Bluepad"एक उन्हाळ्याच्या सुट्टीतली आठवण"
Bluepad

"एक उन्हाळ्याच्या सुट्टीतली आठवण"

K
Komal Gaikwad
21st Jun, 2020

Share

माझा जन्म पुण्यातला, माझ आजोळ हे सोलापुर म्हणजे थोडक्यात काय हो माझी आई सोलापुरची अस म्हणायला काहीच हरकत नाही. सोलापुर म्हटल की आठवत तो तिकडचा उन्हाचा तापमान, जे की अगदी डोक्यावरच्या केसाला कोणी आग लावल्यासारख वाटायच.
शाळेच्या परिक्षा संपल्या की एकदा कधी आजोळी जातो अस व्हायच आम्हाला. मग तर काय हो संध्याकाळच्या रेल्वे ने निघायचो आम्ही. माझे आई, बाबा, भाऊ आणि मी अस आम्ही चार जण जायचो. तिथे माझी आज्जी आमची वाट पाहत बसायची आमची आम्ही तिथे पोहचे पर्यंत. मग माझे आई बाबा गावी तीन ते चार दिवस राहुन परत पुण्याला यायचे आम्हाला गावीच सोडून. आमची गावी खुपच धमाल असायची हो.
माझी आज्जी स्वभावाने खुप प्रेमळ होती हो, अस म्हणायच झाल तर आमचा सगळा हट्ट ती पूर्ण करायची. खुप बडबडी आणि भोळ्या स्वभावाची होती. आमचे आजोबा हे अस एक व्याक्तिमत्व होत की जे दररोज सकाळी पहाटे चार वाजता उठायचे, आणि त्यांचा त्यांचा व्यायाम करायचे, अहो अगदी एवढच नाही तर अंगण सुद्धा झाडलोट करायचे आणि त्यांना त्यांचे त्यांचे काम स्वतः करायला फार आवडायचे बर का..!! ते ही आमचे खुप लाड करायचे हो. आम्ही आमच्या आजोबांना "दादा" अस म्हणायचो.
आमच्या आज्जी-दादांची जोडी तर अगदी कमालच होती हो. त्यांची कधी कधी एकमेकांमधे भांडण व्हायच, पण त्यांना एकमेकांशिवाय करमायच देखील नाही. दादा एकदा हसत हसत आम्हाला म्हणाले बघा मी तुमच्या आज्जीबरोबर ३५-४० वर्षे कशी काढली ते मलाच माहीत. अहो! हे काय अगदी गांभीर्याने बघु नका हो, हे आमच नेहमीचच आहे. आज्जीने मला माझ्या मूळ नावाने कधीच हाक मारलेली नव्हती, ती नेहमी मला"'सोनू" याच नावाने हाक मारायची.
आम्ही गावी सकाळी लवकर उठायचोच नाही.. नाही म्हणजे नाहीच हा. आमच्या आजोबांना आम्ही सकाळी उशीरापर्यंत झोपलेल बिलकुल आवडायचा नाही हो. मग काय..तुम्हाला जेव्हा उठायच तेव्हा उठा अस वैतागुन म्हणायचे ते. पण लहान मुल कुठे सकाळी लवकर उठतात का हो? बर असो. तरी आम्ही ८ ते ८:३० ला उठायचो. मग बाकी सर्व आवरून नंतर आज्जी नाश्ता दयायची. ते करुन तरी कुठे शांत बसायचो हो आम्ही नंतर आमचा खेळ सुरु व्हायचाच तर, आणि आमचा खेळ म्हणजे पूर्ण अशांतेचा खेळ असायचा अस म्हणायला काहीच हरकत नाही. तिथेच बाजूला आमचे काही मित्र-मैत्रिणी पण होते. एकदा सकाळच्या नाश्ता झाला की आम्ही तिथेच असायचो. जेव्हा आज्जी किंवा दादा हाक मारणार दुपारी जेवनासाठी तेव्हांच यायचो हो आम्ही घरी.
मग आल्यावर आम्हाला बोलणी पडायची दादांची, पण आमची आज्जी जाऊ दया लहान मुले आहेत म्हणून सोडून दया अस म्हणायची. मग दुपारी खेळून आल्यावर स्वछ हात पाय तोंड धुवून आज्जीच्या साडीच्या पदरालाच हात पुसायचो. अहो ! ती मज्जाच खुप वेगळी होती हो. मग जेवायला बसायचो आम्ही. जेवताना पण आमची आवडती वाहिनी कधीच लावली गेली नाही हो. पण त्यांच्या वाहिनी वरची मालिका आम्हाला कधी समजलीच नव्हती बर का, असो. जेवण वगैरे झाल्यावर बाहेरच्या ओट्यावर बसून मस्ती करणे, दादांच्या हातातील काठी घेऊन मस्ती चालयाची आमची. ते पाहून आज्जीला फारच हसु यायच. कधी आज्जीच्या साडीचा पदर घेऊन खेळायचो तो खेळ म्हणजे त्या साडीच्या पदराचा उपयोग करुन लपाछुपीचा खेळ खेळणे. एवढाच नाही तर अजुन भरपूर खेळ असायचा आमचा. मग तेवढ्यात बर्फाचा गोळावाला यायचा त्याची हातगाडी घेऊन मग काय सर्वजण तिथे तुटून पडायचे. त्याच्याकडे तुडुंब गर्दी व्हायची अस म्हणायला हरकत नाही.
आज्जी लगेच ओट्यावरुन उठून आमच्यासाठी घरातून मोठी वाटी आणायची हो. तोपर्यंत आम्ही हेच पाहत बसायचो की गोळावाला गोळा कस बनवत आहे. त्या दरम्यान तो चेहऱ्यावर उडणारा बर्फाचा छोटा छोटा खडा, तो त्यामधे काठी कस लावत आहे, त्या बर्फाच्या गोळ्यावर टाकलेले वेगवेगळे रंग हे सर्व पाहताना ती मज्जाच खुप वेगळी असायची बर का. अहो... गोळेवाले काका मला हाच रंग हवा आहे अस म्हणत त्याची अर्धी रंगाची बाटली रिकामी व्हायची हो.. आणि आमच्याकडून २ ते ३ बर्फाचा गोळा कधी फस्त व्हायचा ते आम्हाला ही कळायचा नाही हो.
तिथुन आमचे दादा ओरडायचे अरे! पोरांनो जास्त बर्फाचा गोळा खाऊ नका. पण आम्ही कुठे ऐकायचो, एवढ्या कडक उन्हामधे कोण बर्फाचा गोळा खाणार नाही हो सांगा तुम्हीच. हे सगळ झाल्यावर आम्ही आमच्या मित्र-मंडळींना घेऊन क्रिकेट खेळायचो आणि हो आमची बॅट ही अगदी गुडघ्यापर्यंत येईल एवढीच असायची बर का. कधी कधी तर बॅट मिळत नसेल तर लाकडी फळीच बॅट म्हणून वापरत होतो. एवढच नाही तर आमचा चेंडू हा दोऱ्याचा असायचा हो, पण अगदी मजबूत असायचा. खेळताना तो चेंडू चुकून पाण्यात जायचा मग तो चेंडू जर भिंतीवर लागला तर त्याचा पूर्ण छापच पडायचा हो. असं आम्ही कधी कधी मुद्दाम देखील करायचो. आणि कधी कधी तर चेंडू एवढा दूर जायचा तो परत सापडायचा देखील नाही. असं करत एका दिवसात आम्ही ४ ते ५
चेंडू हरवायचो. मग काय हो, हे आमच्या आज्जीला कळायचं, मग लगेच ती दादांच्या खिशातून पैसे काढून आमच्यासाठी चेंडू आणायची, एकाचवेळेस ती १० ते १५ चेंडू आणून ठेवायची.
मग हा क्रिकेटचा खेळ झाल्यावर आम्ही सायकल चालवायला जायचो. ती सायकल भाड्याने घेतलेली असायची. जणू त्यावेळी अगदी पाच रुपयांमध्ये एक तास चालवायला मिळायची आम्हाला. त्या पाच रुपयांसाठी आम्ही पहिला आज्जीकडे पैसे मागायचो आणि आज्जी दादांकडून घ्यायची आणि जेव्हा ती सायकल भाड्याने मिळायची नाही ना तेव्हा आम्ही माझ्या लहान मावशीची सायकल चालवायचो, तिला सायकल मागताना हि खूप विनंती करायला लागायची हो पण नंतर द्यायची ती चावी. मग सायकल मी आणि माझा लहान भाऊ दोघेही चालवायचो. त्या सायकलवर आम्ही या रस्त्यावरून त्या रस्त्यावर, कधी इथून तर कधी तिथून भटकायचो, असं म्हणतात ना कि सायकल चालवताना जर आपण पडलो तरच आपण सायकल शिकतो पण तस माझ्या बाबतीत कधीच झालं नाही हो. मग सायकल खेळून घरी आल कि कधी कधी आमच्या दादांची बोलणी बसायची , पण बिचारी माझी आज्जी कधीच काहीच बोलायची नाही हो आम्हाला.
अशी ही आमची उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा-मस्ती. तुम्हाला पण येत असेलच ना तुमच्या बालपणीची आठवण..?


19 

Share


K
Written by
Komal Gaikwad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad