Bluepadबाबा
Bluepad

बाबबाबा

दिपीका कदम तेंडूलकर
21st Jun, 2020

Share

कुटुंबाचा पाया जो रोवी कष्टाने, कुटुंबाचा कणा जो होई आदराने
रोवून एक एक बीज तडजोडीचे, ते बांधे एक घरकुल प्रेमाने......

बनून पंख लेकरांचे, देई उंच भरारी स्वप्नांना
वाहून ओझे दुःखाचे,ते खुलवती चेहेर्यांना

रागवुनी वेळ प्रसंगी, ते दाखवी खरी वाट
हरवू न जाऊ कधी, म्हणून घट्ट धरी आपला हाथ

घास आपल्या वाट्याचा, ते
लेकरांसाठी ठेवी
त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी ते सदा धडपडत राही

दगड काळजावर ठेवुनी पाठवी सासरी मुलीला
सुखाच्या चिंतेत मग तिच्या ,डोळा लागेना रात्रीचा

ज्या काट्यांवर चालले ते, जी रुतली त्यांना दगडं
तो मार्ग आपल्यासाठी, ते ठेवी पाखळ्यांनी सजवून

दडवून अश्रू डोळ्यातले, साठवून दुःख मनातले
निरंतर ते लढत राही, त्यांची लढाई एकट्याने

असे हे दीपस्तंभ घराचे ,ह्यांना कर्तव्यदक्ष हि म्हणावे
पडद्या मागचे हे खरे कलाकार, आपल्या जीवनाचा खरा आधार

आपले "बाबा"

-सौ.दिपीका साई तेंडूलकर


17 

Share


Written by
दिपीका कदम तेंडूलकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad