Bluepad | Bluepad
Bluepad
वेळ
सौ.मेघा नांदखेडकर
सौ.मेघा नांदखेडकर
18th Sep, 2023

Share

वेळ निघून गेल्यावर कळत,
खरच निर्णय होता चूक
वेळ मात्र आपली वेळ
साधते किती अचूक!
वेळ निघून गेल्यावर कळत
दुरुनच सौंदर्य साजिरे
जवळ जाता खाचखळगे
दगडधोंड्याविण ना काही रे
वेळ निघून गेल्यावर कळत
परमसुख नामस्मरण्यात
आयुष्य गमावल्यावर कृष्णा
तुझ्यासाठी झुरण्यात
वेळ निघून गेल्यावर कळत,
किती सुंदर होती ही सृष्टी!
तुझी वाट पाहण्यात का
निरर्थक दवडली दृष्टी
वेळ निघून गेल्यावर कळत
होत प्रेमामृत चंद्र-चांदण्यांत
व्यर्थ खर्चले जीवन-धन
त्या चंद्रावर पाणी शोधण्यात
वेळ निघून गेल्यावर कळत
कमावली धनप्रतिष्ठा नश्वर
गमावला अनमोल जन्म
पण भेटलाच नाही ईश्वर
वेळ निघून गेल्यावर कळत
असतो एखादा परीसही दगडांत
त्याला लाथाडूनही तो नकळत
करतो सुवर्णांत रुपांतरीत
वेळ

1 

Share


सौ.मेघा नांदखेडकर
Written by
सौ.मेघा नांदखेडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad