Bluepad | Bluepad
Bluepad
मराठवाडा मुक्ती संग्रामातील राष्ट्र संत भगवान बाबा व सद्गुरू वामान भाऊ यांचे योगदान
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
16th Sep, 2023

Share

*मराठवाडा मुक्ती संग्रामात राष्ट्र संत भगवान बाबा व सद्गुरू वामन भाऊ यांचे योगदान विसरता येणार नाही*
मराठवाडा मुक्ती संग्रामातील हजारो लाखो स्वातंत्र्य सेनानी हे भगवान गड व गहिनाथ गडाचे निषनात भक्त होते हे वास्तव सत्य आहे.पण संत हे जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे विभुती असतात म्हणून श्रेय हे त्यांच्या लेखी गौण असतं .पण राष्ट्र निर्माण करत असताना शांतीच्या मार्गाने दिलेल योगदान विसरता येणार नाही. मराठावाडा मुक्ती संग्राम असेल किंवा देशाचा स्वातंत्र्य लढा हा यशस्वी होण्यासाठी अनेक दृश्य अदृश्य शक्तीचं योगदान होत. त्या पैकी जसे पैलू समोर येतिल तसं योगदान पण समोर येत आहे. आपल्या मातृभूमीला आजाद करण्यासाठी त्या त्या कालखंडात आप आपल्या पद्धतीने आणि आप आपल्या मार्गने योगदान दिलेले आहे . न्याय हक्क स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मार्ग जरी वेगवेगळे असले तरी सगळ्यांचं अंतिम धेय्य एकच होत .संतांच्या दृष्टीने अहिंसेच्या मार्गाने लोकांना योग्य दिशेने घेऊन जाण्याच खुप मोठं कौशल्य शक्ति हि संतांच्या वाणी मध्ये असते . त्याकाळी निजामशाही राजवटीत अहिंसा सत्य मार्गाने राष्ट्र संत भगवान बाबा यांनी पशुहत्या प्रथा बंद करण्यासाठी चिंचाळा तालुका वडवणी येथुन प्रत्यक्ष गोहत्याबंद केली .
संत हे जगद् उद्धारक असतात. लोक कल्याणासाठी सदैव समर्पित असतात. लोक उद्धार संतांच्या जीवन कार्यातील मुख्य व अंतिम उद्देश असतो त्यामुळे, भजन-कीर्तन, दिंडी, सप्ताह ही कारणे तर संतांनी रचियलेले स्त्रोत आहेत म्हणजे देशप्रेमी, धर्मप्रेमी लोकांची/भक्तांची फळी निर्माण करून संस्कारयुक्त पिढी निर्माण झाली पाहिजे हा संतांच्या मनातील प्रांजळ उद्देश असतो हे त्रिवार सत्य.महाराष्ट्राच्या मातीला संत परंपरेचा वारसा लाभलेला असुन याच परंपरेतील विसाव्या शतकात राष्ट्रसंत भगवानबाबा व सद्गुरु वामनभाऊ महाराज यांचा जन्म झाला. याच वेळी नेमकं संपूर्ण देशावर इंग्रजांच्या जुलूमी व हुकूमशाही राज्याचं संकटं असताना ते संकटं समुळ नष्ट करण्यासाठी ज्ञान हे सर्वोत्तम योगदान आहे आणि हेच आध्यत्मिक ज्ञान मार्गातुन संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज यांनी अहोरात्र प्रयत्न करून राज्यात खुप मोठ्या भक्तांची पर्यायाने देशप्रेमींची फळी निर्माण केली लोकं शिकले-समजले आत्मविश्वास निर्माण झाला आणि अन्याय विरूद्ध ज्ञान मार्गावरून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चालू असलेल्या या अखंड लढ्यामध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी झाले.
मराठवाडा मुक्ती संग्राम असो की देशांचा स्वातंत्र्य लढा भगवानगड , गहिनीनाथगड या अध्यात्मिक ज्ञानपीठाच योगदान विसरून चालणार नाही.भक्ती मार्ग ,ज्ञानमार्ग कर्म मार्ग ते स्वातंत्र्याचा राजमार्ग व्हाया गहिनीनाथ गड ते धौम्यगड(भगवान गड) पुर्णत्वास गेला. सर्वसाधारण लोकांना अध्यात्माच्या प्रवाहात आणुन त्यांच्या मनात चैतन्य, आत्मविश्वास,सद्-सद्मार्गाने मार्गक्रमण करण्याची , वृत्ती निर्माण करणं, आपल्या वर कोणी अन्याय करत असेल तर प्रतिकार करण्यासाठी हिंसा हा पर्याय नाही. ज्ञान, भक्ति मार्गाने सुद्धा अन्याय अत्याचार विरूदध सदाचार व शांतता मार्गाने लढाई लढता येऊ शकते आणि आपला हक्क, अधिकार मिळवता येतो. हाच मंत्र,हीच प्रेरणा घेऊन हजारोंच्या संख्येने स्वतंत्र सौनिक लढण्यासाठी तयार झाले .मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी हजारो स्वातंत्र्य सैनिक हे सद्गुरू वामनभाऊ महाराज व राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भक्त शिष्यगण होते आणि शेवटी त्यांच्या लढ्याला यश मिळाले. हैदराबाद स्थित निजामाची शाही राजवट संपुष्टात आली व अखंड भारत देशात मराठवाडा विलीन झाला. यासाठी लोकांच्या मनात विश्वास चैतन्य, अन्याय विरूद्ध लढण्याची ताकद निर्माण करण्याचे प्रेरणादायी कार्य करत लोकजागृती केली ती सदगुरु वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा यांनी पण त्याच श्रेय घेतलं नाही.तसं पाहीलं तर संत हे शांति ब्रह्म असतात जगाचं प्रांजळमनाने कल्याण करणं हाच संत अवताराचा मुख्य उद्देश असतो म्हणुन कोणत्याही कार्याचे श्रेय घेण्याची लालसा अभिलाषा मनिषा ही संतांची नसते म्हणून त्याकाळी सुद्धा सद्गुरू वामनभाऊ महाराज व राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी या कार्याचं श्रेय घेतलं नाही. उलट तात्कालिक व्यवस्थेने आदरपूर्वक श्रेय देणं अपेक्षित होत. पण दुर्दैवाने तस घडलं नाही. पण किमान आजच्या पिढीला हे प्रेरणादायी योगदान महित असलं पाहिजे. भक्ती, ज्ञानाचा मार्ग हा स्वातंत्र्याचा राजमार्ग ठरला. सद्गुरु संत वामन भाऊ व राष्ट्र संत भगवान बाबा यांचा जन्म साधारणतः अठराव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यात झाला. त्यावेळी देशावर इंग्रजांचे तर राज्यात निजामाचे हुकुमशाहीचे, प्रजेवर जुलूमी असे राज्य होते. आज आपण जे स्वतंत्रय उपभोगतोय हे त्यावेळी नव्हतं. जीव मुठीत धरून जीवन जगावं लागतं होत अशा बिकट आणि कठिण काळात लोकांच्या मनात आध्यत्मिक ज्ञानाने आत्मविश्वास निर्माण केला व न्याय मिळविण्यासाठी आपण आपला अधिकार मिळवला पाहिजे पण त्यासाठी हिंसा हा मार्ग नाही. असा जन उपदेश करत राज्यभर हजारो, लाखो लोकांच्या मनात विश्वास निर्माण करत स्वातंत्र्या प्राप्ती ची चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी चैतन्य निर्माण केले. इंग्रज व निजामशाही राजवटीत लोकांना एकत्र येण्यासा मज्जाव असताना देखिल आध्यत्मिक ज्ञान मार्ग व भक्तीची एकत्र करण्यासाठी भजन, किर्तन , अंखड हरीनाम सप्ताह नारळी सप्ताह, दिंडी, भागवत कथा या माध्यमातुन लोकांना एकत्र करून त्यांना जागृत केले. त्यांच्या मध्ये आत्मविश्वास जागृत केला आणि ज्ञान मार्गाने आपण अन्याय विरूद्ध एकत्र होऊन लढा देऊ शकतो असा दृढ विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला. राज्यातील गावा गावात फिरून ही अखंड जागृती एवढी विस्तृतपणे झाली की त्याच फलित हे देशातुन इंग्रज सत्ता परिवर्तन होण्यामध्ये झाले तर इंग्रज निघुन गेल्यावर हैदराबाद स्थित निजामशाहीच अधिराज्य संपवुन मराठवाडा अंखड भाराताचा अविभाज्य भाग व्हावा या उदात्त हेतूने सदगुरू वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा यांनी आध्यत्मिक ज्ञान मार्गाने लाखो देशभक्तांची समाजसेवकांची स्वातंत्र्य सैनिकांची फळी निर्माण केली हे वास्तव आहे. याची परिणिती मराठवाडा निजामाच्या ताब्यातुन मुक्त झाला .यामध्ये हजारो लाखो लोकांनी आपल योगदान दिले यापैकी बहुतांश लोक ही सर्व तत्कालीन परिस्थितीमध्ये सद्गुरू वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा यांनी अध्यात्मिक ज्ञान मार्गाने घडविलेले होते म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामातील अध्यात्मिक ज्ञाना मार्गावरून सद्गुरू वामन भाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा यांनी दिलेलं अनमोल हे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहण्यासारख आहे त्यांच्या कार्याशिवाय या विभागाचा/ प्रदेशाचा इतिहास पूर्ण होवू शकत नाही. नारळी सप्ताह ,अखंड हरीनाम सप्ताह, भजन, किर्तन, दिंडी प्रवचन या माध्यमातून लोकांना ज्ञान दान करताना अन्या अत्याचार विरूदध सद् सद् मार्गाने न्याय मार्गाने लढण्याच सामर्थ्य हे संत निर्माण करत असतात आणि हेच सामर्थ्य सर्व सामान्य जनमाणसामध्ये सदगुरु वामन भाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा यांनी आपल्या ज्ञान भक्ती सामर्थ्याने निर्माण केले .संत हे जगद् उद्धारक आणि लोककल्याणासाठी समर्पित असतात. सदगुरु वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा हे साक्षात अवतारी पुरूषच होते‌.तसं पाहिलं तर महाराष्ट्रच्या पावन भुमित अनेक अवतारी योगी सदपुरूष होऊन गेले . विश्व कल्याण आणि सामान्य लोकांना सद् मार्गावर आणुन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून अध्यात्मिक ज्ञान मार्गाचा अवलंब करुन त्यांना देशप्रेमाने, धर्माने चालण्याची स्फुर्ती देण्याचे कार्य सदगुरु वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा यांनी केले. उद्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा स्वातंत्र्य दिन असल्याने मराठवाडा मुक्ती संग्रामातील दृश्य-अदृश्य शक्ति ज्यांचा या मुक्ति संग्रामात सिंहांचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही.
*गणेश खाडे*
*विचारवंत , साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad