Bluepad | Bluepad
Bluepad
सुखकर्ता..दु:खहर्त्या गणरायाचे आगमन: चैतन्याचे अन् मांगल्याचे..                      
7
7878
19th Sep, 2023

Share

🚩🌼🚩🌼🕉️🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵
▬▬▬▬▬▬    🚩ஜ۩۩ஜ🚩▬▬▬▬▬▬▬▬ ▬ 
         सुखकर्ता..दु:खहर्त्या  गणरायाचे आगमन :                                                              चैतन्याचे अन् मांगल्याचे.......    ▬▬▬▬▬▬▬▬▬ ஜ۩۩ஜ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬   ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
       आज देशच नव्हेतर,अवघ्या जगभरात सुखकर्त्या अन दु:खहर्त्याच प्रतिवर्षा प्रमाणे आगमन झाल.गणेशोत्सवाला आजपासुन सुरुवात झाली.
उत्सव एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वर्गालाच आवडतात.असं नसतं तर,
उत्सव अबालवृद्गांपासुन,सर्वांनाच आवडतात महाकवी कालिदासाने 'उत्सवप्रिय खलू मनुष्य असे उत्सवा संदर्भात यथोचित वर्णन केले आहे.      आपल्या रोजच्या धंदा,रोजगार यात रमलेल्या शुष्क,रुक्ष जीवन व्यवहाराखाली दबलेला माणूस या जीवनातून अल्पकालीन का होईना आनंदीत होतो.उत्सव आपल्याला स्फुतीॅ देतात.अधून मधून येणारे उत्सव आपल्याला प्रिय वाटतात.
.उत्सवामध्ये उल्हास जर त्याचा'प्रेय भाग असेल तर,उत्सवात असलेले जीवन दर्शन हा त्याच्यातील'श्रेय' भागच.कोणताही उत्सव साजरा करण्या मागे प्रेय आणि श्रेय या दोघांचा समन्वय असला पाहिजे.
उत्सव चांगल्या रीतीने साजरे करु
तेव्हाच शक्य असते. त्या उत्सवाच्या मागे असलेले भाव रहस्य समजून-
उमजून जर उत्सव साजरे केले तर,ते उत्सव खऱ्या अर्थाने साजरे होतात. उत्सवा मागे श्रद्धा भावाचे
अनन्यसाधारण महत्त्व आहे भावशून्य अंतकरणाने साजरे केले जाणारे उत्सव यंत्रवत बनतात आणि माणसाच्या जीवनामध्ये जडत्व ही आणतात. 
    शतकानुशतके परंपरेने साजरे केले केले जाणारे उत्सव यातून काही अर्थ निघत नाही. आज यातुन वेळ शक्ती व संपत्तीचा अपव्यय या उत्सवाच्या निमित्ताने होत असलेला आपण पाहतो.ही वस्तुस्थिती नाकारुन चालणारच नाही.
.श्रद्धापूर्ण अंत:करणाने व सारासार बुध्दीने उत्सव साजरे केले तरच ते उत्सव जीवनात आनंद निर्माण करतात.जीवनातल्या निराशेला झटकून टाकून उत्साहाचा संचार घडवतात.
    आपल्या देशाचा सांस्कृतिक इतिहास पुस्तकाच्या पानात दडलेला नसून जिवंत उत्सवातून जिवंतपणा दाखवतो.उत्सवातून ऐक्य भावना प्रसन्नता जागृत झाली तर,त्या उत्सवात जिवंतपणा येतो.त्यासाठी आपण आपले उत्सव खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजेत.उत्सवातून आपलं जीवनदर्शन घडलं पाहिजे. असाच गणेशचतुर्थी व गणेशोत्सव! ह्या उत्सवातुन आपला गणप्रमुख कसा असला पाहिजे.याचं महत्त्व समजावून सांगतो.हा उत्सव केवळ घरीच पूजावयाचा नाही तर,
सार्वजनिक गणेशोत्सवातुन समाज मनावर परिवर्तनाचा ठसा उमटवण्यासाठीचा आहे.
"ओम गण गणनाथाय,गजाननाय,
लम्बोदराय, परशूहस्तय,मेघनाथाय,दुर्गापुत्राय,
मम कार्य सिद्धि कुरु कुरु स्वहा:"
 गणपती,एकदंत,वक्रतुंड,
वरदविनायक अशा अनेकविध नावांनी सुखकर्ता,गणेश.गणांचा- ईश वा प्रभु असा आहे.गण म्हणजे,शिव व पार्वतीचे सेवक होय.गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.संतांनी श्री गणेशाला अभिनव कलात्मक अलंकारिक काव्यप्रतिभेद्वारे वंदन केले आहे.
ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेच्या प्रारंभी आत्मरूप गणेशाचं वर्ण अलौकिक ओवी लिहुन गणेशस्तवन केल आहे.    ॐनमोजी आद्या।वेद प्रतिपाद्या।     
जय जय स्वंवेद्या। आत्मरूपा।।  
श्रीगणेश हे विश्वाचं अधिस्थान.
सर्वव्यापी,आत्मरुपी ओंकाररुप.तूच गणपती;अशा अनेकविध रूपांनी नटलेला आहेस.हे परमात्मा,श्री गणेशा!तू सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश आहेस. वेद गणेशाचे वर्णन करताना गणेशाला वंदन करतात.
चारही वेद हे श्रीगणेशाचे शरीर तर,स्मृती हे अवयव,अठरा पुराणे हे श्रीगणेशाचे अलंकार.पुराणातील सुरेख शब्दरचना हे श्रीगणेशाच्या अंगावरील भरजरी वस्त्र होत. ज्ञानरूप गणेशाचे वर्णन करताना गणेशाला ज्ञानराज म्हणतात.
सांख्यशास्र हा श्रींचा वरदायक हात होय.धर्मशास्त्र हा अभयहस्त.ब्रह्म सुखाचा आनंद ही सोंड.सुखसंवाद शुभ्र दात होय.ज्ञान सूक्ष्म असते ते गणेशाची बारीक डोळेच.पूर्व व उत्तर मीमांसा हे दोन सुपासारखे कान होय.द्गेताद्गेत मत हे गंडस्थळ आणि दषोनिषदे ही श्रीगणेशाच्या मूकुटातील दोन सुगंधी फुले.
  ॐकारातील तीन मात्रा आहेत त्यात श्रीगणेश सामावलेला आहे.
समर्थांनी आपल्या दासबोधातून अत्यंत कलात्मक व लालित्यपूर्ण वंदन केले आहे -                        
 ॐ नमोजी गणनायका| सर्वसिद्धी फलदायेका।                              अज्ञानभ्रांतीछेदका। बोधरुपा।।           ज्ञानरुपी सद्गुरु हेच श्रीगणेश आहेत.
जीवनात सद्गुरूंच प्रगट होणे हीच गणेश कृपा.समर्थांनी म्हटल तर,माउलींनी या ओमकाररुप गणेशाच रूप या ओवीतुन वर्णन केल आहे.
देवा तूचि गणेशु ।सकलार्थ मति प्रकाशु ।
मने निवृत्ती दासू अवधा रिजो जी।।
 माऊली म्हणतात',"देवा,तूच प्रत्यक्ष गणेश रूप आहेस.सर्व विद्यांचा तु अधिपती.तुच आमच्या जीवनाचा प्रकाश आहेस.
गणपतीला सहा हात असून,हीच सहा दर्शने आहेत.शब्दरूप वेद हेच गणपतीच रेखीव शरीर आहे.अठरा पुराणे त्याच्या अंगावरील चढावाची वस्रे आहेत.परशू हे तर्कशास्राचे तर अंकुश हे नीतीशास्राचे प्रतिक.
सुसंवादाच्या मधुरसाने भरलेला मोदक हा प्रसाद.सुसंवादातुन एकमत व्हावे.हे दर्शविणारा एकच दात एकदंत.उंदीर हे त्याचेवाहन.नियोजनपुर्वक
निवडलेल;सतत कार्यमग्न व चपळ व तीक्ष्ण दातांनी कुरतडतच क्षणात पळुन जाणारा उंदीर आपणास चपळतेचा संदेश देतो.मोठे कान हे जास्तीत जास्त ऐकण्याचा सल्ला देतात.मोठे पोट चांगल्या,वाईट गोष्टी पोटात साठवण्याचा संदेश मोठ पोट देत असतात.
गणपतीच रूप माउलींनी आपल्या चिंतनातुन उभे केले आहे.गणपती ही छोट्या छोट्या गणराज्यांचा प्रमुख हे प्रतिकात्मक रुपच.ही देवता विद्येची,
रिद्वि अन सिद्भी मिळवुन देणारी.          गणेशाला महाराष्ट्रात हे गणपती नाव विशेष लोकप्रिय आहे.विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात.हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे.विनायक- शब्दाचा अर्थ'वि'म्हणजे,विशिष्टरूपाने जो नायक आहे तो.याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. आपल्या भक्तगणांवर सतत कृपादृष्टी ठेवणार,अस गणरायाच नयनमनोहर,
चित्ताकर्षकरुप.गणरायाच्या सुंदर मुतीॅतुन आपणास दिसत.अन हे रुप
गणेशचतुथीॅच्या दिवशी डोळ्यांसमोर मुर्तीरुपान उभ राहते.                      "सर्वविघ्न हरो देवा,सर्वविघ्न विवजीॅतम।  
लंबोदरो विशालाक्षो वन्देही गजाननम् ।।
 भक्तांची सर्वदु:ख दूर करून त्यांना सुख प्रदान करणारा हा गजाननाला हिंदू धर्मात फार महत्त्वाचे स्थान आहे.
सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते.
शिवपार्वतीच्या पुत्राला विद्येचे दैवत मानले जाते.असं म्हणतात,ज्या दिवशी भगवान शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले.
त्यादिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी असेही म्हटल्या जाते.
आपण कुठल्याही कामाचा श्रीगणेशा गणेश पुजनाने करतो.
    कार्यारंभी पुजन तुझे सकल जन करती।
     इच्छा पुरवुनी सकलां देसी सुखशांती सुमती।।
  या आरतीतील मंगल शब्दांनी गणेशवंदना आपण करत असतो.
ब्रम्हा,विष्णु,महेश यांनीही गणेशास अग्रपुजेचा मान दिला.
आपण आजही गणेशपुजनानच शूभ कार्याची सुरुवात करतो.१४विद्या अन ६४कलांचा अधिपती व रिद्वी अन सिद्विचाही पती व अधिपती असलेल मंगलमुतीॅच हे अगाधकीतीॅच,
सुखकर्ता,दू:खहर्त्याच गणेशरुप आपणा सर्वांनाच चैतन्य प्रदान करतो.दररोज पुजली जाणारी ही देवता.प्रथमनाम वक्रतुंड,दुसरे एकदंत,तिसरे कृृृृष्णपिंगाक्ष,चवथे श्री लंबोदर .. अशा अनेक नामरुपांनी प्रसिद्व असलेल्या गजाननाच पुजन आपण रोजच करत असतो.गणेश चतुथीॅला शाडुमातीच्या गणशमतीॅच पुजन करुन दिड दिवस,सात दिवस,
अकरा दिवस अस गणेशपुजन करुन आपण त्या मुतीॅच विसर्जन करतो.       खरतर,गणेशपुजन हजारो वर्षापासुन घरोघरी केल जात.१८९२ पर्यंत हा उत्सव घरापुरता मर्यादित होता. १८९३ साली लोकमान्य टिळकांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले.दिड दिवस पुजला जाणार्‍या गणेशोत्सवाला दहा दिवस चालणार्‍या सार्वजनिक महोत्सवाचे स्वरूप दिले.या उत्सवाच्या निमित्ताने गणनायकाच पुजन करत, ब्रिटिशांच्या गुलामगीरीतुन मुक्ततेसाठीचा जननायक बनवल.असा हा गणेशोत्सव  साजरा करण्यामागे टिळकांचा व्यापक दृृृृष्टिकोन होता.
इंग्रजांच्या  राजकीय व मानसिक गुलामीतुन जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा हा मार्ग त्यांना सुचला.
   गणेशोत्सवाच्या माध्यमाने भारतभुमीला स्वतंत्र करण्यासाठी मोठ्या कुशलतेन भारतातील जनतेला एकत्रित आणून,त्यांच्यात बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रूपाने जनजागृती  निर्माण करत व त्याचबरोबर आपली संस्कृती व धर्म याबाबतही जनतेच्या मनात नवी अस्मिता जागृत होईल.अशी भावना टिळकांच्या मनात होती.म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात माणूस जोडण्याचे कार्यक्रम आयोजित केले.
त्यामुळे राष्ट्र जोडण्यास तरुणांचा हातभार लागला.देवा करता मनुष्य नसून,मनुष्या करता देवाचे अस्तित्व आहे.हे टिळकांनी लोकांच एकत्रिकरण या उत्सवातून केले.
आपसातील भेदाभेद विसरून,
भेदाभेद सारे अमंगळ मानून सर्व हिंदूंनी एकत्रित यावे.या एकत्रित येण्यातून स्वातंत्र्यासाठी राष्ट्र जागृती करणे. ही टिळकांची गणेशोत्सवाच्या मागची संकल्पना होती.यासाठी लोकमान्यांनी  गणेशाला सार्वजनिक रूपात आणलं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला व शिवजयंतीला सुरुवात केली.                    पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांना  एकत्र येऊन संघटना बनवणे शक्य नव्हते मग त्यांच्यात स्वातंत्र्य चळवळ रुजवण्यासाठीची जागृती निर्माण होण्यासह,समाजमनात स्वराज्य,
स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण व ब्रिटिश मालावर बहिष्कार या चतु:सूत्रीचा प्रचार व प्रसार गणेशोत्सवाच्या  माध्यमाने करत;स्वातंत्र्याची चळवळ तळागाळात पोहोचवली.ब्रिटिशांची कोंडी करून देशाला स्वातंत्र्य मिळावे.यासाठी चळवळ म्हणून टिळकांनी पुण्यात केसरीवाड्यात गणेश उत्सवाची सुरुवात केली.
त्यानंतर सरदार खाजगीवाले यांनी ग्वाल्हेरला सर्वात प्रथम महाराष्ट्राबाहेर गणेशोत्सव साजरा केला.पुढे देशभर गणेशोत्सव व स्वातंत्र्य चळवळ रूजत गेली.व्याख्यानाच्या माध्यमाने जनप्रबोधनाच अनमोल कार्य या उत्सवान केल.यातून माणूस जोडण्याचं अनमोल कार्य घडत गेलं.
    स्वातंत्र्यानंतरही आजतागत ही दोन्ही उत्सव धुमधडाक्यात थाटात साजरे केले जातात.स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे,सामाजिक प्रबोधनाचे व्यासपीठ होते.ते दर्जेदार कार्यक्रम या व्यासपीठावर सादर होत.
अनेक नावाजलेल्या कलाकारांनी व नवोदित कलाकारांनी आपली कला या व्यासपीठावर सादर करून आपल्या कलेला सादर केल.त्यांच्या कलेला सादर करण्यासाठीच व्यासपीठही या उत्सवान दिल. 
काळ बदलत गेला आणि गणेशोत्सवाचे रूप ही बदलत गेले. झगमगटाला व दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली.धर्मप्रेमापेक्षा पैशाची किंमत वाढली.झगमगाट आणि डोळे दिपवणार्‍या सजावटीवर  वारेमाप खर्च केला जाऊ लागला.
समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश कुठेतरी हरवत चालला.असं वाटतंय.मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी काही मोजकीच सार्वजनिक मंडळे,वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक कार्य करत असतात.हे जरी खरे असले तरी, गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचायला आजही हा उत्सव माध्यम म्हणुन वापरायला हवा.हे न घडता तो समाजमनात पोहोचत नाही आणि या उत्सवाचे झगमगते अर्थकारण सामान्य माणसाला कोड्यात पाडते.
टिळकांच्या काळातील गणेशोत्सव; आज एक 'इव्हेंट' म्हणून साजरा केला जातोय.असेही वाटायला लागले.आज हा उत्सव मात्र एक प्रथा बनली.
स्वराज्याच सुराज्यात रुपांतर घडवण अपेक्षित असताना हा उत्सव मनोरंजनासाठी,मौजमस्तीसाठी वापरला जाउ लागला.लोकवर्गणी गोळा करायची अन धांगडधिंगा अकरा दिवस चालवायचा हे सुत्र आज चालु आहे.समाजातला सामान्यच नव्हेतर,वैचारिक स्तरावर संपन्न असणारा विचारवंत या उत्सावापासुन स्व:तला दुर ठेवु लागला.नाईलाजाने वर्गणी देउन मोकळा होवु लागला.हे आजच्या गणेशोत्सवाच वास्तव रुप नाकारुन चालणारच नाही.
गणेशोत्सवाच टिळकांच्या काळ्तल अन आज आ लेल हे रुप यात जमिनअस्मानाच अंतर.काळानुरुप आलेल असल तरी,त्यात बदल करणही गरजेच आहे.हिंदु समाज प्रवाहीत आहे.अनिष्ठ रुढींना त्यागुन तो सहजतेन इष्ट ते रुजवत जातो.
यावरही बुद्गिवंतांच चिंतन सुरु आहेच.
गणेशोत्सवाच हे रुप बदलवण्याचा प्रयत्नही चालु आहे.
हिंदू समाज बदलाला व टिकेला सहजतेन स्विकारतो.बदल घडवुनही आणतो.तो देवधर्माला कट्टरतेन कधीच घेत नाही की,कुणी टिका केली तर;तो"सर तन से जुदा.."कधीच करत नाही.
आजकाल हिंदुनाव धारण करुन स्व:तच स्व:तला सुधारणावादी
पुरोगामी,मानुन अनिष्ट प्रथांबरोबर इष्ट प्रथांनाही नावबोट ठरवु लागणार्‍यांनी.
हिंदुफोबियाग्रस्तांच्या कावीळ झालेल्या दृष्टीस केवळ हिंदु सण,
उत्सव,धामिॅक विधीस,उत्सवात अंधश्रद्गाच दिसते.यास तेअंधश्रद्वेच्या परिमाणानच मोजत जातात.त्यांनी फ्रान्समधल्या शिक्षकाचा,देशभरात
सर तन से जुदा गॅगवाल्यांनाही थोड आपल ब्रम्हज्ञान पाजाव.अस सांगावसही वाटत.
अशा या दूटप्पी लोकांनी असंघटीत हिंदूच्या मनात आजवर फुटीचच बीज रोवली.यांना हिंदुंनी स्विकारल नाही ना त्यांना विरोध केला.अशा दुटप्पी लोकांपासुन समाज दुर राहीला.
त्यांच्या विचारांना समाजाने केराची टोपली दाखवली.
हे खर असल तरी,होत या उत्सवाच्या माध्यमाने मांगल्याची अन चैतन्याची निर्माण होणारी उर्जा समाजहीतासाठी वापरल्या जावी. लोकमान्यांचा भाव या उत्सवातुन आजही आपण प्रकट करु शकतो.
सार्वजनिक गणेशोत्सवाच विभत्स रुप आजही पालटवत आपण यात मांगल्य आणु शकतो.
या शुभयोगान समाजमनातल्या जातीपातीची बांडगुळ फेकुन सशक्त हिंदु समाजाच प्रकटीकरण घडवु शकतो.पर्यावरण रक्षणाचा वसा मंडळ घेवु शकतात.
आजही देशात काही देशद्रोही मंडळी अराजकतेच वातावरण निर्माण करताहेत.रस्त्यावर पत्थरबाजी करणारे तरुण,तिरंगा यात्रेवर,कावड यात्रेवर,उत्सवावर पत्थरबाजी करणारे,"भारत तेरे तुकडे होंगे..अशी खूलेआम घोषणा व कृत्य करणारे,
सेना,संविधानीक संस्थेवरचा अविश्वास वाढवणारी वक्तवे करत आपली कृष्णकृत्ये लपवणारे,आपली लायकी न ओळखता,
सावरकरांसारख्या देशभक्तावर चिखलफेक करणार्‍यांचा संविधानिक मार्गाने निषेध करु शकतो.आराध्याचा अपमान झाला म्हणून रस्त्यावर येवुन पोलीस यंत्रणा,न्यायव्यवस्थेवर दबाब टाकत,खुलेआम समर्थकांची गळे कापणारे व याउलट हिंदुदेवदेवतांची टिंगल उडवणे हा आपला जन्मसिद्ग अधिकार मानणारे,अशा देशविघातक कार्याकड मतपेटीवर लक्ष ठेवुन अंधानूकरण करणारे नेते व हिंदुत्व फोबियाने ग्रस्त बुद्गिवंत मंडळी
खुलेआम समर्थन करत देशद्रोही कार्यात सहभागी होणार्‍याला वाचवणारे बुद्गीवंत उजळमाथ्याने फिरताहेत.एवढच नव्हेतर,ही मंडळी
 समाजमनात फुटीची बीज पेरताहेत.
    गणेशोसवाच्या या उत्सवातून माणसांना जोडतच त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची बीज पेरण्याच कार्य मंडळ करु शकतात.याची गरज आज देशाला व समाजाला भासते आहे.
दुदेॅवाने तसे प्रयत्न होताना मात्र,आज हे दिसतच नाही.समाजमनातील फुटीची भावना जाउन ऐकतेच्या,
समतेच्या,समरसतेच्या भावनांची रुजवणुक या उत्सवाच्या माध्यमाने व्हावी. 
      समाजमनात पसरलेली धर्मांधता,जातीयवाद व मनामनात पसरलेली द्बेषभावना दुर करुन माणुस जोडण्याचा लोकमान्यांचा विचार गणेशोत्सवाच्या या उत्सवातुन मनामनात रुजवण्याचा प्रयत्न करत,या मनामनात धैर्यपेरणी करु या..
गणनायकउत्सवाच्या मनःपूर्वक सदिच्छा.
✒______शब्दसेवा
चंदु चक्रवार 
भोकर जि. नांदेड
▬▬▬▬▬▬    🚩ஜ۩۩ஜ🚩▬▬▬▬▬▬▬▬ ▬ 
🚩🌼🚩🌼🕉️🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵🚩🌼🚩🏵

0 

Share


7
Written by
7878

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad