Bluepad | Bluepad
Bluepad
नातं तुझं माझं
K
Kalyani Borse
20th Jun, 2020

Share

तुझं माझं असं छानस नातं असावं....
तिथे दिसण्यावर नाही तर,
असण्यावर प्रेम असावं.....
मी रुसण्यात expert असावी
तर तु मनवण्यात perfect असावा....
असं तुझं माझं छानस प्रेमाचं नातं असावं.....
न व्यक्त होताच एकमेकांच्या मनातलं कळावं
कितीही भांडलो तरी ते तुझ्या माझ्यातच solve व्हावं......
असं तुझं माझं छानस प्रेमाचं नातं असावं....
तुझ्या माझ्या नात्यात सागरासारखं
अथांग प्रेम असावं......
दूरदूर पर्यंत त्याला Ego,Attitude चा
किनारा नसावा......
असं तुझं माझं छानस प्रेमाचं नातं असावं......
कधी रागावलीस मी तर तु मला
समजून घ्यावं.....
तर कधी चिडलास तु तर मी तुला
जाणून घ्यावं......
असं तुझं माझं छानस प्रेमाचं नातं असावं......
सीता रामा सारखं पवित्र असावं,
राधा कृष्णा सारखं निरागस असावं,
तर शंकर पार्वती सारखं एकरूप असावं
असं तुझं माझं छानस प्रेमाचं नातं असावं......
कधी लहान लेकरासारखं खोडकर असावं,
तर कधी मित्रमैत्रिणींन सारखं कारण नसताना
भांडणार असावं......
तर कधी समजूतदार होऊन संसाराच गणित
सोडवणार असावं.....
असं तुझं माझं छानस प्रेमाचं नातं असावं.....

29 

Share


K
Written by
Kalyani Borse

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad