Bluepad | Bluepad
Bluepad
बुद्धी हि अनिती करण्यासाठी नाही तर सत्याचा सारथी होण्यासाठी असते
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*बुद्धी हि अनिती करण्यासाठी नाही तर सत्याचा सारथी होण्यासाठी असतो*.
बुद्धी हि मानवता जोपासण्यासाठी असते पशुत्व संचारण्यासाठी नाही.पशु पशु असतो . माणसाला बुद्धी हि स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी मिळालेली असते .पण मानव आपली सात्विक बुद्धी टिकविण्यात कमी पडतोय का? हा देखिल प्रश्न आहे. निसर्गाने मानवाला प्रचंड बुद्धिमत्ता दिली आहे याचा अर्थ हि बुद्धी कपट कारस्थान,अनिती करण्यासाठी नाही तर निती मार्गाचा अवलंब करण्यासाठी दिलेली आहे पण क्षणिक विसर पडल्याने आपण भ्रमित होऊन चुकीच्या मार्गावर जातो . बुद्धी सात्विक असेल तर ती आपल्यासाठी सदैव हितकारक लाभदायक ठरत असते.तर चालाक बुद्धी हि विनाशकारी ठरते म्हणून आपण साधारणतः असं बोलतो कि विनाशकाले विपरीत बुद्धी ,हे वास्तव आहे. क्षणार्धात होत्याच नव्हत करण्याची ताकद फक्त चालक बुद्धी मध्ये असते. म्हणूनच चालाकी हा प्रकार बुद्धी मध्ये प्रवेश नाही केला तर हि आपल्यासाठी आनंदाची व अंत्यंत लाभादायक बाब ठरते. जीवनातील सगळं हित , अहित हे बुद्धी मुळे घडत असतं . म्हणुन बुद्धी हि सदैव सात्विक, सकारात्मक आणि प्रमाणिक असली न्याय संगत नितीसंगत असली पाहिजे .आपल्याला निसर्गाने नेमकं कशासाठी काय दिलं आहे .याचा योग्य वेळी योग्य बोध झाला तर मग मात्र जीवन अगदी सरळ साध सोप होत .सृष्टीची उत्पत्ती आणि रचना याचा एकंदरीत विचार केला .तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव सजीव या ठिकाणी कार्यरत आहेत .या सगळ्या जीव सजीव प्राण्यांपैकी माणव हा प्राणी सगळ्यात जास्त बुद्धीवान आहे .मग सृष्टीच्या निर्मात्यांने मानवाला सगळ्यात जास्त बुद्धिमान शक्तिशाली बलाढ्य बनवले हे वास्तव जरी असलं तरी एवढी विशाल बुद्धी हि मग नेमकी निसर्गाने आपल्याला कशासाठी दिली आहे .याचा विचार मंथन आपण आयुष्यात कधी करतो का ?सृष्टीच्या निर्मात्यांने आपल्याला बुद्धी दिली हि अनिती चालाकी , फसवाफसवी,लबाडी , असत्य, वर्तन, असात्विक आचरण करण्यासाठी नक्कीच दिलेली नाही हे शंभर टक्के स्वच्छ आणि उघड सत्य आहे.आपल्याला सगळ्यात प्रभावी बुद्धिमान बनवलं ते , सदाचारी, सात्विकता , प्रामाणिकता, आयुष्भर टिकविण्यासाठी तसेच , सत्य व न्याय,निती धर्म संगत मार्गा वरून मार्गक्रमण करत अचारण करण्यासाठी तसेच सृष्टीच्या दृष्टीने हितकारक, कल्याणकारी बाबींच उत्थान आणि उत्कर्ष करत मार्गक्रमण करण्यासाठी दिलेली आहे .याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली याची जर आठवण ठेवली तर आपलं पाऊल चुकणार नाही. तसेच आपल्या हातुन कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच चुकीचं कर्म होण कदापिही शक्य होणार नाही.आणि या पद्धतीने जर बुद्धी चा योग्य ,सद उपयोग केला. तर आयुष्यभर कोणतेही संकटं दुःख अडचण आपल्यावर येणार नाही.आणि कदाचित कळत न कळत घडलेल्या कर्म फळा नुसार यदाकदाचित संकटं दुःख आलही तरी त्याचा फार असा मोठा प्रभाव हा आपल्या वर होणार नाही . ज्यामुळे आपलं जीवन अस्थ वेस्थ होईल. सत्य प्रामाणिकता सचोटी याची ताकद शक्ती खुप मोठी प्रचंड प्रभावी असते.आत्म शक्ति जागृत करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी सहयभुत ठरणारी असते . सृष्टी वर जन्म घेतल्यानंतर कुणी कस आचरण कराव हा जरी ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय असला. तरी प्रत्येकाने शक्यतो सद मार्गाने आचरण करून सृष्टीच्या निर्मात्यांने आपल्याला दिलेली तीक्ष्ण , बुद्धी जनकल्याणासाठी समर्पित करून आयुष्य भर प्रामाणिकता जोपासण्या मध्ये आपलं फार काही अहित होईल असं वाटतं नाही .किंवा काही खास खुप मोठं नुकसान होईल असं तर अजिबात नाही. समजा आपल्या बुद्धीने अनेक असे नानाविध चालकी करणारे असत्य मार्गाने पराक्रम जरी केले.तरी याची शेवटी फलनिष्पत्ती काय होते .आणि बुद्धीने चालाकी करून काहीही मिळवलं तरी आपल्याला मानसिक समाधान आनंद मिळतो का ? तर याच सत्य उत्तर नाही असच असत पण सत्य स्वीकारतील अशी माणसं सध्या दुर्मिळ आहेत.पण खरं बोलण्याच धरीष्ठय असलं पाहिजे खुप कमी आणि मोजक्या लोकांच्या जवळ हे सत्य स्वीकारण्याच धरीष्ठय आहे.पण हे प्रमाण वाढलं पाहिजे ज्ञान आणि शिक्षण त्यासाठीच आहे. असत्य मार्गाने न्याय ,निती , धर्म मार्ग सोडून अनितीने बुद्धी प्रयोग करून चालकी करून सृष्टी वरील काहीही मिळवलं तर समाधान किती मिळेल हा प्रश्नच आहे.आणि ते अनितीने बुद्धी चालाकी मिळवलेल किती दिवस आपल्याला उपभोगण्यासाठी मिळेल याची शाश्वती नसते .मग ते पद असो वा वस्तू किंवा दगिना पैसा जे काही तत्सम पदार्थ असेल ते शेवटी मिळवण्याची पद्धत टिकण्याची हमी देत असते . म्हणून ते फार काळ टिकणार नाही .निती शाश्वत असते तर अनिती क्षणिक असते .या मधुन नंतर दुःखाला देखिल समोर जावं लागतं.म्हणून अगदी विवेकाने सात्विकतेने, सत्याने, प्रामाणिकपणे आणि चालाकी न करता काहीही नाही मिळालं तरी समाधान आनंद मात्र मिळतो .यामध्ये काही शंका नाही. म्हणून आपल्याला दिलेली बुद्धी हि सद मार्गाने पराक्रम करून लोक कल्याण करण्यासाठी उपयोगी आली पाहिजे.हाच जीवनाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. आणि आपली प्रामाणिकता सचोटी सात्विकता अधिक अधिक बळकट होऊन दिवसेंदिवस वृद्धिंगत झाली पाहिजे .तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला सृष्टीच्या निर्मात्यांने दिलेल्या बुद्धी चा योग्य आणि रास्त उपयोग होईल. बुद्धीची प्रामाणिकता अंखड आणि आयुष्भर टिकली पाहिजे.व चालाकी पासून दुर राहिलं पाहिजे. मानवी जीवन कल्याणासाठी हेच उपयोगी शाश्वत सत्य आणि लाभदायक आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
*901163430*

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad