Bluepad | Bluepad
Bluepad
उत्कर्ष होण्यासाठी गरीबी डोळ्यात सलली पाहिजे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*उत्कर्ष होण्यासाठी गरीबी डोळ्यात सलली पाहिजे*
अहोरात्र गरीबी डोळ्यात सल्ल्या शिवाय प्रगतीच्या दिशेने झेप घेण्याची मानसिकता निर्माण होत नाही.परिस्थितीचा चिमटा हा जीवनात बसला तरच आपण उत्कर्ष होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतो. सगळ्या सुख सुविधा उपलब्ध असताना कशासाठी मिळवायचे आहे हि संकल्पना हल्ली तरूण पिढी मध्ये वाढीस लागली हे वास्तव कटु सत्य आहे .याला सुद्धा अपवाद आहे सगळेच तरूण तरूणी असा विचार करत नाहीत . पराक्रम यशोगाथा अवलोकन केले तर बहुतांश यशोगाथा विपरीत परिस्थितीत यश मिळवलं असंच निदर्शनास येईल. गरीबीचा चिमटा बसल्यानंतरच यशाच्या दिशेने झेप घेण्याची उमेद निर्माण होते. यशाल गवसनी घालत नाही तोपर्यंत वेग थांबत नाही एवढा प्रचंड वेग निर्माण करण्याची ताकद गरीबीच्या चिमटयात आहे.जीवनात जाणीव आणि उणीव हि समजणाराला असते.जो जाणिव उणीव जाणतो तो परस्थिती समोर हतबल न होता जोमाने,खडतर,संघर्ष करतो .आणि स्वतः चा पराक्रम विक्रम स्वतःच्या हिमतीवर रचतो .म्हणून गरीबी हि डोळ्यात सलली पाहिजे. त्या शिवाय यशाकडे झेप घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होत नाही.ज्याच्या कडे जन्मताच सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत .त्याला कोणत्याही अडीअडचणीचा सामना करावा लागत नाही.कुठलिही जाणिव, उणिवा,होत नसते .जे पाहिजे ते विहीत वेळेत उपलब्ध होते .नाही हा शब्द कधीच काणी पडत नाही.महणुन संघर्ष काय गरीबी काय हे माहित नसतं .त्याच्या साठी यश अपयश हे फार काही विशेष नसतं .यश मिळालं तर ठिक नाही मिळालं तरी ठिक पण या उलट गरीबीचा चिमटा बसणारच तसं नसतं. गरीबी परस्थिती मधील व्यक्ति यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करत असताना त्याचे परतीचे दोर कापलेले असतात.यश हा एकमेव दरवाजा त्यासाठी पर्याय असतो .मग किंमत कोणतीही मोजावी लागली तरी मानसिक तयारी असते. जसं सिंहा एकदा शिकारी साठी झेपावला कि तो शिकार केल्याशिवाय परत फिरत नाही.तसच गरिबीचा चिमटा बसलेल्या व्यक्तिच असता त्याला यशाला गवसणी घातल्याशिवाय परत फिरयाला मार्ग उपलब्ध नसतो .सदन परिवारातील व्यक्ति कडे अनेक पर्याय असतात .यश मिळालं तर उत्तम नाही मिळालं तर फार काही परिणाम होत नाही.परंतु गरीबी परस्थिती मध्ये असा म्हणून चालत नाही .जगातील कोणताही विक्रम निर्माण होण्यासाठी काही तरी विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण व्हावी लागती . सरळ सरळ मार्गाने पराक्रम किंवा विक्रम निर्माण होण्याची संख्या खुप अल्प असते .तशी शक्यता हि खुप कमी असते पराक्रम करण्यासाठी किंवा प्रगतीच्या दिशेने झेप घेण्याची मानसिक तयारी होण्यासाठी खडतर परस्थिती मधुन प्रवास करताना गरीबीच चिमटा हा बसलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्या पाऊलांची गती वाढत नाही . डोळ्यासमोर बिकट परिस्थिती दिसल्याशिवाय मेहनतीचा वेग वाढत नाही . समोर दिसणारी भयानक परिस्थिती अनुभवल्याशिवाय जीवनात सर्वश्रेष्ठ होण्याचा ध्यास लागत नाही .आणि ध्यास लागल्याशिवाय आपण जीव तोडुन मेहनत करत नाही . ज्याच्या कडे सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत . त्याला प्रगती झाली किंवा नाही झाली तर फार असा फरक पडुन त्याची परस्थिती व व जीवनावर परिणाम होत नाही.अशा परिस्थितीत प्रगती झाली तर उत्तमच म्हणून तो अगदी सहज प्रयत्न करत असतो . तो प्रगती करत नाही , किंवा यशस्वी होत नाही वा यथा योग्य उंची गाठत नाही असं नाही .अपवादात्मक परिस्थितीत मध्ये जन्मजात सदन परिवारातील मुल सुद्धा उच्च अधिकारी किंवा नामांकित व्यक्तिमत्व होतात .परंतु सर्व साधारण पणे अंत्यंत गरीब घराण्यातील मुलं ज्यांना गरीबीशी झुंज द्यावी लागते . अगदी बिकट परिस्थिती मध्ये संघर्ष करात शिक्षण घ्यावं लागतं . त्यांच्याकडे यशाल गवसनी घातल्याशिवाय परत फिरयाला मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांच्या मध्ये क्रांतिकारक परिवर्तन होण्याच प्रमाण हे नक्कीच जास्त आहे .हे वास्तविक सत्य असुन हे वास्तव नाकारता येणार नाही. आपली असणारी गरीबी परस्थिती ही सतत मनाला बोचली पाहिजे.मनात सदैव सल आणि जाणिव असली पाहिजे. जणिव डोळ्यात साठवून यशाच्या दिशेने झेप घेतली पाहिजे.सिंह जसा शिकार केल्याशिवाय परत फिरत नाही तसंच यश हस्तगत केल्याशिवाय झोप लागली नाही पाहिजे. एवढी प्रचंड प्रमाणात गरीबी आपल्यला बोचली पाहिजे. गरीबी हि अपमान जनक स्थिती नाही.गरीबी म्हणजे वाईट अस पण नाही. समाजात गरीब श्रीमंत सगळेच लोक असतात गरीबी असेल तर वाईट वाटुन न घेता सतत चिकाटीने जिद्दीने इमाने इतबारे मेहनत करावी.जेणेकरून यश मिळेलच .आणि श्रीमंती असेल तर गर्व अभिमान अंहकार न बाळगता नैसर्गिक न्यायाच्या मार्गाने जीवन जगावे . फक्त योगायोगने आपल्या वाट्याला गरीबी परस्थिती आली तर प्रचंड मेहनत करून सचोटीने प्रमाणिक प्रयत्न करून न्याय मार्गाने मार्गक्रमण करून यश मिळेपर्यंत प्रयत्न करावे.जेणेकरून यशाल सुद्धा झुकाव लागलं पाहिजे एवढा आपल्या मेहनतीचा वेग अफाट आणि सुसाट असला पाहिजे. उत्कर्ष हि अवघड बाब नाही फक्त मनाला परस्थिती बोचली पाहिजे आणि परिवर्तन करण्यासाठी आपण पुर्ण पणे सज्ज झालं पाहिजे बाकी कठिण वगैरे काही नसतं . कठिण आति कठिण परिस्थितीला भेदण्याची ताकद सामर्थ्य आपण स्वतः मध्ये निर्माण केलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad