Bluepad | Bluepad
Bluepad
जिवनाची गती संगती निर्धारित करत असल्याने सुसंगत करा
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
18th Sep, 2023

Share

*जीवनाची गती संगती निर्धारित करत असल्याने सुसंगत करा*
सज्जनांची संगती कधीचं वाया अथवा व्यर्थ जात नाही.जीवनात झालेली प्रगती अथवा अधोगती याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या संगती जबाबदार असते म्हणून सुसंगत धरा.जीवनात घडण्यासाठी अथवा बिघडण्यासाठी संगतीचा प्रभाव अथवा अभाव हा निश्चितच परिणाम कारक असतो . ज्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत संगतीचा प्रभाव अथवा अभाव होत नाही असे खास व्यक्तिमत्त्व याला अपवाद असल्याने सर्वसाधारण व्यक्ती नसतात.मानव हा असा प्राणी आहे जो एकटा राहु शकत नाही . संगती हि आवश्यक आहेच पण संगती आवश्यक आहे महणुन कुसंगती केली तर चालेल का?तर नक्कीच चालणार नाही .आपलं अहितच होईल या उलट जर आपल्यला सुसंगत लाभली तर आपलं काही हित नाही झालं तर किमान अहित तर नक्कीच होणार नाही. हि मात्र नक्की खात्री असते . म्हणून एकवेळ पंगत चुकली तर चालेल पण संगती चुकु देऊ नका . आणि आपल्या जीवनाचे हित करा .जीवन ही अखंड प्रयत्नांची प्रयोगशाळा आहे. प्रयत्न थांबला की प्रगती थांबली, प्रयत्न योग्य दिशेने आहे की अयोग्य दिशेने आहे. त्यावर जीवनाच्या प्रयोगशाळेतून उत्पन्न होणार्‍या यश-अपयशाचा निर्देशांक अवलंबून असतो. सध्या सोशल मिडीयाचे डिजीटल युग आहे .तसं तसं तण तणाव वाढत आहे त्याचा परिणाम म्हणून नैराश्य निर्माण होणं स्वाभाविक आहे.पण असं नैराश्य निर्माण होण्याची कारणं म्हणजे आपली संगती चुकली हे निश्चित आहे . संगती चुकली तर ती वेळीच सुधारली पाहिजे पण आपण मात्र तसं न करता त्याच चक्रव्युहात अडकुन पडतो परिणामी मनातील अस्थिरता संपुष्टात येत नाही मग अस्थिरता संपुष्टात येण्याच्या दृष्टीने संगती शोधतो पण अशा वेळी योग्य संगती लाभली तर हित होत होईल आणि संगती चुकली तर अहित होणं निश्चित असतं. आपले जिवन हे एवढे सहज आहे का? जिवनातील प्रत्येक निर्णय घेत असतांना आपण परिपूर्ण विचार करतो का हे पण खुप महत्वाचे आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, नातेसंबंध या सर्वं बाबींमध्ये निर्णय घेत असतांना आपण कोणता विवेक वापरतो यावर त्याचे यश-अपयश अवलंबून असते. शैक्षणिक क्षेत्रात बाबतीत आपण शालेय जिवनात जगत असतांना आपले ध्येय निश्चीत पाहिजे की आपण शिक्षण कशासाठी घेतोय? तर मग शिक्षण घेत असतांना आपले ध्येय निश्चीत करा .त्या ध्येयानुसार मार्गक्रमण प्रयत्न करा. ध्येयानुसार केलेला प्रयत्न कधीही अपयशाकडे घेवून जात नाही. आणि जर आपण ध्येयापासून भरकटलो गेलो तर मग मात्र अपयश, नैराश्य येणारच आणि सर्व घडून गेल्यानंतर आपण याचे खापर नक्कीच कोणावर तरी फोडणार त्यापेक्षा ध्येयानुसार मार्गक्रमण करत असतांना यत्किंचीत सुद्धा कुठल्याही व्यक्ती च्या विचाराच्या संपर्कात जातांना स्वतःचा विवेक वापरा .आणि आपण आपल्या ध्येयापासून भरकटणार नाही. याची परिपूर्ण दक्षता घ्या. जेणेकरुन आपल्या शैक्षणिक अपयशाचे खापर कोणावरही फोडण्याची वेळ येणार नाही. शैक्षणिक प्रगती गडबड झाली तर ओळखा आपली संगती गडबड झाली आहे वेळीच संगती मध्ये सुधारणा करा.सामाजिक जिवन जगतांना प्रचंड खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेक चांगल्या व्यक्तीमत्वांच जीवन सामाजिक निर्णय चुकल्याने संपुष्टात आल्याचे आपण पहातो. याचे कारणही तसेच आहे. सामाजिक जीवनात संगत आणि पंगत चुकली की माणुस तिथेच संपला असे निश्चीत होते. संगत म्हणजे नैसर्गिक नातेसंबंधा व्यतिरिक्त आपण आपल्या जीवनातील आपण विविध कारणांमुळे निर्माण केलेली मैत्री पण यामध्ये सन्मित्र , सात्विक, मिळाले तर हित होईल . चांगले मित्र आयुष्यात मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे . सुसंगती हि वेगवेगळ्या व्यसना पासुन दुर ठेवते. आचारविचार शुद्ध राहणे.सात्विक वृत्ती ह्या बाबी सामाजिक जिवनात तंतोतंत पाळल्या पाहिजेत.आपली सुसंगती हि अपयशावर सुद्धा विजय मिळवू शकते .एवढी प्रचंड सकारात्मक शक्ति ही सुसंगती मध्ये असते . सुसंगती हि यशस्वी जीवनाची शिल्पकार आहे .हि काळ्या दगडावरची रेघ आहे हे मात्र निश्चीत. सामाजिक जिवनात चुकीची संगती लाभू नये म्हणून जीवनाला अध्यात्मिक शक्तीची जोड द्या. आर्थिक जिवन जगतांना असताना न्याय, निती, धर्म याचे पालन केले तर आपल्यापासून लोकांना त्रास होणार नाही .आणि लोकांपासूनही आपल्याला होणार नाही. सिकंदराने जग जिंकले आणि शेवटी मन जिंकता आले नाही .शेवटी त्याचा अंत हा दुःखातच झाला .त्यामुळे जिवनात समाधान मिळेल, शांती मिळेल आणि समाधानकारक अवस्थेत झोप येईल .अशा पद्धतीने अर्थाजन करावे. जेणेकरुन केलेलं अर्थाजन आपल्यासह पुढील पिढीच्या कामी येईल. विशेष करुन राजकीय जीवनात प्रवेश करतांना खुप विचारपुर्वक निर्णय घ्यावेत. आपण अगोदर स्वयंपूर्ण आर्थिक स्थितीने सक्षम स्वंय पुर्ण झाल्याशिवाय स्वतःवर राजकीय पक्षाचा विचारांचा सामाजिक विचारसरणी चा तसेच समाजात कार्य करणार्‍या विविध सामाजिक संघटनांच्या विचारांचा परिणाम होवू देवू नये. जेणेकरुन याचे दुर्गामी परिणाम आपल्या जीवनावर होणारा नाही याची दक्षता घ्यावी.
नातेसंबंध जीवन जगत असतांना जीवनाच्या विविध पैलूवर वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध निर्माण होतात आणि याचे जवळपास नव्वद टक्केच्या पुढे दुष्परिणामच पहावयास मिळतात. कारण यातील संपूर्ण अज्ञान महाभयानक आहे. नातेसंबंधाचे पावित्र्य आणि चुकीच्या लोकांशी झालेले नातेसंबंध हे पश्चातापास कारण होवून नैराश्यामध्ये जाण्यास भाग पाडतात. त्या अनुषंगाने आपण सचेत असले पाहिजे. जेणेकरुन सर्वांशी नातेसंबंध दृढ राहतील.
आपण जर सचेत आणि जागृत असू आणि संपूर्ण ज्ञानावरुन आपल्या विवेकावरुन निर्णय घेतले तर जीवनामध्ये आपल्याला कधीही पश्चाताप किंवा आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे संगती हि चुकू देवू नका हीच काळाची आवश्यकता आहे. नैसर्गिक नाते संबंध बदलता येत नाहीत .पण आपण निर्माण केलेले नाते संबंध मैत्री हि सुसंगत हितकारक असली पाहिजे.जेणेकरून दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत . म्हणून संगती मध्ये सुसंगत खुप महत्वाची बाब आहे जीवनाच वाटोळं होऊ देयच नसेल तर सुंसगत करा .ज्ञानाची संगती तर जीवनातील सगळ्यात लाभदायक संगती आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
मो.9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad