Bluepadआत्महत्या आणि माणुस
Bluepad

आत्महत्या आणि माणुस

सुबोध सुधीर चव्हाण
22nd Jun, 2020

Shareमाणुस स्वतःशी हरू लागला. जगण्याचं धाडस विसरत चालला अशी मन हेलावणारी घटना घडून गेली.न्हवे जाणीव करून गेली.आपण केलं काय पाहिजे आणि करतोय काय याची .आजची परिस्थिती कोणती आहे .अशी आयुष्यात अनेक वादळे येतात अनेक संकटे येत असतात त्याला निखराने सामोरं जायचं असत.खऱ्या अर्थान आज आपण हरलोय हे मात्र खर केव्हा केव्हा अशी परिस्थिती ही असू शकते न्हवे ती सुरवात देखील असू शकते अशा यावेळी संयम कामी येतो..
मित्र हो जागे व्हा आपणांस काय घडायचं आहे याकडे लक्ष द्या तुम्ही कोणा एकासाठी आयुष्य पणाला लावू नका...या जीवनाचा आनंद घेतचला.कोणी नसेल कदाचीत पण आपले आई वडील आहेत याचा विचार करा यांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत.
त्यांनी किती यातना सहन केल्या असतील त्यांची व्यथा काय होईल याचा विचार करा त्यांनी किती स्वप्ने पाहिली असतील याचा विचार करा जीव देणं सोपं वाटत असेल पण तुम्ही आई वडिलांना जिवंत मारताय याच काय त्या यातना किती कठीण असतील याचा विचार करा.सुखी जीवन केव्हा होत जेव्हा आपण आपली दुःख दूर लोटतो आणि इतरांच्या सुख दुःखात सहभागी होतो तेव्हा...
जगा कणखर बना ...

आज हे घडते आहे कारण माणसाने हरणे पत्करले आहे.ही संकटे आणि कित्येक परिस्थितीतुन बाहेर पडण्याचे धडे आपल्याला पूर्वजांनी देऊ केले आहेत न्हवे ती तर संजीवनीच आहे हेच विसरलोय ...
इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आता आता पहाल तर सावरकर कित्येक माणस प्राणपणाने लढली निखराने लढली आपल्या मातीसाठी स्वतःसाठी नाही राष्ट्रासाठी त्यांना मने न्हवती का त्यांना जगण न्हवत का स्वराज्य निष्ठा होती ती स्वातंत्र्यासाठीची तळमळ होती

माणसा जागा हो जग तुझं आहे आयुष्य सुंदर आहे तू सुंदर फुल बन तू सुवास निर्माण कर ....आज खूप संकटे आहेत आज कोरोना धुमाकूळ घालतोय उद्या अजून कोणता तरी आजार येईल माणसा धीर सोडू नको रे इतकच ......
आत्महत्या हा पर्याय नाही. सचोटीने लढल पाहिजे ...

कित्तेक येति वादळे आपण छातीची ढाल करू...

जागा हो माणसा जागा हो ......

✒️✒️✒️सुबोध सुधीर चव्हाण✒️✒️✒️

13 

Share


Written by
सुबोध सुधीर चव्हाण

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad