Bluepadया पृथ्वीने...!
Bluepad

या पृथ्वीने...!

Hemant Dinkar Sawale
Hemant Dinkar Sawale
21st Jun, 2020

Share

#या_पृथ्वीने...!

या पृथ्वीने कधीचं नव्हती पाहायला हवी होती माती
मातीतील जीवन
सूर्याची किरणे आणि पाण्याचा थेंब
नव्हतीचं पाहायला हवी होती हिरवीगार झाडे
झाडातील आॅक्सीजन
माणसातील कार्बनडाय ऑक्साइड....

या पृथ्वीने नव्हतीचं शिकायला हवी होती भाषा
भाषेतील क्रूरता
शत्रूसाठी डाव-प्रतिडाव
नव्हतीच शिकायला हवी होती प्रगतीची वाट
वाटेतील हेवे दावे
जिंकण्याचा अट्टाहास....

या पृथ्वीने नव्हतंच पाहिजेत काही उगवायला
तीनंही नुसतचं फिरत राहायला हवं होतं एकाकी
या माणसाच्या गॅलेक्सीच्या फार दूर

ही पृथ्वी दबलीयं आतून ओझ्याखाली
घेत आहे मरणकळा
तिचाही श्र्वास लागलाय गुदमरायला
रक्तफूला सोबत तीही लागलीये जळायला

ही पृथ्वी जगायच्या आधीचं
मिसाईलच्या स्फोटात होईल ठार
आणि ठार होतील साऱ्याचं परिस कल्पना

तेव्हा मरणाची वाट पाहण्यापेक्षा
आत्महत्येचं अमृत प्राशन करेल
ही माय पृथ्वी...!

#हेमंत_दिनकर_सावळे
7875173828

15 

Share


Hemant Dinkar Sawale
Written by
Hemant Dinkar Sawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad