Bluepad | Bluepad
Bluepad
दगड शेवटच्या घावाने तुटतो याचा अर्थ पहिला घाव व्यर्थ जातो असं नाही
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
19th Sep, 2023

Share

*दगड शेवटच्या घावाने तुटतो याचा अर्थ पहिला घाव व्यर्थ जातो असं नाही*
जीवन हे यश अपयशाचा लपंडाव आहे.सातत्य निरंतरता हा यशस्वी होण्यासाठी प्रभावी मंत्र असतो.सातत्य आणि निरंतर प्रयत्न असतील तर जगात अशक्य काहीच नाही.आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा कोणत्याही क्षेत्रातील यश हे पाहिल्या प्रयत्नात आपल्याला मिळेलच असं नाही .पण पाहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही म्हणजे ते मिळणार नाही असं नाही त्या साठी आणखी प्रयत्न करावे लागतील एवढाच त्याचा अंतिम अर्थ असतो. मग शेवटी यश हे मिळणारच.सृष्टी वर कठिण अस काहीच नसतं.पण त्यासाठी खडतर संघर्ष करत अहोरात्र मेहनत घेतली गेली पाहिजे.आणि सातत्य टिकवून ठेवल तर एक दिवस आपण यशाला गवसणी घालणारच या मध्ये तीळमात्र शंका नाही. अपयश हि यशाची पहिली पायरी असते.पहिली पायरी चढल्या शिवाय शेवटची पायरी येत नाही दगड हा कधी पहिल्या घावात तुटतो तर कधी कधी अनेक घाव घालावे लागतात.दगड शेवटच्या घावाने तुटला तर पहिला घाव व्यर्थ जात नाही.महणुन दगड तुटेपर्यंत प्रयत्न थांबवता कामा नये.यशाच्या संदर्भातील संकल्पना, परिकल्पना, व्याख्या हि प्रत्येकाच्या दृष्टीने अनुभव परत्वे वेगवेगळी असु असते .अपयशाचे पण तसेच आहे म्हणजे यश अपयशाचे मुल्यमापन हे प्रत्येकाच्या लेखी सारखं नसतं . एखाद्याला अगदी पाहिल्या प्रयत्नात यश मिळत तर एखाद्याला अगदी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर यशाचा ताळमेळ लागतो . म्हणजे व्यक्तीपरत्वे यशाची संकल्पना वेगळी आहे.अनेकदा दगड हा पाहिल्याच घावात तुटतो .तर कधी कधी अगदी शेवटच्या घावाने तुटतो .आता पहिला घाव आणि शेवटचा घाव या मधील अंतर सुद्धा वेगळं असत . फक्त निरंतर प्रयत्न केले तर मग मात्र पहिला घाव व्यर्थ जात नाही.हे वास्तव आहे पण प्रयत्न खंडीत झाले अथवा मध्येच धेय्य बद्दल झाला किंवा आपण थकलो त्याच बरोबर प्रयत्न करण्याचा नाद सोडला .तर मग मात्र पहिला घाव व्यर्थ गेला म्हणून समजा .आणि पहिला घाव व्यर्थ जाऊ देयचा नसेल तर प्रयत्ना मध्ये सातत्य टिकवून ठेवणं आवश्यक आहे.महणुन कोणताही प्रयत्न हा अंतिम प्रयत्न कधीच नसतो .म्हणूनच प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे .अनंत आणि निरंतर प्रयत्न हे अशक्यप्राय बाब शक्य करू शकतात . नेमकं साध्य मिळण्याच्या वेळी आपण दुर्लक्ष केलं तर फार काही उल्लेखनीय उपयोग होत नाही . पहिल्या प्रयत्नात यश पदरात पडल अस खुप कमी लोकांच्या बाबतीत घडतं पण जर आपल्याला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर मग आपण प्रयत्न बंद करायचे का ? तर नक्कीच नाही.आपण प्रयत्न बंद केले तर आपला पहिला घाव व्यर्थ जाईल .आणि दगड फुटतच नाही असा आपल्या सह इतर अनेकांचा समज होईल .पण हा समज सत्य नाही . म्हणून अनेकदा यश मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सातत्य टिकवून ठेवल. तर शेवटच्या क्षणी यश पदरात पडत.म्हणून पहिला प्रयत्न केल्यानंतर यश मिळेपर्यंत अंखडीत पणे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत .यश हे मिळणारच या मध्ये काहीही शंका नाही.पहिला घाव घातला आणि घाव घालण बंद केलं तर दगड तोडण्याचा उपक्रम आपल्या नावावर नोंदविला जाऊ शकत नाही.किंवा शेवटाचा अंतिम घाव घालण्या आगोदरच आपण प्रयत्न बंद केले तरीही दगड तोडण्याचा उपक्रम आपल्या नावावर नोंदविला जाणार नाही.पहिल्या घावा पासुन शेवटच्या घावा पर्यंत सातत्याने अंखडितपणे प्रयत्न चालू ठेवले तरच दगड तोडण्याचा उपक्रम आपल्या नावावर नोंदविला जातो .हे अगदी सरळ सरळ गणित आहे म्हणजेच पहिला घाव हा कधीच व्यर्थ जात नाही.हे जरी सत्य असल तरी पण शेवटच्या घावा पर्यंत प्रयत्न बंद नाही झाले पाहिजे.तरच आपल्या पहिल्या घावाला महत्व आहे.महणुन दगड हा कधीही शेवटच्या घावानेच तुटतो .याचा अर्थ असा होत नाही कि आपला पहिला घाव हा व्यर्थ जातो . हिच समांतर परिस्थिती आपल्या जीवनातील आहे. आपण आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो . तेव्हा काही लोकांना अगदी पहिल्याच प्रयत्नात यश मिळत .आणि काही लोकांच्या वाट्याला अपयश येत.आता ज्यांच्या बाबतीत अपयश आलं त्यांनी निराश नाराज नाही झालं पाहिजे.आणि तणाव न घेता आपल्याला ज्या संदर्भात यश मिळवायचं आहे .त्या अनुषंगाने अंखडीत प्रयत्न बंद न करता.नियमित पणे सातत्य ठेवुन नियमित प्रयत्न केले पाहिजे.जेणेकरून आपला पहिला घाव व्यर्थ जाणार नाही .आपण सातत्याने प्रयत्न केले तर एक दिवस यश आपल्याला नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.पण जर आपल्या प्रयत्नांमध्ये खंड पडला नाही तर आणि यदाकदाचित खंड पडला तर मग मात्र आपला पहिला प्रयत्न व्यर्थ जाईल .म्हणून प्रयत्न करत असताना एकदा सुरुवात केली कि यश पदरात पडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने थांबलं पाहिजे.मग विषय कोणताही असो. दगड तुटतोच प्रयत्न थांबले नाही पहिजेत तसंच यश हे मिळतच पण प्रयत्ना मध्ये सातत्य टिकवून ठेवल पाहिजे आणि प्रयत्ना मध्ये खंड नाही पडला पाहिजे.महणुन सुरवातीचा पहिला प्रयत्न ते यश मिळेपर्यंतचा प्रयत्न हाच यशाचा प्रवास आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad