Bluepad | Bluepad
Bluepad
सदैव आनंदी राहायला शिका अनेक व्याधी आपोआप मिटतील
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
14th Sep, 2023

Share

*सदैव आनंदी राहायला शिका अनेक व्याधी आपोआप मिटतील* ‌
आपल्या चेहऱ्यावर नियमित निरागस हास्य असलच पाहिजे आणि हेच निरागस हास्य हि जीवनातील सगळ्यात मोठी संपत्ती ऐश्वर्य आहे. आणि हेच ऐश्वर्या वैभव जीवनात अर्जित करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो.नैसर्गिक हस्य सतत चेहर्यावर फुललं तर शरीर आपोआप निरोगी राहत पण हेच अनमोल रहस्यं ओळखण्यात आपण कमी पडतोय. त्यामुळे शाश्वत अशा ऐश्वर्या पासुन आपण वंचित राहतो.आयुष्यात निरागस हास्य निर्माण होण्यासाठीच ज्ञान अथवा बाब आपल्याला अर्जित करता आलीच पाहिजे . स्वतःला हासत मुख ठेवणं तसं पाहिलं तर फार कठिण नसतं पण आपण जीवनाचा वास्तविक अर्थ समजून घेत नाहीत म्हणून आपली अडचण होते .आपल्या शरीरात निर्माण होणारे अनेक जीवघेणे आजार हे आपल्या चेहऱ्यावरील लुप्त झालेल्या हस्याचा परिणाम असतो पण भौतिक जगात आपण एवढे दंग असतो कि संबंध आयुष्य संपुष्टात येईपर्यंत आपल्याला स्वतःच शाश्वत सुख सापडत नाही.जस जसं युग बदलतंय तसं जीवनशैली देखिल दिवसेंदिवस बदलत आहे. जीवनशैली मध्ये होणारा आमुलाग्र बदल हा आयुर्मान कमी करणारा ठरतो आहे. यात भर म्हणून भौतिक संसाधन आणि ज्ञानाचा अभाव यामुळे वाढता ताण तणाव जीवनातील हस्य लुप्त होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. आपलं शरीर हे नाशिवंत असुन अनेक व्याधीच माहेरघर आहे .वेळ काळ आणि परस्थिती नुसार शरिरातील अनेक व्याधी ह्या आपलं उग्र रूप धारण करत असतात .पण यापैकी बहुतांश व्याधींचा उगमच आपण सहजासहजी टाळु शकतो पण आपण तसं करत नाही सदैव क्षणोक्षणी आनंदी राहायला शिकल पाहिजे.सतत स्वतःला हसतमुख ठेवणं यासाठी खुप सरळ साधा सोपा उपाय आहे.बहु दुःखाचं मृगजळ असणार्या संसारात आनंद दुर्मिळ झाला आहे पण हाच दुर्मिळ आनंद शोधुन सतत आनंदी राहायला शिकल तर जीवनातील अनेक व्याधी पासून आपली मुक्तता होऊ शकते स्वतःला सदैव तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर असणार नियमित हस्य हे ब्रह्म अस्त्र म्हणून उपयोगी पडत असत .आपण जितका वेळ हसु तितका वेळ आपल्याला तणाव मुक्त व चैतन्य दायक वाटत हे वास्तव आहे. आपण दैनंदिन नियमित स्वतःला हस्य वदन ठेवु शकलोत तर निश्चितच आपोआप आपल्या शरिरातील अनेक व्याधी ह्या नष्ट होतील.शरिर हे अनंत व्याधीच माहेरघर असतं पण आपण ज्या पद्धतीने तणाव घेऊ तसं तसं त्या त्या आजारांचा पाया घट्ट होऊन पाळंमुळं विस्तार करतात आणि शेवटी प्रमाण व मर्यादा वाढली की आपले सगळे पर्याय संपुष्टात येतात.निरोगी राहण्यासाठी सतत स्वतःला चैतन्य युक्त ठेवता आल पाहिजे.पण हेच ब्रह्म अस्त्र आपण वापरत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे .हस्य हे हृदय अमृत आहे सदैव चैतन्य युक्त असणं म्हणजे जवळपास बहुतांश तणाव आपोआप संपुष्टात येणे .सदानंदी राहणं हे शाश्वत ऐश्वर्याचे लक्षणं आहे.‌तणाव हे अनंत आजारांचे मूळ उगमस्थान आहे म्हणून तणावमुक्त जीवन आणि आनंदी मुद्रा हाच जीवनाचा व्याधी मुक्त होण्यासाठी मंत्र आहे.आयुष्य म्हटलं कि अनंत नानाविध व्याधी दुःख असतातच पण दुःखात सुद्धा आनंद शोधता आला आणि आपण सदैव आनंदी राहायला शिकलो तर आपोआपच अनेक कठिण व्याधी पासून आपली मुक्तता होते.जीवनातील आनंद हस्य हे अगदी नैसर्गिक आहे पण आपण भौतिक जीवनात एवढे दंग होतो कि शाश्वत हस्य विसरून जातो.जीवन खरया अर्थाने समजलं तर क्षणोक्षणी आनंद आहे आणि नाही समजलं तर पावलोपावली दुःख आहे. मुळात आनंद हा नैसर्गिक आहे तर दुःख हे मानव निर्मित आहे. नैसर्गिक हस्य आयुष्यभर टिकविण्याचे सामर्थ्य हे फक्त ज्ञानात आहे आणि हेच जीवन उपयोगी आत्म ज्ञान आपल्याला अर्जित करता आलं तर चेहर्यावर असणार हस्य अखंडितपणे कायम राहत आणि त्याचा उपयोग जीवन हितार्थ होऊन संबंध जीवन नंदनवन ठरत पण आपण जीवनाला नंदनवन नाही तर सतत ताण तणावात ठेवून अनेक व्याधी निर्माण करतो . नैसर्गिक हस्य विसरून दुःखाच्या फेरयात आडकवतो. दुःखाच्या प्रत्येक क्षणाला आपण कारण निर्माण करतो आणि फिरून फिरून त्या भोवतीच फिरतो पण अकारण असणार हस्य आपण टिकवत नाही.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301सदै

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad