ओढ लागे आता स्वता: स धरती वरच्या स्वर्गी हरविण्या ची | वेड लागे देवा आता नाना विध रुपे तुझी पाहणया ची | रम्य ही स्वर्गा हुनी लंका गीत का कुणी रचियले फुकाचे |नाना विध रंगा ची उधळण इथे चंद्र सुर्य राज्य करती सुखा चे |धन्यवाद देतोय मनुजा कि धरती आमची धन लक्शमी आई | आकाश पित्या ची माया ममतेची पर्जन्य वृष्टी तु डोई वरी देई l देवा तुझा कृतकृत्य भाव जाणता जाणता आता डोळा पाणी येई | जन्म दिला पृथ्वी वर ही ही कुठली असे बा पुण्याई |सुलभा (काव्या )वाघ 🌹17=9=2022