Bluepad | Bluepad
Bluepad
"आत्मकथा
K
Komal Gaikwad
21st Jun, 2020

Share


"आत्मकथा
"आत्मकथा" हा शब्द ऐकल्यावर असं वाटत की एखाद्या वृक्षाची आत्मकथा असावी किंवा एखाद्या पुस्तकाची, नदीची असावी. पण नाही हो, आत्मकथा फक्त एवढ्याच गोष्टींची असते असं नाही ना.
ही आत्मकथा आहे त्या जिवंत व्यक्तीची. त्या व्यक्तीमधील असलेल्या आत्म्याची आत्मकथा.
या कोविड-१९ च्या युगात आपले रक्षण करणाऱ्या त्या पोलिसांची आत्मकथा, साफ सफाई करताना मागचा पुढचा विचार न करणाऱ्या त्या सफाई कर्मचाऱ्यांची आत्मकथा, त्या रुग्णांसाठी मेहनत घेणाऱ्या त्या डॉक्टरांची आत्मकथा. एवढच नाही तर आपण हा विचार केला आहे का, की या दिवसात सुद्धा आपण आपल्या दूरच्या नातेवाईकांसोबत कशे काय संपर्क करू शकतोय? याच्या मागे सुद्धा काम करणारे लोक असतीलच की.
हे सर्व लोक नसते तर काय झालं असत? याचा विचार केलाय कोणी?
आत्मा तर सर्वांमधेच असतो हो, मग तो त्या रक्षण करणाऱ्या पोलिसांमधला असेल किंवा त्या सफाई कर्मचाऱ्यांमधला असेल किंवा त्या डॉक्टरांमधला असेल.

सफाई कर्मचाऱ्याची आत्मकथा:
जेव्हा मी घरातून बाहेर पडतो तेव्हा पासून माझा प्रवास सुरु होतो. या लॉकडाउन च्या काळात बाकी सर्वांना जरी सुट्टी असली तरी आम्हाला नसती हो. आम्ही पण एक मनुष्य प्राणीच आहोत. ठरलेल्या वेळेत आम्हाला आमची जबाबदारी पार पडायलाच लागते. आम्ही आमची जबाबदारी पार पडायला अजिबात मागे जात नाही हो. पण तुम्ही लोक बेजबाबदार पणे कुठेही कचरा फेकता, हे कस आवडेल हो आम्हाला?
जसा एखादा सैनिक सीमेवर लढायला जाताना पूर्ण तयारीत जात असतो, तसच आम्हाला सुद्धा साफ सफाई करायला जाताना पूर्ण तयारीतच जायला लागत. पण आत्ताच्या या स्थितीमधे आम्हाला जरा जास्तच काळजी घ्यायला लागते, जास्त जपून राहायला लागते अस म्हणूया.
साफ सफाई करताना आम्ही हा विचार करत नाही की ते करता करता आमच्या हाताला जर घाण लागली तर ते आम्हाला आवडणार नाही. कधी कधी आमच्या हाताला इजा पण होते तरी सुद्धा आम्ही त्या जबाबदारीतून मागे हटत नाही हो. आम्ही जर आमच्या जबाबदारीतून मागे गेलो किंवा जबाबदारीच पार पाडली नाही तर काय होईल?

पोलिसाची आत्मकथा:
पोलिस हे नाव घेतल्यावर सर्वात आधी लोकांच्या डोळ्यासमोर काय येत? तो खाकीतील देवमाणूस.. जो सिग्नल च्या कोपऱ्यावर थांबलेला व येणाऱ्या जाणाऱ्यांकडून पैसे खाणारा व त्यांचे परवाना जप्त करणारा.. झालं? लोकांनी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आमच्याबद्दल मतं बनवली आहेत. पोलिस म्हटल की डोळ्यासमोर एवढाच चित्र उभं राहत का तुमच्या? पोलिसांना चांगल म्हणाव अस कोणालाच का वाटत नाही? म्हणजेच तुम्हाला आमचं जगणं काय असत हे माहीत नसेल ही कदाचित.
आम्हा पोलिसांना वर्षाचे सण उत्सव कुटुंबियांसोबत साजरे करायचे सोडून बंदोबस्तासाठी बाहेर उन, वारा, पावसात थांबायला लागत. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमधे लोकांची धकाबुक्की होऊ नये म्हणून तुमचे रक्षण करणारे आम्ही. आमचं अर्ध आयुष्य धार्मिक सण उत्सव, मिरवणुका यांच्या बंदोबस्ताताच जातात. सोन्याची साखळी चोरणाऱ्यांपासून ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या या आमच्यावरच असतात.
या लॉकडाउन च्या काळात सुद्धा आम्हाला तुमचे रक्षण करायलाच लागते हो. उलट या दिवसात जास्त काळजी घ्यायला लागते. कोरोनाच्या दिवसात लोकांना बाहेर पडू नका सांगितल तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत. आम्ही पोलिस बाहेर पडताना संरक्षण कवच घालून बाहेर पडतो तरी आम्हाला थोडी भीति असते आणि तुम्ही लोक ५०-१००रु  मास्क लावून कशे काय बिनधास्त फिरु शकताय? हे खरच योग्य आहे का हो?

डॉक्टरांची आत्मकथा:
आमच कर्त्तव्य आहे रुग्णांना त्यांच्या आजारातून बाहेर काढण. मग तो साधा सर्दी खोकला असूद्या किंवा आत्ताचा कोरोना. जसे पोलिस आपल्या देशाचे रक्षण करतात तसेच आम्ही डॉक्टर तुमच्या आरोग्याचे रक्षण करतो. आम्हाला तर कधी कधी रात्री अपरात्री सुद्धा ऑपरेशनसाठी तयार रहायला लागते.
या कोरोनाच्या दिवसात सुद्धा आम्हाला आमच्या कुटुंबाला वेळही देता येत नाही हो आणि तुम्ही थोडा वेळ काय चेहऱ्याला मास्क लावला तर तुम्हा लोकांना लगेच गुदमारायला होत आणि आम्ही डॉक्टर नर्स ७ ते ८ तास तो मास्क काढत देखील नाही. हे खरचं खुप सोप्पं आहे का हो....?
एखादा डॉक्टर असेल, पोलिस यंत्रणा असेल किंवा सफाई कर्मचारी असतील, आम्हाला सुद्धा बाहेरून आमच्या घरी जाताना मनात एक भीति असतेच की, घरी जाताना आम्ही कोरोना तर घेऊन जात नाहीना? कधी कधी वाटत आम्हीच तर नाहीना आमच्या कुटुंबाचा शत्रु....?
आमच लोकांना एवढाच सांगण आहे की "घरीच रहा सुरक्षित रहा".

23 

Share


K
Written by
Komal Gaikwad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad