Bluepad | Bluepad
Bluepad
सारं काही तिच्यासाठी...
Deepak Nalawade
Deepak Nalawade
17th Sep, 2023

Share

सारं काही तिच्यासाठी...
असं कुठं असतं कां कधी
'सारं काही तिच्यासाठी'
तिच तर असते कायम
सेवेसाठी आपल्या
ती असते कधी माता
तर कधी असते भगिनी
कधी होते ती पत्नी
तिच असते आपल्यासाठी
ती असते सरिता, नदी
सुखदुःख घेऊन संगती
शोधत जाते सागराला
सेवा करावया त्याची
ती म्हणजेच असते स्त्री
थकत नाही कधीच
कर्तव्यातून पळून
जात नाही कधीच
ती आहे एक देवी
ती आहे एक आदिशक्ती
नाही तिला थकवा ना वेदना
ती आहे बलिदानाची शक्ती
तिला नसतो कधीच मान
ना कसलाही अपमान
वरुन दिसली जरी शांत
तरी न पेलणारेही घेते ओझं
तिच्यामुळेच तर प्रकाश
पसरतो सर्वांच्या घरीदारी
तिच्या असण्याने सृष्टी होई तृप्त
प्रकृतीचे नावच आहे नारी
तिच तर असते कायम
सेवेसाठी आपल्या मग
आपणही नको कां करायला
सारं काही तिच्यासाठी
सारं काही तिच्यासाठी...
दिपक बजरंग नलावडे
१७/०९/२०२३

0 

Share


Deepak Nalawade
Written by
Deepak Nalawade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad