Bluepad | Bluepad
Bluepad
कट्यावर पाय आपण देतो आणि दोष मात्र काटयाला देतो
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
17th Sep, 2023

Share

*काट्यावर पाय आपण देतो आणि दोष मात्र काट्याला देतो*
योग्यता ओळखण्यात चुक झाली तर पश्चात्ताप पदरी पडण निश्चित असतं .जीवनात आपण जेव्हा एखाद्यावर विश्वास टाकतो आणि दगाफटका होतो तेव्हा आपण त्याला दोष देतो पण मुळात हे अर्धसत्य आहे.चुक आपली असते आपणं चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतो हि त्याची नाही तर आपली चुक असते पण अज्ञान हि चुक मान्य करू देत नाही.आपल्या चुकीचा दोष कोणावर तरी ढकलून आपण स्वतः ला दोष मुक्त समजणे हा मानवी वृत्ती, स्वभावाचा भाग आहे. पण बहुतांश लोक असे पण आहेत कि जे आपली चुक असेल तर ते अगदी नम्र पणे चुक मान्य करून आपल्या मध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात.काटे हे आपल्या जागी योग्य असतात .आपणच काट्या पर्यंत पोहचतो .त्यावर पाय देतो आणि वेदना झाल्यानंतर आपल्या लक्षात येते.कि आपल काही तरी चुकलं आहे. आपला पाय काट्यावर पडला आहे .पण हे लक्षात येई पर्यंत काटा हा आपल्या पायात खोल पर्यंत रूतलेला असतो .हिच परिस्थिती आपल्या जीवनात अनेकदा अनेक विषयांशी निगडित आपल्या सोबत घडत असते .आपण जीवनाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना खुप सज्जग दक्ष सावध ,असलं पाहिजे.अनेक व्यवहार असतील , अनेक संबंध असतील या सगळ्यांना प्रस्थापित करत असताना आपली दक्षता हिच आपली सुरक्षितता आहे .आपली दक्षता घेण्या मध्ये चुक झाली कि आपल्याला फटका निश्चित बसणारच या मध्ये काही शंका नाही.कारण काट्यावर पाय पडल्यावर काटा पायाला वेदना देणारच आणि मग या सगळ्या मध्ये दोष काट्यांचा कुठे येतो . पण तरी देखील हे काटु सत्य कोणीही मान्य करत नाही .योग्य काय आणि अयोग्य काय आहे हे आपल्यला योग्य वेळी लक्षात आलच पाहिजे.येत नाही हि बाब वेगळी आहे .आणि लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते.नंतर लक्षात येऊन काही उपयोग होत नाही . बरंच पाणी तोपर्यंत पुलाखालून निघून गेलल असतं.महणुन आपल्या जीवनातील चुकीच्या निर्णयाचे दोष इतरांना देण्यापेक्षा आपण स्वतः गांभिर्याने गांभिर्य पुर्वक मार्गक्रमण केल पाहिजे.जेणेकरून आपला पाय काट्यावर पडणार नाही . आणि आपल्यला कारण नसताना अनावश्यक त्रास होणार नाही.याची काळजी आणि दक्षता हि फक्त आपणच घेऊ शकतो. बाहुतांश वेळा आपला निर्णय ,आपली कृती चुकीची अयोग्य असते . हे कृती करताना निर्णय घेताना आपल्या लक्षात येत नाही.जेव्हा त्या निर्णयाचे कृतीचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतात.तेव्हा मात्र आपले डोळे उघडतात .मग तिथुन पुढे आपण त्याच मुल्यमापन करायला सुरुवात करतो . आणि अंतिमतः कोणावर तरी दोष निश्चित करून खोटी खोटी मन शांती मिळवतो. आपल्या पायात काटा मोडला तर काट्याचा दोष नव्हताच मुळी कारण आपणं पाय देताना योग्य लक्ष दिलं नाही .आपण सज्जग ,दक्ष नव्हतो . किंवा अति आत्मविश्वासाने आपण पाय दिला हि आपली चुक आहे .आपण केलेली कृती,घेतलेला निर्णय हा चुक आहे कि बरोबर आहे .हे कृती करताना लक्षात येत नाही .पण परिणाम आल्यावर समजते . कृती करताना चिंतन मंथन करण क्रमप्राप्त असतं पण आपण तसं करत नाहीत. कोणतीही कृती करण्या अगोदर, निर्णय घेतेवेळी अनंत वेळा त्याच्या बाबतीत सकारात्मक, नकारात्मक, चांगल्या, वाईट, पद्धतीने साधक ,बाधक विचार मंथन अथवा परिणामा विषयी आत्मचिंतन करण आवश्यक असत .पण आपण असं चिंतन करतो का ? तर नाही करत . आणि मग फल निष्पत्ती योग्य होत नाही .आणि मग शेवटी काट्यावर दोष ढकलून आपण मोकळे होतो .तसा तो मानवी स्वभावाचा वृत्ती चा भाग आहे .एखादी कृती करताना अगोदर त्या अनुषंगाने मंथन चिंतन करण हे आपलं कर्तव्य, जबाबदारी आहे.आपण ती योग्यपणे पार पाडली पाहिजे.जेणेकरून त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागणार नाहीत.पण आपण तसं करत नाही. रस्त्यावर चालताना आपला पाय कळत न कळत काट्यावर पडला .तर त्रास हा होणारच आपण चालताना जर आपल्या पायाला दगडाची ठेस लागली तर दगड बिचारा काय करणार तो आपल्या जागी स्थिर आहे .आपलं चालताना लक्ष व्यवस्थित नव्हतं . म्हणून आपल्याला ठेस लागली.तसच आपल्या पायात काटा रूतला तर या मध्ये काट्यांचा काही दोष नाही .चुक आपली आहे .पण मान्य करण्याची दानत वृत्ती आपल्या मध्ये कुठे आहे .आपण पायत काटा टोचला ठेस लागली त्याच बरोबर जीवनातील व्यवहार, नातेसंबंधात फसवणूक झाली तर चुकीची संगती लाभुन आतोनात नुकसानाला सामोरं जावं लागतं तर याचा दोष आपण इतरांच्या वर ढकलतो. पण ते वास्तविक सत्य नाही योग्य नाही .आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी जागरूक, सज्जग ,दक्ष,असलं पाहिजे. जेणेकरून अपाला पाय चुकुन सुद्धा काट्यावर पडणार नाही.याची दक्षाता काळजी आपण घेतली तर आपल्या पायाला काट्यांचा त्रास होणार नाही.तसच आपल्या जीवनातील विविध समस्या, व्यवहार,अडचणी, नातेसंबंध,या संदर्भात आपण दक्ष राहुण आचरण केले तर आपलं नुकसान होणार नाही. आणि आपल्याला होणारा मनस्ताप , मानसिक त्रास होणार नाही . पश्चात्ताप करण्याची देखिल गरज पडणार नाही .म्हणून सज्जग, दक्ष, काळजी पुर्वक मार्गक्रमण करा . सदैव सचेत राहुन , जागरूक दक्ष सचेत असु तितकेच आपण सुरक्षित राहु . अन्यथा काट्यावर पाय पडण निश्चित आहे आणि पर्यायी वेदना तर होणारच पण सुरक्षितता हिच काट्या पासुन मुक्ती आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad