आजच्या काळात नाविन्याची
कास धरणारा शिक्षक,
आणि एकलव्या सारखा
तपस्वी शिष्य असावा..
रोजच्या शाळेचं दफ्तर सांभाळण्याचे
ओझं आणि त्यात सततचा गृहपाठ यास कंटाळलेला आजचा विद्यार्थी हा आधुनिक काळात भरकटलेला दिसून येत आहे. सतत चा स्मार्ट फोन चा वापर करून परावलंबी होताना दिसत आहे.. गरजे पुरता मर्यादित वापर स्मार्ट फोन चा न करता 24 तास मोबाईल फोन हा खिशात वावरताना दिसत आहे. शाळेतील तासन् पुरताच पुस्तकांचा अभ्यास हा केवळ परीक्षे पुरता मर्यादित होताना दिसत आहे त्यामुळे आजचा विद्यार्थी हा ज्ञानार्थी की परीक्षार्थी आहे याचं कोड आजच्या शिक्षक वर्गाला देखील पडलेलं आहे.. पालक वर्ग देखील अनभिज्ञ झालेला दिसून येत आहे. आपल्या पाल्याचा कोणत्या शाळेत प्रवेश करावा हा देखील प्रश्न त्यांना पडला असावा. कारण शेजारच्या घरातील मुलगा सीबीएससी शाळेत जात असेल तर आपल्या ला साहजिकच वाटेल की आपला पाल्यने हि सीबीएससी शाळेत मध्ये प्रवेश घ्यावा.पण त्यांना एवढे समजत नाही की नुसता चांगल्या शाळेत प्रवेश घेतला की झालं सगळे मनासारखे, आपल्याला एवढे समजत नाही की सीबीएससी शाळेत इतर कोणत्या activities असतात आणि आपण आपल्या मुलांना स्वतः घरी अभ्यासाची तयारी व्यवस्थित पने पार पाडू शकतो का?? नुसत कोणी सांगितले की आपण आपल्या हौसे साठी लहान मुलांवर कोवळ्या वयात आपले विचार लादायचे. आपल्या मुलांना आपण जसे घडवत असतो तस आपल्याला हि त्यांचा अभ्यास कोणत्या शाळेत व्यवस्थीत होईल त्या दृष्टीने आपण शाळा निवडावी.. आजच्या जमान्यातील लोक हे इंग्लिश मिडीयम आणि मराठी मिडीयम असे तुलना करता ना दिसून येत आहे. सर्व शाळेतील मुलांना शिकवणारे शिक्षक हे उच्च दर्जाचे शिक्षण घेवून च ज्ञानदान या क्षेत्रात आपले काम चोखपणे करत असतात.मग पालकांनी का बरं शाळांची तुलना करावी.. पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आणि जाणीव पूर्वक लक्ष ठेवलं तर शाळा कोणतीही असो इंग्लिश की मराठी विद्यार्थी हा चांगला घडेलच यात शंका नाही.. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जिल्हा परिषद येथील शाळा ही आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेवून विद्यार्थी घडवत आहेत.. त्यामुळे पालकांनी नीट विचार करून आपल्या पाल्याचा प्रवेश योग्य त्या शाळेत करावा..
धन्यवाद.
मराठी शाळा जपवूया..
सुसंस्कृत विद्यार्थी घडवूया..!
संकल्पना
आशिष मधुकर दत्तू
M.A ( मराठी ) पुणे