Bluepadटर्न....बट नॉट यू टर्न
Bluepad

टर्न....बट नॉट यू टर्न

अनुराधा कदम
20th Jun, 2020

Share

अनुराधा कदम, कोल्हापूर

वळण यावं लागतं... आयुष्याच्या प्रवासातही
सरळसोट रस्तादेखील नको वाटायला लागतो कधी कधी...
पण...समोरचं फर्लांगभर स्वच्छपणे दाखवणारा सरळ रस्ता सोडून
आडवाटेच्या...पुढची वाट चाचपडायला लावणाऱ्या वळणवाटा धुंडाळण्याचं धाडस होत नाही बरेचदा..
अर्थात मानवी स्वभावच तो....
सरळदिशेत जात असताना साहजिकच इकडे तिकडे मान वळवली जात नाही...
त्यामुळे डावीकडची वाहणारी नदी बघायची राहून जाते...
उजवीकडची गर्द झाडी न पाहताच डोळ्याआड जाते...
उंच डोंगर...खोल दऱ्यांकडेही लक्ष देत नाही आपण...
प्रवासातील कितीतरी आनंददायी...प्रेक्षणीय गोष्टींना मुकतो ना आपण
फक्त समोरचा रस्ता कापत... ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी घड्याळी गणितं मांडत बसतो...
बघूया थोडं बदलून स्वत:ला... एक वळण देऊन प्रवासाला
छंदांचे क्षितिज रूंदावून त्यातच करिअर करण्याचा विचार करायलाही हरकत नाहीय
वाहत्या नद्यांसारखा एखादा कौशल्याचा प्रवाह असेल आयुष्यात तर त्या लाटांवर स्वार व्हायलाही मजा येईल...
गर्द हिरव्या झाडांसारखी बहरलेली कला असेल तर तिला आभाळ देण्यातही वेगळंच सुख असेलच की...
मग...चला तर...घेऊया एक वळण...आपल्याला हव्या असलेल्या दिशेने
वाट गुळगुळीत नसेल कदाचित...खाचखळगेही असू शकतील... पण जिथे पोहोचू ती जागा अढळ असेल...
ध्रुवासारखी...कुणीही 'उठ' असे न म्हणणारी...
अडथळा आला तर टर्न घ्या.... यू टर्न घेण्यापेक्षा तो टर्न आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल...

14 

Share


Written by
अनुराधा कदम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad