Bluepad | Bluepad
Bluepad
प्रारब्ध आणि सदगुरू
प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
19th Sep, 2023

Share

तुमच्या दिवस भराच्या कर्माने तुमचे प्रारब्ध तयार होत असते जसे रोज कामाला जाता आणि तुमच्या पगार तुमच्या खात्यात जमा होत राहातो अगदी तसाच कर्माचा संचय होऊन प्रारब्ध तयार होऊ लागते. आणि त्या प्रमाणे तुम्ही ते भोगत असता चांगल्या वाईट पध्दतीने ते खाते तुम्ही वापरत असता. कितेक जन्माचे हे प्रारब्ध असते त्याचा काही हिशोब नसतो. म्हणून कधी कधी लवकर फळ मिळते तर कधी खूप उशीरा मिळते. तुम्ही जन्माला आलात तुमचे काही तरी प्रारब्ध आहे म्हणून जर काही संचय नसता तर तुम्ही जन्म घेतला नसता. काही तरी प्रारब्धाची फेड करायची आहे. म्हणूनच तुमचा जन्म झाला आहे. ती शांतपणे समजूतीने भोगता यावे म्हणून आपल्या सदगुरु चरणी लिन व्हायचे असते. कारण कितीही वाईट प्रारब्ध असले तरी त्याला सामोरे जायची ताकद गुरु मुळे मिळते. ते म्हणजेच प्रारब्ध बदलणे होय. खूप बदलाचा प्रभाव अनुभवायचा असेल तर वाल्याचा वालमिक बनायला सज्ज व्हा. कारण सदगुरु कृपेने त्याचे वाईटातले वाईट प्रारब्ध बदले. हे खूप मोठे उदाहरण आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. या सगळ्यात तुमचे कर्म आणि भाव खूप महत्त्वाचे असते. भाव आहे तर तुम्हाला वाव आहे. नाही तर सारे काही भकास आहे. म्हणून कोणतेही कर्म करताना आर्त भाव महत्त्वाचा असतो. नुसती आरती करून चालत नाही तर त्या आरतीतला आर्त भाव तुमच्या ह्रदयात उतरणे, रूजने खूप महत्त्वाचे असते. आरतीतील आ हा प्रत्यक्ष तुमच्या आत्मारामचा आ आहे. तर त्या आरतीचा नक्की फायदा करुन घ्या. म्हणजे नुसते म्हणायची म्हणून आरती म्हणू नका तर स्वतःत काही तरी बदल घडवायचा म्हणून आरती बोला किंवा करा. म्हणून सदगुरूला ही आर्त भावावाने आळवा म्हणजे जीवनाचे सार्थक होईल आणि सार्थ भाव प्रकट होऊ लागेल आणि मग तेव्हा गुरू प्रारब्ध बदलास सुरूवात होईल.
गुरू प्रारब्ध बदलतात त्यासाठी तुम्हाला गुरू जे सांगेल ते करायचे असते. ना की, गुरु जो करेल ते करायचे म्हणजे हे असे झाले थोडक्यात (गुरु कहें सो कर गुरू करे सो न कर अस). परंतु आपल कस झाले आहे मी खूप देवाचे करतो. खूप जप करतो, ऐवढा वेळ पुजेत घालवतो. हे सारे मी आपल्याला आपल्या प्रारब्धात जास्तच अडकून ठेवतात. आणि पाय जास्त कर्माच्या चिखलात रुतत जातो. आणि आपल्या ते कळत ही नाही. आणि नंतर त्याचा मोठा डोंगर तयार होतो. आणि मग परत गुरू कडे धावा करतो. परंतु सुरवाती पासून जर हा धावा केला असता तर आता जो आपल्याला त्रास वाटतो तो वाटला नसता. आणि देव जर रागवला तर गुरु त्यातून सोडवतो. परंतु गुरु रागवला तर काय? म्हणून सतत सदगुरु चरणाला धरून रहा ते सोडू नका. आयुष्यात गुरु बरेच येतील परंतु सदगुरु एकच असतो. आपल्या आत्म्याचा आत्मा राम एकच आपला सदगुरु हे ध्यानात ठेवा. गुरूच्या बाह्य रुपाला भुलू नका ते एक तत्त्व आहे. चैतन्य आहे त्या चैतन्याला पकडा. हे जेव्हा पकडाल तेव्हा तुमच्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते. आणि प्रारब्धात बदल होऊ लागता. सदगुरु ज्याला फक्त देणे माहिती आहे. मग तुम्ही घेताना ही का कमी पडत आहात आहो तो द्यालाच बसला आहे. तुम्ही फक्त साद घाला आणि एक एक चॉकलेट काय मागता पुर्ण चॉकलेटचा डबा मागा म्हणजे त्या देवालाच मागुन घ्या म्हणजे काही मागायची गरज लागणार नाही. प्रारब्ध हे तुमचे कर्माचे गणित आहे. तुमचे पुर्वकर्म जे वर्तमानात भोगण्यासाठी दत्त म्हणून उभ्या ठाकले आहेत. आपली ही भारतभूमी जी संताच्या, पदस्पर्शाने भारली आहे. तीथे अशक्य असे काही नाही. म्हणून प्रारब्ध बदलण्याची ताकद नक्कीच सदगुरु मध्ये आहे. तिला अव्हान देता आले पाहिजे तेवढी आपली पात्रता हवी. दान ही सतपात्री असावे असे म्हटले जाते. तसाच भक्त ही सतपात्र असवा लागतो. प्रारब्धातील बंध जेव्हा सुटू लागतात तेव्हा तुम्ही हळूहळू मोकळे होऊ लागता. आणि गुरू चरणी लिन होऊ लागता. साधी गोष्ट आहे. जेव्हा राम प्रभू शबरी कडे जात असतात तर काही ऋषी म्हणतात की, तुम्ही जावू नका ती अस्पृश्य आहे. (अछूत) आहे. तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात की, थांबा तुम्हाला कळत कस नाही की एका स्रिला अस बोलता तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग जर तुम्हाला एखाद्याचा आदर करणे जमत नसेल एक स्त्री जी बाळाला जन्म देते, कधी बहीण, आई, बायको ती कधी अस्पृश्य असु शकत नाही. शरीराचा विटाळ दूर करता येईल. परंतु मनाला आणि विचाराला झालेला विटाळ कसा दुर कराल त्यासाठी मनाची सात्विकता लागते. आणि हो तुमचे कर्म ठरवते की तुम्ही अस्पृश्य आहात का नाही. कर्म जर चांगले असेल तर त्याहून पवित्र असे काही नाही. तेव्हा जेव्हा प्रभू राम शबरीला भेटले तेव्हा आपोआप प्रारब्ध बदले. ती भरून पावली म्हणून गुरु प्रारब्ध बदलतात ते असे. तुमच्या कर्माची गती तुम्हाला तुमच्या प्रारब्धाच्या गतीतून बाहेर पडण्यास मदत करत असते. आणि मग सदगुरु प्रारब्धास सुरूवात होते.
धन्यवाद!
प्रीती लांडगे.
प्रारब्ध आणि सदगुरू
प्रारब्ध आणि सदगुरू

0 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad