|| मातृदिन व बैलपोळा....||
💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃|
|| मातृदिन व बैलपोळा....|| ____________________________________________
✒️चंदु चक्रवार
भोकर..._
🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃
_____________________________________________
श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सण उत्सवांची रेलचेल सुरू होते.पावसाचे दिवस असल्याने सृष्टीचे सौदर्यही खुलून दिसते. अश्या या श्रावणात नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांनंतर सरत्या श्रावणात श्रावण वद्य अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या,बैल पोळ्याचा सण.श्रावण वद्य अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या व बैलपोळा म्हणतात.भारतभर हा सण साजरा होतो.
कृषक संस्कृतीची रचना व व्यवस्था सण उत्सवांच्या माध्यमान मनामनात रुजवतच हिंदु संस्कृती या भरतभुमीत रुजली समृद्ग होत गेली.आज अनेक बुद्गिवंत म्हणवणारे निसर्ग,पर्यावरण,शेती,यांना रचना असतानाही पशु पक्षांची निघृण हत्या समुहिकपणे करुन सण साजरी करणार्याविषयी मुग गिळुन बसतात.हिंदु संस्कृतीला नावबोट ठेवतात सोशल मिडीयावर आपल बुद्गिवैभव दर्शवितात.त्यांच सोडा हे बोलणारच आपण अशा संभ्रमाच्या गतेॅत न सापडता आपणच आपल्या समृद्ग वारश्याच चिंतन व्हाव.याचसाठी हा लेखप्रपंच
आजच्याच दिवशी पिठोरी अमावस्या,दर्भग्रहणीअमावस्या,मातृदिन व बैलपोळा हा सण साजरा केला जातो.या दिवशी दर्भ उपटून आणायचे,असे हारीतने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे. त्या दिवशी दर्भ निःसत्व होत नाहीत.म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असतील त्या दिवशी उपयोगात आणू शकतो.ह्या दिवशी पिठोरी व्रत करायचे.हे व्रत खानदेश व मध्यप्रदेशात पोळा' नावाने प्रसिद्ध आहे.
मम इह जन्मानि जन्मांतरे वा सौभाग्यपुत्रपौत्रफलावाप्त्यर्थ पिठोरीव्रतं करिष्ये|
मला ह्या जन्मात अथवा जन्मजन्मातरात सौभाग्य,पुत्र व पौत्र यांचे फल प्राप्त व्हावे यासाठी पिठोरी व्रत करतात.स्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र-पौत्रवती बनवणारी ही अमावास्या'मातृदिन' म्हणून ओळखली जाते.एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता.म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून घेऊन स्वतःचा पुत्र जिवंत व्हावा,अशी प्रार्थना केली व तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला.अशी भविष्यपुराणात एक कथा आहे.
ह्या कथेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर, असे लक्षात येते की, केवळ पुत्र जन्माला यावा एवढेच नाही तर, तो जीवंत देखील राहिला पाहिजे.जिवंत पुत्रामुळेच आईचे मस्तक जगात गौरवाने ताठ राहाते. आपल्या येथे सीमंतिनी स्त्रीला सांगण्यात येते की,
'निरुत्साहं निरान्दं निर्वीर्यमरिनन्दनम् मा स्म सीमन्तिनी काचिज्जन येत्पुत्र मीदृशम् '
शंभर गुणवान पुत्रापेक्षा एक गुणवान पुत्र श्रेष्ठ असल्याचे या श्लोकात म्हटले आहे.आई ही केवळ बालकाचीच नाही तर,त्याच्या संस्कारांची देखील जननी आहे.आपल्या संस्कृतीने'मातृदेवो भव' मातेला देवाचा दर्जा देवुन गौरव केलेला आहे.'असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे.'जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी; ही म्हण मातृमहिम्यांचे गुणगान करते.
आजही फ.मु. सारख्या कवींच्या लेखणीतुन आईच महात्म्य प्रकटत..
आई एक नाव असत,
घरातल्या घरात गजबजलेल गाव असत..
माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे.स्वतः ओल्या जागेत झोपून मुलाला कोरडया जागेत झोपविणाऱ्या आईच्या वात्सल्याची तुलना करताच येत नाही.आई म्हणजे,सतत वाहणारा प्रेमाचा झरा !
या जगात महापुरुषांचे जीवन बनवण्यात त्यांच्या मातांच अमूल्य अस योगदान आहे.भारतीय संस्कृतीत अनेक वीर मातांनी विभूषित आहे.
ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव पडले,असा सिंहाचे तोंड फाडून त्यांचे दात मोजण्याची हिम्मत दाखवणारा सर्वदमन म्हणजेच भरत.त्याला जन्म देणारी त्याची जननी शकुंतला आजच्या दिवशी कशी विसरता येईल ?भगवान रामाला जन्म देण्याचे सौभाग्य जिला लाभले एवढेच नाही तर,जिने रामाला जीवनाकडे पाहण्याची शुभदृष्टी दिली अशा 'शुभदर्शना कौसल्ये' कडून प्रत्येक मातेने जीवनदर्शन प्राप्त करण्यासारखे आहे.तशीच स्वपुत्राला योग्य शिकवण देऊन सुयोग्य वयात त्याचा मित्र बनून उनी राहणारी लक्ष्मण-जननी सुमित्राही वंदनीय आहे.अंजनी हनुमानाला जन्म देऊन कृतार्थ बनली,तिचे देखील आजच्या दिवशी स्मरण केले पाहिजे.लव-कुशासारख्या तेजस्वी बालकाना जन्म देणाऱ्या सीतेचे स्मरण करून प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला संदेश दिला पाहिजे,
महाभारत काळातही कुंतीने मातृपदाचा गौरव उज्ज्वल केला आहे. अनंत अडचणीना तोंड देऊन तिने स्वतःच्या पुत्राना मोठे केले.तिच्या तपश्चर्येमुळे तिच्या पुत्राचे जीवन उत्तम घडले गेले,तिचे पुत्र संकटांच्या
तुफानांना कधी बावरले नाहीत किंवा विघ्नांच्या वावटळीने त्यांना कधी झुकवले नाही.तिचा पुत्रं अर्जुन तर तिच्या 'पृथा नावावरून म्हटला जात होता.अर्जुनाचाच पुत्र अभिमन्यु त्यांच्यात वीररस भरणारी त्याची आई सुभद्रा देखील नमस्काराई आहे.अर्जुनाच्या अनुपम संस्कृतीरक्षणाच्या अटीतटीच्या काळात विचार न करता जीवनाचे बलिदान करण्याचा निश्चय केला.अशा ह्या अभिमन्यूचा आदर्श,ज्या मातेने शिवबांना घडवले,स्वराज्य निर्माणाच कार्य घडवण्यास प्रेरित केल अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाउ यांचा आदर्श प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला दाखवून दिला पाहिजे.
स्वतःच्या मातेनंतर राजपत्नी,गुरुपत्नी,भ्रातृपत्नी यांच्याकडेही मातृदृष्टीने पाहाण्याचा आदर्श संस्कृतीने हिंदुमनात रुजवला.सर्व मातामध्ये देवत्व पाहण्याच शिकवण देणारा हा मातृपुजनाच्या ह्या दिवसाची रचना प्राचीन संस्कृतीने केली आहे.आपणही नव्याने अभ्यासावी.
अशा समृद्ग संस्कृतीचा नाळ तोडणारा देश,माणुस आज रानटी अवस्थेत पोचुन स्रीला सन्मानाची वागणुक देणतर, सोडाच; साध
माणूस म्हणुनही जगु देत नाही.साध जेवणात मीठ कमी पडल म्हणुन धर्मपत्नीला वार्यावर सोडणार्या,महीलांची गुराढोराप्रमाणे विक्री करण्याच्या घटना आपण पाहतो,ऐकतो,अशा पशुतुल्य माणसांबद्दल ही बुद्गीवंत मंडळी मुग गिळुन बसतात.समृद्ग संस्कृतीतील उणिवा सुक्ष्मदशिॅत्र लावुन शोधतात अशांना सोडुनच देण्यातच शहाणपणा ठरेल. त्यासह समृद्ग संस्कृतीच्या भरणपोषणाच्या सकारात्मक कार्यात रमणे हाच खरा शहाणपणा.
मातृदिनासह हा दिवस महाराष्ट्रात पिठोरी अमावस्या म्हणुन साजरा करतात.कृतज्ञता' हा भारतीय हिंदु संस्कृतीचा आत्मा असल्याने हिंदु संस्कृतीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणापैकी 'बैलपोळा' हा एक महत्वाचा सण आहे.भारत देश हा कृषी प्रधान देश असल्याने या सणाला विशेष महत्व आहे.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.ह्या दिवशी संस्कृतीपुजक शेतकर्यांची बैलांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त होत असते.हा दिवस बैलपोळ्याचा दिवस म्हणुन साजरा केला जातो.असा हा एक मराठी सण उत्सव.
हजारो वर्षापासुन आपल्यासाठी राबणार्या बैलाचा हा सण.शेती पशुधन,निसर्ग,पर्यावरणाचा जपण्याचा संदेश देणार्या व बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून अपार कष्ट करणाऱ्या सर्जा-राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे आनंदाची पर्वणी.या निमित्ताने मातीतुन सोन पिकवणार्या सर्व शेतकरी बांधवांप्रतीही कृतज्ञता व्यक्त होत असते.
बैलपोळ्याचा सण शेतीवर आधारित सण आहे.हा सण आपल्याला बैलांचे व शेती तसेच शेतकऱ्याच्या कामी येणार्या प्राण्यांच महत्त्व समजावतो.'भूता परस्परे जडो,मैत्र जीवांचे'सृष्टीतल्या सर्व जीवात,
प्राणीमात्रात देवत्व असत व याची पूजा हीच देवाची पूजा होय अस आपल्या निसर्ग पुजक संस्कृतीन सांगीतल.आपल्या संस्कृतीने
गाईला गोमातेच स्थान दिल.भगवान कृ ष्णाला गोपाळ म्हटल,
पर्वतांना देवता तर,नद्यांना माता म्हटल.वृक्षवल्लींना सोयरी म्हटल.
नागपंचमीला नागही पुजला.बैलपोळ्याला कृतज्ञतेने बैलपुजा करतो.पर्यावरणपुरक जीवनशैलीची उपासना करतो.इतकच नव्हेतर देशाला भुमीचा तुकडा न मानता भारतमाता म्हणुन उपासना करणारी महानतम अशी आपली संस्कृती ही इतिहासाच्या पानात रुतुन बसली नाही तर ती आहे. हिंदुच्या हद्यात,सांस्कृ तिक उत्सवात अन सणातुन अन मनातुन प्रवाहित आहे.
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्यायच नाही.
वर्षभर शेतात राबणार्या पेरणी,नांगरणी पासून ते धान्याच्या मळणीपर्यंत वर्षभर शेतात राब राब राबणारा बैल शेतकऱ्यांचा साथीदार,मित्र असलेला हा मुकाजीव बळीराजास बळ देत असतो. शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून शेतीत मदत करणाऱ्या,शेतात राबणार्या बैलाची पुजा करुन बैलपोळ्याच्या उत्सव साजरा करतात.
तैसाचि आला पोळा सण हाहि आहे महत्त्वपूर्ण ।
यात ठेवावे बैलांचे प्रदर्शन|शेती सामानासहित ॥
उत्तम रांगेत बैल ठेवावा साजेल तैसा अंगी भूषवावा ।
त्यात ज्याची सफल सेवा । त्याचा गौरव त्या दिवशी ॥
कोणी जोडी उत्तम ठेवली |कोण बैलास खुराक घाली ।
इनामे द्यावी त्यांस भली ।
सर्व गावकऱ्यांनी कोणाचे उत्तम शेतीसाधन
कोणी ठेवले नोकर प्रसन्न । त्याचे वाढवावे उच्च स्थान |
पोळ्याचिया शुभदिनी ॥
राष्ट्रसंतानी पोळ्याच वर्णन ग्रामगीतेतुन केल आहे.हा सण महाराष्ट्रासह छत्तीसगडमध्ये देखील प्रसिद्ध आहे.या दिवशी पशुधनाची कृतज्ञतेने पूजा केली जाते.बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते. असं मानणारा शेतकरी बांधव आणि वाळलेला कडबा गोड मानुन मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारा बैल यांच्यातील नात्याचे बंध अधोरेखित करणारा शेतकऱ्यांचा सण!
पोळा या सणाची शहरापासून तर गावापर्यंत धूम असते परंतु या सणाचे विशेष आकर्षण गावांमध्येच पहावयास मिळते.गावातील शेतकरी सकाळपासूनच बैलपोळ्याच्या तयारीला सुरुवात करतात. हा दिवस सर्जा राजासाठी विश्रांतीचा दिवस. या दिवशी बैलाला अंघोळ घातली जाते. खांद्याला तूप,हळद लावून शेकले जाते.त्याला खांदे मळन असेही म्हणतात.शिंगे रंगविले जातात.गळ्यात घुंगूर माळा,मस्तकावर भाशिंग,अंगावर नक्षीदार झूल,पायात तोडे,अंगावर गेरुचे ठिपके.अशा प्रकारे सजवून गावात मंदिराजवळ बैलाचे सामूहिक लग्न लावते जाते. मंदिराला प्रदक्षिणा घातले जाते. गावात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.त्यानंतर घरी बैलाची बळीराजा मनोभावे पूजा करतात.घरातील स्त्रिया स्वादिष्ट व्यंजन,पुरणपोळी व शिरा यांच या दिवशी बैलांना जेवण दिले जाते.ज्यांच्या घरात बैलजोडी नसते ते लोक माती व लाकडाचे बैल देखील पूजतात.
अस आपल सांस्कृतिक महत्व असल तरी,आज काळानुरुप बदल झाले आहेत.प्राचीन काळापासून शेती कामात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या बैलाला पुरेसा चारा पाणी घालू.आज काही समाजकंटक पशुधन नष्ट करुन शेतीव्यवसाय उध्दस्त करण्यासाठी घडपडत आहेत. शेतकरी मालकाने आपल्या गाय बैलाची हेळसांड होवु न देता ते कापल्या जाणार नाही व बैलाला खाटकाला विकणार नाही असा संकल्प करूनच पोळा सण साजरा करु या व पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय आहे.आपण सर्वांनी त्यांचे महत्व जाणून मुक्या प्राण्याची निगा राखु त्यांना निर्भय करू .....
बैल पोळा सणाच्या निमित्याने मुक्या प्राण्याविषयी आपल्या मनात प्रेम आपुलकी वाढवू या....
*** ____✍️
चंदू चक्रवार
भोकर
🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃🎉💖🍁🥀🌷🎊🌹🎈🍃