मध्ये आलेला बळेगाव येथील एका व्यक्तीच्या समावेश आहे अजूनही आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 1570 रुग्णांवर उपचार सुरू, आज 163 रुग्णांची वाढ.

औरंगाबाद, दि. 23 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3819 झाली आहे. आज वाढलेल्या 163 रुग्णांपैकी 112 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 51 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 203 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1570 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शिवाजी नगर (4), सिडको एन चार, जय भवानी नगर (1), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (4), बायजीपुरा (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), सिडको (1), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (1), उत्तम नगर (1), समर्थ नगर (1), म्हाडा कॉलनी (1), अरिफ कॉलनी (1), कोटला कॉलनी (1), उस्मानपुरा (1), एन नऊ सिडको (3), अंबिका नगर (1), पडेगाव (1), भानुदास नगर (7), न्यू नंदनवन कॉलनी (1), विष्णू नगर (1), उल्का नगरी (1), पद्मपुरा (5), क्रांती नगर (1), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), एन पाच सिडको (2), एन सहा, मथुरा नगर (3), गजानन नगर (6), औरंगपुरा (1), जय भवानी नगर (8), एन सहा, संभाजी कॉलनी (1), नानक नगर (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), एन सहा सिडको (2), सेवा नगर हाऊसिंग सोसायटी (1), राज हाइट, सेव्हन हिल जवळ (1), जे सेक्टर, मुकुंदवाडी (1), भगतसिंग नगर (3), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (1), कॅनॉट प्लेस (1), न्यू विशाल नगर (1), श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी (1), राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी (1), मुकुंदवाडी (2), मयूर नगर (1), आयोध्या नगर (2), बौद्धवाडा चिकलठाणा (1), चिकलठाणा हनुमान चौक (2), सुरेवाडी (1), विजय नगर (2), गारखेडा परिसर (1), रशीदपुरा (1), सिडको महानगर दोन, वाळूज (4), जय गजानन नगर (1), अन्य (1), कैलास नगर (1), एन दोन सिडको (3), जोहरीवाडा, गुलमंडी (1), राजेसंभाजी नगर (1), बन्सीलाल नगर (1), रमा नगर (1), हनुमान नगर (2), सातारा परिसर (1), मयूर पार्क (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
*ग्रामीण भागातील रुग्ण*
मांडकी (2), सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर (2), राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (5), ओयासिस चौक, पंढरपूर (1), ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर (1), हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), सारा गौरव, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (1), एन अकरा, मयूर नगर, हडको (2), पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर (1), वडगाव (1), विराज हाईट, बजाज नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), करमाड (6), फत्तेह मैदान, फुलंब्री (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (1), कोलघर (2), गजगाव, गंगापूर (1), लासूर नाका,गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), शिवूर बंगला (2), कविटखेडा, वैजापूर (1), शिवूर (5), मधला पाडा, शिवूर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये 55 स्त्री व 108 पुरुष आहेत.

खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
औरंगाबादेतील गोरखेडागाव येथील 66 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा 23 जून रोजी मध्यरात्री 12.45 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयांत जिल्ह्यातील एकूण 54, घाटीमध्ये 148 आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात एक अशा एकूण 203 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

0 

Share


टाईम महाराष्ट्र
Written by
टाईम महाराष्ट्र

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad