Bluepadतू जरा थांब .......
Bluepad

तू जरा थांब .......

surekha jagtap
surekha jagtap
21st Jun, 2020

Share

जन्माला आला आहेस जगून घे
हसून घे, खेळून घे , नाचून आणि रडून हि घे
मरण तर अटळच आहे
त्याला चुकलय तरी कोन
मरायचंच आहे आधी जगून तरी घे
बोलून बघ जरा कधी निसर्गाशी , प्राण्यांशी , पक्ष्यांशी
झुळझुळ वाहणाऱ्या त्या नद्यांशी ...
कसे आपल्याच धुंदीत
ना कोणाची साथ ना कोणाची आस
एवढे व्हावे कणखर , खंबीर आणि आनंदी कि
कारणही नसावे काही खास
म्रुत्युला हि म्हणाव आलास तरी नाही मानणार हार
तुझ्याशी हि गट्टी करणार पण जरा थांब
वेळ नाही हि तुला भेटण्याची
कारण जगण्याची आणि माझी मैत्री झाली छान
तुझी वेळ जेव्हा येईल तेव्हा निश्चितच तू येशील
पण आता वेळ नाही मला म्हणून तू जरा थांब
जगण्याची आणि माझी मैत्री चालणार आहे अजून खूप लांब
म्हणून तू जरा थांब , तू जरा थांब .....

18 

Share


surekha jagtap
Written by
surekha jagtap

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad