Bluepadकृतज्ञ.....
Bluepad

कृतज्ञ.....

Harshali Patil
Harshali Patil
21st Jun, 2020

Share


शरीराचा दगड करून चोवीस तास सीमेवर उभा असलेला,
देव पाहिलाय मी !
सगळ्या रंगांना फिके पाडणारी वर्दी अभिमानाने छातीवर चढवलेला,
देव पाहिलाय मी !
स्वतःचं सुख बाजूला ठेऊन दुसऱ्यांच्या जीवासाठी लढणारा ,
देव पाहिलाय मी !
आई-वडिलांआधी मातृभूमीलाच देव मानणारा,
देव पाहिलाय मी !
जातीधर्म विसरून मानवधर्मासाठी स्वतःचा जीव ओतणारा ,
देव पाहिलाय मी !
ज्याचा गेलेला जीवही सार्थकीं लागतो असा जन्मतःच अमर झालेला,
देव पाहिलाय मी !
मनुष्य जन्माला येऊन देवत्व मिळवलेला, ते कमावलेला,
देव पाहिलाय मी !

1 

Share


Harshali Patil
Written by
Harshali Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad