सांग म्हणे मालक कशी तुला मदत करू...
तुझ्यासाठी झुरू न तुझ्यासाठी मरू.....
तुझ्या सांगण्यावर उठू म्हणशील तेव्हाच बसू...
सांग म्हणे मालक काय अजून करू....
वाटेल तेव्हा सांगाल तस कष्ट आपण करू....
संगतीला माझ्या सर्ज्या अन् मी तुमचा राज्या....
सतत, तुमच्यासाठीच राबू.....
जास्त नको मालक तेव्हढ प्रेम आमच्यावर करा
कुठे गरज मोठी आमची सोबत आम्हा ठेवा
सांग म्हणे मालक किती अजून राबू
फक्त दिशा आम्हास दाखवा काम पूर्णच आम्ही करू.....
खुप बर वाटत जेव्हा मालकीण डोक्यावर चारा घेऊन येते
आम्हाला खायला देताना मोठ्या मायेने कुरवाळते....
आमचे गुणगान साऱ्या गावभर सांगते ....
माझ्या सर्ज्या राज्या सारखं कोणी दुसरं नाही
मोठ्या गर्वाने सांगते....
आला सण पोळ्याचा गाव सर सजते.....लहान असो वा मोठे आमच्या सोबत रांगते
सांग म्हणे मालक किती अजून राबू
तुला म्हणे अजून कशी मदत करू
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺
By. Dipapooja Sunil Pawar