Bluepadसावली
Bluepad

सावली

l
leena
21st Jun, 2020

Share

सावली असावी मायेची
चांदण्यासम शीतलतेची
कधी आश्वासक हळुवार स्पर्शाची
गोठलेल्या दवबिंदुसम आरसपानी
कधी मोठी होते कधी छोटेखानी
फिरताना दिपस्तंभ भासणारी
'स्व' ला निर्लेप स्विकारणारी
कधी वटवृक्षाच्या सावलीत विसावं
तर कधी सर्वांना आपल्या छायेत सामावं
नको कधी भेदरलेली पडछाया
नसती घालमेल जीवाला
सावली सम नाही दुजा
सुख दुःखास देई सम दर्जा
अविरत साथ देते
जन्मजन्मांतरीची सोबती असते
आपल्याबरोबर येते आपल्याबरोबर जातें
पाठशिवणीसारखी पाठीराखी असते
———----------------- लीनता

14 

Share


l
Written by
leena

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad