Bluepadशारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग
Bluepad

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग

B
Bhargavi Joshi
22nd Jun, 2020

Share
भगवद्गीतेच्या “संख्यायोग” ह्या दुसर्‍या अध्यायात अर्जुनाला कर्माचं महत्व सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २/४८ ॥

अर्थात, हे धनंजया, तू आसक्तीचा त्याग करून तुला मिळलेलल्या यशासाठी तू खूप आनंदी होऊ नकोस तसाच तू अपयशासाठी दु:खी सुद्धा होऊ नकोस. तू योगयुक्त होऊन दोन्ही अवस्थांकडे समान भावनेने पहा आणि सदैव आपले कर्म करीत रहा. म्हणजेच कोणतीही परिस्थिति असली तरी मानवाने स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे. ह्या समान भावनेलाच योग असं म्हणतात.

जिथे माणसाच्या दोन प्रवृत्ती, दोन मूल्ये, दोन विचार पद्धती किंवा दोन जीवनशैली ह्या एकत्र येतात त्याला योग असं म्हणतात. जसं की दोन महत्वाचे प्रसंग एका वेळी आले की आपण म्हणतो “आज छान योग जुळून आला आहे.” कारण योग ह्या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे ज्याचा संस्कृत मधला धातू किंवा मराठीत ज्याला क्रियापद म्हणतो तो “युज” असा आहे. मानवी आरोग्याच्या बाबतीत शरीर आणि मन ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात आणि ह्या दोघांनाही एकत्र सांधते किंवा दोघांचेही एकत्र पोषण करते ती असते “योगसाधना.” आजच्या अत्यंत व्यस्त आणि वेळेचे नियमन नसलेल्या काळात आपल्या शरीराचे वेळापत्रक पुर्णपणे धेडगुजरी झाले आहे. याशिवाय नोकरी, धंदा, कुटुंब यांच्या व्यापात अनेक ताण तणावांना सामोरं जावं लागतं. ह्या अवस्थेत आपलं शरीर आणि मन या दोन्हीचे आरोग्य योग्य प्रकारे राखलं गेलं पाहिजे.

देशातील प्रत्येक व्यक्ति शरीर आणि मनाने खंबीर असेल तेंव्हा तो येणार्‍या प्रत्येक आव्हानांचा सामना करू शकतो, देशाच्या प्रगतीत मोठमोठे योगदान करू शकतो, स्वत: संपन्न होऊन देशाला संपन्न करू शकतो आणि त्यासाठी योगसाधना फार महत्वाची आहे ह्या बाबींवर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यासाठी देशात एक पूर्ण दिवस योग साधनेला समर्पित असावा यासाठी ते २०१४ ला त्यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासूनच आग्रही होते. त्यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले होते. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली हाती. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७७ देशांचे सहप्रतिनिधी लाभले. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. त्याला ११ डिसेंबर २०१४ रोजी मान्यता देण्यात आली आणि २१ जून ह्या वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

योगसाधनेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे पाच बहिर्रंग असतात तर धारणा, ध्यान, समाधि हे अंतरंग असतात. आसन आणि प्राणायाम हे शारीरिक स्वास्थ्यसाठी तर ध्यानधारणा हे मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त असते. ध्यानधारणा मनात उफाळणार्‍या भावभावनांच्या झंझावातावर नियंत्रण ठेवत असते. आसने आणि प्राणायाम मुळे आपल्या शरीराची शुद्धी होते, शरीर लवचिक आणि काटक बनून ते ऊन, वारा, पाऊस अशा अनेक नैसर्गिक मार्‍यात सुदृढ राहते. ध्यान धारणा आणि समाधी मार्गामुळे आपले मन कोणत्याही अपयशाने खचून जात नाही की यश मिळाल्याने अत्यानंदाने हर्षित होत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपलं मन समत्व रखण्यासाठी सक्षम बनतं.

प्राणायामातील कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी हे प्रकार केल्याने रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. कपालभाती तर आपल्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास खूप मदत करते. यामुळे थंडी असताना शरीतात उष्णता तर उन्हाळ्यात शरीरात शितत्व निर्माण करते. स्त्रियांच्या PCOD सारख्या आजारात सुद्धा ह्या मुळे खूप सकारात्मक परिणाम होतात. पंतप्रधानांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा दिवस संपूर्ण जगाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करीत आहे.

68 

Share


B
Written by
Bhargavi Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad