Bluepadआयुष्य सोप्पं की अवघड....?
Bluepad

आयुष्य सोप्पं की अवघड....?

B
Butterfly
21st Jun, 2020

Share

आयुष्य खरचं येवढं सोप्पं असतं का ??
आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नसतं......हा त्या गोष्टीसाठी तुम्ही खरच खूप प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला ती मिळेल.....पण कधी कधी काही गोष्टी नशिबात नसतात कितीही प्रयत्न केले तरी.....मग त्यासाठी रडत बसणं किंवा स्वतः लाच त्यासाठी जबाबदार समजणं चुकीचं आहे....
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही problem चालूच असतात....आणि त्याच्याशी ते लोक deal करून घेतात....आणि आनंदात जगतात....मग त्या लोकात तुम्ही का येत नाही....तुमच्या आयुष्यात अडचणी नसतील तर त्या जगण्यात काही मजाच राहणार नाही...ह्या अडचणीचं तर आहेत ज्या आपल्याला खरा काय ते जगायला शिकवतात.....मान्य आहे तुम्ही कदाचित स्वतःचे problem कोणालाच नसाल सांगत...पण ते मनात साठवून तरी नका ठेवू....जगात " नातं " नावाचा सुद्धा प्रकार आहे...किती सगळी नाती तुमच्या आजू बाजूला असतील....बहीण ,भाऊ , आई , बाबा ....हे नाही तर ,आपली जवळची मैत्रीण किंवा एखादा चांगला मित्र.....त्यांच्या जवळ तुम्ही तुमचे मन मोकळे करूच शकता.....येवढ्या सगळ्या माणसांच्या गर्दीत जगायला शिका त्यात हरवून जाऊ नका.....कारण हरवलेली प्रत्येक गोष्ट परत भेटेल याची काहीच गॅरंटी नसते.....म्हणून स्वतःला गमवू नका....

आयुष्य खूप सुंदर आहे ...ते जगायला शिका... स्वतःला संपवून घेणं हे कोणत्याच प्रोब्लेम च solution नाही...... स्वतः ला संपवायला सुद्धा हिंमत लागते....त्याच्यात पण खूप हिंमत होती..उगाच नाही तो यशाच्या येवढया उंच शिखरावर पोहोचला.....पण शेवटी स्वतःची हिंमत नेमका कुठे दाखवायची हे ठरवण्यात चुकला.......
# RIP Sushant....

15 

Share


B
Written by
Butterfly

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad