Bluepadजागतिक योग दिन... २१ जून.
Bluepad

जागतिक योग दिन... २१ जून.
लहान मुले आणि योगा.

डॉ अमित.
डॉ अमित.
21st Jun, 2020

Share

जागतिक योग दिन... २१ जून.
लहान मुले आणि योगा.

आज जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने मी आपणाला लहान मुले आणि योग याचा परस्पर संबंध आणि योगा चा लहान मुलांमध्ये होणारा फायदा याविषयी थोडे मार्गदर्शन करणार आहे.
बालरोग तज्ञ असल्या कारणाने मी लहान मुलांमधील येणाऱ्या समस्या आणि त्यांचं
योगा'च्या मदतीने निराकरण या विषयी अधिक सविस्तर पणे या गोष्टींचा अभ्यास करू शकतो.
२१ जून हा सर्वात मोठा _दीर्घ दिवस.
योगा चा अभ्यास करून आपण आपलं आयुष्य ही दीर्घायुष्य व निरोगी करावे हा संदेश देतो.
उत्तरायण संपून दक्षिणायन या दिवशी सुरू होते.

योगा संस्कृत शब्द 'युज' युती
मन व शरीर
विचार आणि कृती
संयम व समाधान
मानव आणि निसर्ग
योगा : शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक बदल घडवून आणतो.

लहान मुले आणि योगा.....

का गरज का आहे?
स्पर्धात्मक युग__शाळा खेळ क्लासेस पालक आणि शिक्षक यांच्या अपेक्षा
मोबाईल फोन आणि कम्प्युटर यांचा वाढता वापर

या सर्वांमुळे लहान मुलांत
तणाव
उदासीनता
चिडचिडेपणा
थकवा
स्थुलता
वाढत आहे.

योगा शरीरात HPA axis & sympathetic nervous system चे नियंत्रण करते.
योग्य वय
6 ते 8 वर्षे ठराविक आसन.
14 वर्षे इतर आसन.
Skeletal system is not fully developed.

लहान मुलांना "नेचरल योगी" असे म्हणतात

Fearless. भीती नसते
Flexible लवचिक
Full of energy चैतन्यमय
Fresh always टवटवीत
Fast learners. लवकर शिकतात
Find fun in everything गंमत शोधतात
Fond of animals प्राणी खूप आवडतात

खूप योगा आसनांची नावं प्राण्यांच्या व पक्षांच्या नावाने आहेत

मारजरासन
श्वानासन
मयुरासन
भुजंगासन
उसटरासन
मर्कटासन
सिंहासन
तितली आसन
मंडुकासन
कुर्मासन

विमानासन
नौकासन
पर्वतासन

विशेष म्हणजे खास लहान मुलांच्या वरून दोन आसने आहेत

बाळासन. Child pose
आनंदी बाळासन Happy Baby Pose

लहान मुलांना संगित खूप आवडते
नाद योगा
उप योगा

योगाचे लहान मुलांना होणारे फायदे....

C -- calm,& refresh body & mind; concentration

H --heightened focus; healthy habits ;height improvement

I --lmprove intelligence IQ and Immunity

L. --learning improvement;

D. --decision making capacity
improve

Depression reduce

Development of brain

R --Release stress

E--Equilibrium balance

N--negativity reduce & positive attitude

Noncompetitive
Nonexpensive

लहान मुलांचे आजार आणि योगा...

A--Anxiety; ADHD; Autism

B--bullying means unwanted and
agressive behaviour.
Breakdown

C--computer dependency and compulsive obsessive disorder

D--drug abuse and disturbed sleep

E--eating disorders

Emotional disturbances

F--Fattiness/Obesity.

Passive Yoga in infants helps to improve milestones

सर्वात लहान योगा शिक्षक ७ वर्षे
चीन सन चुयांग. त्याला ऑटीझम होता.
योगा अभ्यास केला वयाच्या अवघ्या दोन वर्षांपासून.
आता तो मोठ्या माणसांना शिकवतो.
सर्वात वयोवृद्ध शिक्षक
ननमाळ 98 वर्षे कोइंबतूर लहान मुलांना योगा शिकवतात

लहान मुलांतील वाढत्या आत्महत्या
दर तासाला एक विद्यार्थी.
शिक्षण व्यवस्था
वाढत्या अपेक्षा
पालक शिक्षक आणि मुलं समन्वय गरजेचे.
सुजाण पालकत्व बद्दल बोलताना खलील जिब्रानने सांगितले आहे की पालकत्व डोळ्यांच्या पापण्या प्रमाणे असावं म्हणजे पापण्या जसे डोळयांचे रक्षण करतात पण डोळ्यातल्या स्वप्नाला धक्का लागू देत नाही तसं आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर न लादता त्यांच्या स्वप्नांच्या पाठिशी राहणं.

चला मुलांनो सारे मिळूनी
करु हसत खेळत योगा
थोडी आसने थोडा प्राणायाम
मिळून बनतो हा योगा

आसने यातील खूपच न्यारी
नावे त्यांना पशू-पक्षांची सारी
श्वान सिंह माकड मांजर
आसनातून या भेटतील क्षणभर

तंदुरुस्त राहते शरीर अन्
प्रसन्न राहते रे आपले मन
पळून जातो थकवा आणि
दूर राहते रे आजारपणं

स्वप्नपूर्ती साठी अभ्यासाला
देऊया योगासनांची जोड
भविष्यातला भारत देश मग
असेल सारया जगात वरचढ.
तेंव्हा आपण सर्वांनी मिळून आपल्या मुलांमध्ये योगा ची आवड निर्माण करणे,योगा ला प्रोत्साहन देणे या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,नव्हे ही आता येणाऱ्या काळाची गरजच आहे.
तुम्हाला माझा हा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा...

सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

डॉ अमित लाड.
नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ
शिल्पा हॉस्पिटल.
बार्शी.
जिल्हा सोलापूर.

13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad