Bluepad | Bluepad
Bluepad
भारतीय अर्थव्यवस्थेची यशस्वी वाटचाल......
Lad Krushna
Lad Krushna
13th Sep, 2023

Share

भारतीय अर्थव्यवस्था आज एका वेगळ्या उंचीवर येऊन ठेपली आहे, परंतु तिचा प्रवास हा मुळीच सोपा नव्हता. त्याच प्रवासाविषयी आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
भारत ज्या वेळी स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला त्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था खूप सार्या संकटांचा सामना करत होती. त्याला काही कारणे होती, अशी कारणे जी स्वातंत्र्यनंतर अस्तित्वात आली. त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिकीकरणात इंग्रजांनी आणलेली फुट. स्वातंत्र्यापूर्वी खूप साऱ्या वस्तु या भारतात तयार होत आणि त्यांची निर्यात केली जात असे त्यामुळे, अर्थव्यवस्था ही सतत गतिमान होती. परंतु स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीमुळे औद्योगिकीकरण विभागले गेले आणि परिणामी अर्थव्यवस्थेचा कणा कमकुवत झाला.
दुसरे कारण होते भारतीय जनसंख्येची निरक्षरता त्यावेळी भारतातील ८० टक्के जनसंख्या ही अशिक्षित होती. आणि हे एक मोठे कारण होते जे कि अर्थव्यवस्था प्रामुख्याने खिळखिळी करण्यास मदत करत होते.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी म्हणजेच १७ व्या शतकात भारताची अर्थव्यवस्था संपुर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या २२.६ टक्के इतकी होती आणि त्याचवेळेला संपुर्ण युरोप खंडाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेच्या २३.३ टक्के इतकी होती. म्हणजेच यावरून हे लक्षात येते कि आशियातील एक भारत देश संपुर्ण युरोप खंडाच्या अर्थव्यवस्थेची बरोबरी करत होता. इतका समृद्धशाली भारत देश होता. परंतु इंग्रजांच राज्य स्थापन झाले तेव्हापासून या समृद्धशाली अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली आणि १९५२ साली ही अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत फक्त ३.८ टक्क्यांवर आली. ही एक अशी वेळ होती जेव्हा संपुर्ण जगाचे लक्ष भारतावर होते, कि हा देश खरंच एकसंध राहील किंवा याचे पुन्हा विभाजन होईल.
तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी असे काही निर्णय घेऊन अंमलात आणले कि ज्यामुळे अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होऊ लागली. १९५० साली नेहरूंनी नियोजन आयोगाची स्थापना केली. या नियोजन आयोगाचे काम होते की भारतीय आर्थिक स्त्रोतांचा शोध घेणे. नियोजन आयोगाने आपले शोधकार्य सुरु केले आणि एक प्रस्ताव मांडला ज्यामध्ये असे नमूद केले होते भारत अमेरिकी देशांकडून खूप जास्त प्रमाणात धान्य आयात करतो. ज्यामुळे भारताला खूप पैसा मोजावा लागतो. आणि तो खर्च कमी करण्यास त्यांनी पंचवार्षिक नियोजन पद्धतीचा प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव १९५१ साली अंमलात आणण्यास सुरुवात झाली, ज्यात असे नमूद होते की भारताला कृषी आणि सिंचन क्षेत्रात प्रगती करण्याची गरज आहे. पुढील पाच वर्षांत या प्रस्तावाद्वारे भारताने कृषी आणि सिंचन क्षेत्रात काम केले परंतु फारसे असे यश मिळाले नाही.
दुसरी पंचवार्षिक योजना १९५६ पासुन अंमलात आणली गेली. ज्याद्वारे औद्योगिक क्षेत्रात भारताने यश मिळवले. आता अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होऊ लागली परंतु तिथे थांबुन चालणार नव्हते. एवढ्या मोठ्या राष्ट्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अजून स्थिरस्थावर होणे गरजेचे होते.
नेहरूंच्या मृत्युनंतर ९ जून १९६४ साली लालबहादुर शास्त्रींचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होण्याच्या दोन वर्षे आधी भारत-पाकिस्तान युध्द झाले होते. ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पुन्हा खिळखिळी झाली होती. या युद्धानंतर एक लक्षात आला तो असा की आपण शेतीच्या दृष्टीने आणि सैन्यबळाच्या दृष्टीने मजबुत व्हायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेऊन शास्त्रींनी जय जवान जय किसान चा नारा देऊन आपले संपुर्ण लक्ष हे शेतीकडे वळवले आणि परिणामी हरितक्रांतीचा उद्य झाला. या हरीतक्रांतीमध्ये भारताला मोलाचे यश मिळाले ज्यामुळे अर्थव्यवस्थेला एक आधार मिळाला.
त्यानंतर २० जुलै १९६९ साली इंदिरा गांधींच्या सरकारात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ज्याने अर्थव्यवस्था सक्षम करण्यास खूप मोलाचे योगदान दिले. तो निर्णय होता भारतातील खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे ज्यामुळे सततच्या वाढत्या किमतींवर आळा बसवण्यास मदत झाली.
त्यानंतर १९८४ साली राजीव गांधींच्या कारकिर्दीत एक असा निर्णय घेण्यात आला ज्याने अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला. तो निर्णय होता (Information Technology) क्षेत्रातील विकास ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उंचावर जाण्यास मदत मिळाली.
यानंतर पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात पुन्हा अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. त्याकाळात भारताला २० टन सोने UBS बँकेला विकावे लागले, जेणेकरून २४० मिलीअन डॉलर कर्ज घेता आले. हे घेतलेले कर्जही अपुरे पडू लागले म्हणून, पुन्हा ४६.८ टन सोने हे इंग्लंड आणि जपानच्या बँकांना विकावे लागले आणि त्यांच्याकडून ४०० मिलीअन डॉलर इतके कर्ज घेतले.
त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात ते सर्व सोने पुन्हा घेण्यात आले व त्यानंतर २१ जून १९९१ मध्ये पी.व्ही.नरसिंहराव आणि तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा कायदा लागू केला. ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील अशी वेळ होती ज्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला आजपर्यंत पुन्हा मागे वळून बघण्याची गरज पडली नाही.
त्यानंतरच्या काळात अटल बिहारी वाजपेयी आणि तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिंन्हा यांच्या सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला. हे त्यावेळचे एकमेव सरकार होते ज्यांनी खासगीकरणाला चालना दिली. १९९९-२००० च्या आर्थिक बजेटनुसार खासगी क्षेत्रांना कर्ज देण्यास सुरुवात झाली ज्यामुळे उद्योगपती कर्ज घेऊ लागले परिणामी अर्थव्यवस्थेला मदत झाली.
यानंतर २५ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. मोदी सरकारने नियोजन आयोग हटवला आणि नवीन योजना आणली ती म्हणजे नीती आयोग.
नियोजन आयोगानुसार हे ठरवले जात की कुठल्या राज्याला किती निधी द्यायचा परंतु, नीती आयोगानुसार राज्याला केंद्रासोबत मिळून काही ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठीची जबाबदारी आली ज्यामुळे प्रगतीच्या नवीन दिशा सापडण्यास मदत होऊ लागली. याच सरकारच्या काळात जुलै २०१७ ला वस्तु सेवा कर (GST) लागु करण्यात आला ज्यामुळे, वेगवेगळे कर संपुष्टात आणले आणि एकाच कर आकारण्यात येऊ लागला. यामुळे दोन फायदे झाले. एक असा की सरकारच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. आणि दुसरा असा की वस्तु योग्य भावात मिळु लागल्या ज्यामुळे सर्वसामान्यांची लुट थांबण्यास मदत झाली.
याच सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेने अशी उत्तुंग भरारी घेतली की इंग्लडला मागे सोडून भारतीय अर्थव्यवस्था ५ व्या स्थानावर आली. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली गोष्ट या सरकारच्या काळात घडली गेली.
जी अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी होती की ज्यामुळे देशाचे विभाजन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती तीच अर्थव्यवस्था आज इतक्या गतीने पुढे आली. हे सर्व शक्य झाले ते या सर्व सरकारांच्या काळात घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे कारण निश्चितच ही वाटचाल सोपी नव्हती. या यशस्वी अर्थव्यवस्थेने खुप वाईट दिवस बघितले, उतरत्या काळातून पुढे आलेली अशी ही भारतीय अर्थव्यवस्था आहे.
सध्याच्या काळातही या अर्थव्यवस्थेची यशस्वी वाटचाल खुप जलद गतीने सुरु आहे. लवकरच येणाऱ्या काळात आपली भारतीय अर्थव्यवस्था ५ trillion डॉलरचा आकडा सहजरीत्या पार करण्यात यशस्वी होईल आणि पुन्हा एक गरुडझेप घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत एक वेगळी ओळख निर्माण करील.

0 

Share


Lad Krushna
Written by
Lad Krushna

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad