Bluepad | Bluepad
Bluepad
जगणं थोडस राहून गेलं
मर्मस्पर्शी जीवन
मर्मस्पर्शी जीवन
22nd Jun, 2020

Share

पुन्हा एकदा मी शुभम तुमच्या समोर हजर आहे एका नविन लेखा सोबत. जे वाक्य तुम्ही मथळा म्हणून पाहिला तो आपल्यासाठी नवीन नसावा. करण हे वाक्य कधी ना कधी कोण ना कोण बोलत असतोच, कारण हे पाण्यासारख आहे नितळ सत्य आहे . विचार केला तर एका वयोगटा नंतर हा प्रत्यय सर्वाना येतोच, की जगणं थोड राहूनचं गेलं. आपला जो क्षण जगून झाला, किंबहुना तो क्षण काही तरी शिकवून जातो असा . आज असाच एक प्रसंग तुमच्या समोर उभा करतो . हा प्रसंग तुमच्या समोर एका चित्रा उभरुन येईल......
असा कोणी नसेल त्याला मित्र नाही. मैत्रीच नात हे अस जुळलेल आहे की त्याची पकड अगदी घट्ट असतेच. आपल्याला संपुर्ण जीवनात अनेक मित्र मंडळी भेटत असतात, जेव्हा हा मी लेख लिहतं होतो तेव्हा मला ही असा एक ना अनेक अनुभव आले. काही मित्र वाट दाखवणारे असतात तर काही वाट लावे, काही दारु सिगरेट हातात देतात . तर काही अनेक चांगल्या सवयी लावतात हे आपण सगळे आजतागायत वाचत ऐकत आलो आहे. असेच दोन मित्र शालेय जीवना पासून सोबत असणारे आणि आता समाजात प्रतिष्ठित झालेले. परंतु आता आपल्या व्यक्तिगत कामा मध्ये वस्त आहे. जे रोज सोबत असायचे आता त्यांना साधा एकमेकांशी संवाद साधता येत नाही.........
जैक हा तरुण यशस्वी उद्योजक झाला आहे . त्याचा मित्र एके दिवशी फोन करतो तुला वेळ असेल तर भेटशील का ? तो लागलीच हो बोलतो . बरेच वर्षा नंतर भेट होणार याची उत्सुकता होतीच. दिवश ठरला भेट पण झाली गप्पा गोष्टी चा फड रंगला व अशी ती भेट संपली . जैक चा मित्र एक सेवाभावी संस्थेत काम करत असतो. हे जैक समजले होते त्या भेटी मध्ये तो फार भारावुन गेला होता त्याच्या कार्यामुळे .
पुन्हा एकदा असाच फोन जैक ला आला की तुला जर थोडा वेळ असेल तर एक मदत करशील का ? जैक ताबडतोब होकार देतो. त्याचा मित्र त्याला सांगतो तुझ्या घरा जवळ एक आई व मुलगा राहतो त्याला तु फक्त दवाखान्यात सोडशील काय? त्या लहान मुलाला दवाखान्यात दाखल करायचे आहे तर तु त्याला व त्याच्या आईला सोड. जैक लगेच निघतो व त्याला दवाखान्यात नेण्यास त्याला व त्याच्या आईला गाडीत बसवतो . गाडी चालवत असताना जैकला हे समजते की तो रक्ताच्या कैन्सर ( Leukemia) सोबत लढत आहे व तो चौथ्या टप्पात आहे . हा आजार तसा कमी प्रमाणा लोकांन मध्ये आढळतो आणि याची लागण ही या लहान मुलाला झाली . तो त्याला दवाखान्यात सोडतो व निघून जातो.
दोन चार दिवसानी तो त्या लहान मुलाला भेटायला येतो. तो आपल्या आईच्या कुशीत डोक ठेवून झोपला होता . जैक आला व त्याच्या समोर बसला व त्याच्या डोळ्यात पाहत होता त्या मुलाच्या डोळात काही तरी अपेक्षा होती जैक कडून हे त्याला आता समजले होते . त्यांने जैकला जवळ येण्याची खुण केले जैक त्याच्या जवळ गेला व तो लहान मुलगा त्याच्या कानात काही तरी बोलला व जैकला समजलेच नाही नक्की हा मला असा का बोलला असे . या विचारात तो दवाखान्यातून बाहेर पडला .
थोड्या दिवसानी जैकला ही बातमी येते की तो लहानगा आता राहिला नाही. त्याच मन खिन्न होतं . व डोळ्यातून आसवाचा झरा वाहू लागतो . त्याच्या मित्राला तो बोलवून घेतो व त्याला मनात दडवून ठेवलेली एक हकीक़त सांगू लागतो. त्याचा डोळ्यातून पण अश्रू येतात. विचार पडले असाल की तो लहान मुलगा त्याच्या कानात काय बोलला?? की अश्रू अनावर झाले .

तो लहान मुलगा त्याच्या कानात हे बोलतो, तु देव आहेस का ?? जैक ला समजले नाही हा असा का बोलला मग तो मुलगा बोलतो माझ्या आईने मला सांगितले आहे की देव तुझी मदत नक्की करेल तो जर कामात असेल तर त्याच्या एका मदतनीसाला पाठवून देईल . तो तुच आहेस ना . जैक त्याला नाही बोलतो . जेव्हा तो मुलगा जातो तेव्हा जैकला जाणिव होते की मी काही तरी नक्की करु शकलो असतो . मात्र माझ्या कडून काही झालं नाही या सर्व घडलेल्या प्रसंगामुळे तो एक निर्णय घेतो.
तो निर्णय असा असतो की अशा अजाराने ग्रस्त मुलांना साठी मी एक संस्था चालू करेल व ती तो करतो . व असंख्य मुलाचे जीव वाचवतो . वाचकानो कदाचित त्या लहान मुलाच जगणं थोडस राहून गेलं असेल. पण त्याच तु देव आहेस का हे विचारण अनेकांना नविन जीवन देवून गेलं . हे सगळे घडले नसते जर जैक चा मित्र त्याला भेटला नसता व त्याने मदत मागितली नसती तर . जीवनात असे मित्र असू द्या जे असे काही तरी सत्कर्मी असतीलं.


● लेखक :- शुभम ज्योती चव्हाण ●

24 

Share


मर्मस्पर्शी जीवन
Written by
मर्मस्पर्शी जीवन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad