Bluepad | Bluepad
Bluepad
गरीबांच्या शिक्षण मार्गावर अडचणींचे काटे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
16th Sep, 2023

Share

*गरिबांच्या शिक्षण मार्गावर अडचणीचे काटे*.
पैसा हा शिक्षणाच्या मार्गावरील सारथी झाल्याने ज्यांच्याकडे पैसा त्यांचं शिक्षण अशीच कहिशी परिस्थिती सध्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांचं वाटयला दैनाच येत आहे. शिक्षण हे सगळ्यांना उपलब्ध झालं पाहिजे घेता आलं पाहिजे पण सध्या शैक्षणिक क्षेत्रात जे काही बदल होत आहेत त्या बदलांचा विचार केला तर शिक्षण हे खर्चिक झालं आहे .पैसा संपत्ती या भोवती शिक्षण फिरू लागलं आहे.मग आशा परस्थिती मध्ये गोरं गरीब वंचित पिडीत लोकांनी आपली मुलं कशी शिकावायची परस्थिती हि शिक्षणा मार्गातील अडसर ठरता कामा नये. आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षण सोडावे लागणार नाही अशी आश्वासक हमी व्यवस्थेकडुन सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. पण असं होताना दिसत नाही. सामाजिक पातळीवर गरीब आणि श्रीमंत हि दरी कमी होण्या ऐवजी अधिकच गतीने वाढत आहे. जीवन उत्थानाच माध्यम असणार शिक्षण हे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात महाग होत आहे .मग गोरं गरीब माणसांची मुलं शिकणार कशी त्यांच्या जीवनात शिक्षणाच्या मार्गावर अडचणींचे काटे निर्माण होत आहेत आणि हेच अडचणीचे काटे दुर झाले तर त्यांना पण हा प्रवास सुखकर होईल . किंबहुना प्रगतीच्या वाटेवर सगळ्यांना समान संधी असली पाहिजे या गंभीर विषय याकडे सध्यातरी कोणीही गांभिर्याने पाह्यला तयार नाही हि शोकांतिका आहे.रस्त्यावर काटे असतील तर प्रवास करणं कठिण जात अथवा प्रवासा दरम्यान अडचणी निर्माण होतात हे वास्तव आहे.पण हेच वास्तव आज गोर गरीब माणसाच्या जीवनात शिक्षणाच्या बाबतीत प्रत्यक्षात घडत आहे .शिक्षण हा जीवन बदलणार परिवर्तनाचा मार्ग आहे या मध्ये यत्किंचितही देखिल दुमत नाही. पण सध्या ज्या पद्धतीने शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा मोजावा लागत आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा गरीब माणसाकडे नाही हे देखिल वास्तव आहे मग गरीबांच्या उद्धारासाठी उत्थानासाठी असणार शिक्षण हे त्यांच्या साठी महागड झालं आहे असंच काहीसं चित्र दिसतं आहे.हे चित्र एवढ्यावरच न थांबता दिवसेंदिवस त्या मध्ये प्रचंड मोठी वाढ होत असून हि तफावत अंत्यंत वेगाने फोफावत आहे. शिक्षण क्षेत्रातील या महागाईची झळ हि श्रीमंताला निश्चितच बसणार नाही पण गोर गरीब माणस यांना ती झळ सोडणार नाही. मग ज्यांची क्षमता नाही आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांनी आपली मुलं कशी शिकवायची हा त्यांच्या जीवनातील जिवाहाळयाचा प्रश्न ऐरणीवर आहे पण त्याला कोणी वाली नसल्याने या प्रश्नाला वाचा कधी आणि कशी फुटणार त्यांच्या जीवनातील शिक्षण मार्गावर निर्माण झालेले आर्थिक अडचणीचे काटे दुर कसे होणार . गरीबांचा शिक्षण मार्ग सुकर कसं आणि कधी होणार कि हे आहे कि असंच चालत राहणार आहे हे सध्या तरी अधांतरी आहे.जीवन परिवर्तन करणार् शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे तर दुसरया बाजुला असणारी गरीबी परस्थिती देखिल वाढतच आहे .आशा वेळी महाग झालेल शिक्षण गरीबांना कसं परवडेल मग त्यांनी शिकायचं कसं शिक्षणाचा उद्योग झाला आहे कि उद्योगाचं शिक्षण झालं आहे हे पण कळायला मार्ग नाही एकंदरीत शिक्षण क्षेत्रातील परस्थिती पाहिली तर अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.जीवन उत्थान होण्यासाठी उपयोगी ठरणार शिक्षण आज मार्केटिंग फंडा म्हणून विकसित झालं आहे. कधी काळी मुक्त आणि मोफत असणार शिक्षण आज महाग झालं आहे. ज्यांच्या कडं पैसा आहे त्यांचं शिक्षण अशी परिस्थिती निर्माण होत असताना मग गरीबांच काय ज्यांना हि परस्थिती सहजपणे परवडेल त्यांना काही अडचण नाही पण ज्यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे त्यांनी नेमकं काय कारयच हाच खुप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे.पण सामाजिक पातळीवर याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष न करता पुढे येऊन मार्ग काढण्याची नितांत गरज आहे शेवटी वाघीणीचे दुध म्हणून ओळख असणार शिक्षण हे सगळ्यांना सहजासहजी उपलब्ध झालं पाहिजे तर आणि तरच याचा उपयोग सगळ्यांना योग्य प्रमाणात होईल अन्यथा या मध्ये भेद भाव झाला तर त्याला फार काही अर्थ उरणार नाही.शिक्षण आणि पैसा असं समिकरण न रहता सर्व सामान्य मणसाच शिक्षण अशी शिक्षणाची ओळख निर्माण होणं गरजेचं आहे
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad