*आचरणातून निर्माण झालेलं श्रेष्ठत्व हे चिरकाल टिकणारा वैभव आहे*
जगात सगळं काही क्षणभंगुर असलं तरी सुद्धा आचरणातून निर्माण झालेलं श्रेष्ठत्व हे चिरकाल टिकणार वैभव आहे. आणि हेच वैभव आयुष्यात निर्माण करता आलं पाहिजे.अधिकार पद हि क्षणभंगुर असतात त्याची एक विशिष्ट अशी काल मर्यादा असते.याच दरम्यान त्या त्या पदाचा अधिकाराचा जो प्रभाव आहे त्यामुळे आपल्याला त्याच वेगळं महत्व जाणवतं आणि आपण श्रेष्ठ झाल्याची जाणीव आपल्याला होऊ लागते .पण काल मर्यादा संपली कि त्याचा प्रभाव संपुष्टात येतो .आणि पुन्हा आपण मुळ ठिकाणी येतो .जीवनात पदा मुळे अधिकारा मुळे प्रसिद्धी मिळु शकते .नाव लौकीक होऊ शकत संपत्ती प्राप्त होऊ शकते . परंतु पदांमुळे श्रेष्ठत्व मिळत नाही .श्रेष्ठत्व हे आपल्या विचारांवर आचारावर अंवलबुन असतं. म्हणून श्रेष्ठत्व हे पद पैसा श्रीमंती, सत्ता,वैभव यामुळे प्राप्त होत नाही .तर विचारांची दिशा उंची आणि विचार व कृती यामधील साम्य यामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होत असत. तसं पाहिलं तर श्रेष्ठत्वा बदल प्रत्येकाचं मत विचार भिन्न असु शकतात . या संदर्भात व्यक्ती परत्वे मत भिन्न असण या मध्ये काही गैर नाही. कारण आपण आपल्या सोयीनुसार श्रेष्ठत्व ठरवत असतो. अनेकदा आपला पंस्वार्थ,हित,लाभ यामुळे पण आपण समोरच्या व्यक्तीला तात्पुरतं श्रेष्ठ ठरवतो.हा मानवी स्वभाव आहे.आपण ज्या पद्धतीने निरीक्षण करतो त्याच पद्धतीचा परिणाम आपल्याला दिसतो हे नैसर्गिक आहे.पण एकंदरीत मुल्यमापन हे योग्य पद्धतीने झालं तर मग मात्र श्रे्ष्ठत्व हे अधिकाराने पदाने संपत्ती वैभावाने नाही तर आचरण, विचार,व संस्काराने च प्राप्त होते .आणि आपली खरी गल्लत हि खरं श्रेष्ठत्व ओळखण्यात होते .भौतिक मोठेपणा पद,पैसा ,वैभव, अधिकार हे क्षणिक व क्षणभंगुर असतात. कितीही प्रयत्न केले तरी त्याला एक विशिष्ट अशी काल मर्यादा असते . त्यापुढे तो प्रभाव चालत नाही .काल मर्यादा संपली की पद अधिकार मोठेपणा हा आपोआप संपुष्टात येतो. म्हणजे अधिकार पद ,प्रतिष्ठा , मोठेपणा हा अस्थायी असतो. तर याउलट श्रेष्ठत्व हे स्थायी असतं .उच्च किंवा सर्वोच्च पदावर विराजमान होण यांचा अर्थ श्रेष्ठ होणे असा मुळीच होत नाही. या मध्ये अपवाद मात्र असु शकेल .योगायोगाने जो पदाने मोठा झाला तो आचर विचारानेही श्रेष्ठ असु शकतो पदाने अधिकाराने संपत्ती,वैभवाने व आचार विचारानेही जो श्रेष्ठ असतो . तो राजयोगी असतो .अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही अपवाद वगळता इतरांच्या संदर्भात मात्र खरया अर्थाने उच्च पराकोटीचे विचार आत्मसात केल्याने श्रेष्ठत्व प्राप्त होते . हल्ली आपल्या कडे शब्दांची फार गल्लत होते . आणि याच शब्द फेर्यात येऊन आपण नेमकं कशाला काय समजतो हेच आपल्याला शेवट पर्यंत कळत नाही. अशीच काहीशी स्थिती सध्या सगळीकडे आपल्या सर्वांची झालेली आपल्याला पाह्यला मिळत आहे . म्हणून कोण कोणाला काय समजत आहे. याचा थांगपत्ता लागयला तयार नाही .एकंदरीत पाहिलं तर श्रेष्ठत्व हे पदाने अधिकाराने नाही. तर उच्च पराकोटीच्या विचाराने आचाराने प्राप्त होते हे युगायुगाचे सत्य आहे . योगायोगाने एखाद्या पदावर एखाद्या व्यक्तीला अधिकार मिळाला किंवा ज्या पदाला आपण उच्च दर्जाचे पद समजतो संबोधतो अशा पदांवर निवड झाली म्हणजेच तो व्यक्ती श्रेष्ठ झाला असंच काहीसं आपलं असं सर्वसाधारण निरीक्षण असतं . कारण आपण ज्या भुमिकेतुन पाहतो ती भुमिका हि भौतिक विचार आणि सुख सुविधा या बाबींच्या संदर्भात असल्याने आपण त्याच पद्धतीने विचार करतो .आणि तात्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या दृष्टीने ते योग्य पण आहे.कारण आपली दृष्टी तशी आहे. परंतु ते पुर्ण सत्य नसुन अर्धसत्य आहे. कारण तात्कालिक प्रभावाने तो व्यक्ती लोकांच्या नजरेत भौतिक दृष्ट्या मोठा असेलच .या मध्ये किंचित यत्किंचितही सुद्धा शंका नाही . परंतु तो श्रेष्ठ आहे .असं म्हणणं नैसर्गिक दृष्ट्या अजिबात संयुक्तिक होणार नाही .अधिकार पद आणि विचार ह्या तीन बाबी एकत्र ज्यांच्या संदर्भात आढळतील असे व्यक्तिमत्व यामध्ये अपवाद नक्कीच असतील परंतु शरतेशेवटी श्रेष्ठत्व हे उच्च श्रेणीचे विचार अंगीकृत आत्मसात केल्याशिवाय प्राप्त होत नाही.महणुन भौतिक मोठेपणा हा फक्त क्षणिक असतो. तर विचाराने ज्ञानाने मिळालेलं श्रेष्ठत्व हे स्थीयी शाश्वत असतं . म्हणून पदाने मोठं होण्यापेक्षा विचाराने मोठ होऊन श्रेष्ठत्व मिळवणं कधीही उत्तमच आहे. शेवटी पद अधिकार हे फार काळाचे सोबती नसतात. तर विचाराने मिळालेलं श्रेष्ठत्व हे चिरकाल टिकणार अभुषण आहे.अलंकार ज्याला कोणताही कसालाही डाग बट्टा नाही . ते अगदी शुद्ध आहे. म्हणून आचार विचार हेच अभुषण जीवनातील सगळ्यात मोठा दागिणा आहे. ज्या मुळे शाश्वत असं श्रेष्ठत्व प्राप्त होते.आणि चिरकाल टिकत.आचारणाच श्रेष्ठत्व अर्जित करण्यासाठी ज्ञान आणि अध्यात्म हे मुख्य साधन आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301*