Bluepadकिनारा
Bluepad

किनारा

A
Ajit More
29th Nov, 2021

Share

असच निखळ समुद्राकडे पाहत उभा होतो.मनात एक प्रश्न उमगला,किनाऱ्या लगत येणाऱ्या लाटा जश्या काय त्या तठबंधिस्थ आहेत. एवढे विशाल रूप असूनही ह्या किनाऱ्याच्या बंधनात का??....
एवढी अगाद शक्ती असलेला पण तू बंधनात राहून आपले कर्तव्य पूर्ण करत आहे,मग आम्ही का नाही करू शकत??.....
असे प्रश्न मनाला भिडून जाऊ लागले,तेवढ्यात समोरून गोड उत्तर आले.
एखादे कर्तव्य पूर्ण करत असताना, कर्तव्याशी असलेली निष्ठा निखळ आणि परिपूर्ण असेल ना तर किनारा हे बंधन न वाटता आपला साथी वाटू लागतो.कोणतेही चांगले काम करायचे असेल तर बंधन ही असावी लागतात.पण चांगले काम करणार बंधनकारक नसून तो आपल्या कामाशी असलेली बांधिलकी पूर्ण करत असतो. एखाद्याशी केलेली बांधिलकी कश्या रीतीने तो पूर्ण करतो त्यावरूनच त्याची खरी श्रेष्ठता ठरवली जाते.किनारा आणि लाट या मध्येही अशीच एक बांधिलकी आहे. जी त्यांना त्यांचे कर्म करण्यास भाग पाडते.परंतु समोरचा आपल्या बांधिलकीला बंधन समजून गैरफायदा घेत असेल तर रौद्ररूप धारण करून विद्रोह पण केला पाहिजे.आणि पुन्हा उपयुक्त वेळी शांत होऊन आपल्या कर्तव्याशी एकरूप होयचे.हे वेळेचं गणित ज्याला जमले तोच श्रेष्ठ होतो🤗☺️.
23 

Share


A
Written by
Ajit More

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad