*ज्ञान समुद्राचे निर्मिते भगावान श्रीकृष्ण*
भगवान श्रीकृष्ण यांच नाव डोळ्यासमोर आलं कि त्यांची एक वेगळी प्रतिमा डोळ्यासमोर येते .आपण बालपणी पासुन फक्त तितकंच ऐकलेल असतं .पण आपण जे ऐकलं त्यावर आपण चिंतन केलं नाही वास्तविक श्रीकृष्ण हे ज्ञान भांडार होते कलयुगात जे काही विज्ञान शोध लावत आहे ते सगळे शोध त्याच मुळ श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून सांगितले होते . एकंदरीत जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान तत्त्वज्ञान याच मुळ भांडार भगवान श्रीकृष्ण यांनी निर्माण केल . ज्ञान समुद्र ज्यांच्या वाणीतुन प्रकट झाला. न्याय निती धर्म जगाला दाखवताना कर्म हेच कसं श्रेष्ठ असतं याची क्षणोक्षणी जाणीव करून देत अधर्म कितीही बलशाली असला तरी तो धर्मा समोर टिकत नाही हा कृतीशील बोध अंनत पिढ्यांना बोध व्हावा म्हणून धर्माच्या बाजुचे सारथी सारथ्य केले. मायाजाळ आणि हेवेदाव्याने भरलेल्या सृष्टीमध्ये जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करयाचे असेल तर गरज आहे ती भगवान श्रीकृष्ण यांच्या आदर्शाची, विचारांची आणि त्यांनी सांगितलेल्या पथ मार्गावर मार्गक्रमण करण्याची. जीवनात मानवाच्याच वाट्याला सुखःदुख येत असतात याला अपवाद कोणीही नाही स्वतः मी देखील नाही याची जाणीव जगाला करून देताना वेळ काळ परस्थिती ला धैर्याने सामोरे असं स्वतः अनंत दुःखाचे वाटेकरी झालेले भगवान श्रीकृष्णा यांच्या इतके सुख दुःख हे कोणत्याही व्यक्तीच्या वाट्याला आले नाहीत.जन्म तुरुंगात आणि जन्म झाल्याबरोबर खर्या आईला सोडून दुर जावे लागले दुर गेल्यानंतरही जन्मल्यापासूनच दुरवरती गोकुळामध्ये येवून दैत्य-दानव जिवावर उठत मारण्याचा प्रयत्न करु लागले तेथेही भगवतांनी आलेल्या संकटांना नष्ट करुन विजय मिळविला. पुढे प्रेम भेटले ते राधेचे तिला कायमचे सोडून मथुरेला दुष्ट कंसमामाचा वध करावयास जावे लागले तेथे मामाला मारले पण कोणताही मोह जवळ न बाळगता मथुरा सोडून दुरवर द्वारका नगरी वसवत स्वतःचे राज्य निर्माण केले. त्यामुळे कोणाचीही संपत्ती हडप करु नये हा देखील आदर्श जनांच्या समोर मांडला. पुढे नाते जपत असतांना सत्याची बाजू घेवून आत्याची मुले पांडवांना अनेक संकटातून वाचवले. द्रौपदीचे वस्त्रहरण कौरवांकडून होतांना एक भाऊ म्हणून भावाचे कर्तव्य निभवतांना द्रौपदीचे वस्त्रहरण होवू दिले नाही. पुढे युद्ध जिंकण्यासाठी हतबल झालेल्या आणि आप्तजनांच्या गुरुजनांच्या नातेसंबंधामध्ये भावनिक झालेल्या अर्जुनाला युद्धात उतरविण्यासाठी भगवतगीता सांगितली ज्यामध्ये अर्जुनासह भविष्यातील जन्म घेणार्या मानवजातीला प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने ज्ञानबोध घेवून कर्तव्य कसे निभवावे, कोणाशी कसे वागावे,आपण खरे आहोत तर तमा कशाची बाळगावी, ज्ञान काय, जन्म काय, विधी काय, मृृत्यू काय, आत्मा हा अमर असून त्याला मृत्यू कधी येत नाही यासोबत अनेक उदाहरणे देता येतील याचा सारांश या भगवद गीता नावाच्या एका ग्रंथात प्रभू श्रीकृष्णांनी दिला आहे पुढे युद्ध जिंकून दिल्यानंतरही दोष भगवान श्रीकृष्णाला गांधारीने दिला व श्राप देखील दिला त्यामुळे चांगले वागणार्या व्यक्तीला सतत अग्नीपरीक्षा द्याव्या लागतात आणि दुःख त्याच्याच वाट्याला येते हे भगवान श्रीकृष्णाच्या जिवनपटावरुन जाणवतं . इतके झाल्यानंतरही दक्षिणेत रुक्मीणीच्या मागे येवून कलियुगात कलीला पाताळी गाडून पुढे विठ्ठल बनवून दुष्ट शक्तीला संदेश दिला की जे माझे नाव घेतील त्यांना आजही कलीची छाया देखील काही बिघडवू शकणार नाही त्यामुळे कलीयुग या एकाच युगात काय तर भगवान श्रीकृष्ण 28 युगे भक्तांची मदत करणारा देव राहिला आहे. त्यामुळे नीती-ज्ञान भांडाराचा रचियेता भगवान श्रीकृष्ण यांचा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण हा एकच मंत्र भक्तगणांना संकटापासून दुर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल ही मात्र ठाम अशी शाश्वती.
हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
या नामातच इतकी प्रचंड गोडी आहे की साक्षात तहान, भुक विसरुन फक्त भगवान श्रीकृष्णाचे नामजप करावा असं वाटावं इतकी विलक्षण महती या नामाची आहे .साक्षात शुरवीर, ज्ञान भांडार, प्रेमाचे भांडार, कर्तव्य पालक धर्मरक्षक आणि सर्व भौतिक नाते संबंध ज्ञान मार्गावरून प्रभावी पणे सांभाळताना आणि देव असुन मानवी जीवन जगत असताना कुरूक्षेत्रावर युद्ध सुरु होताच कोणासाठीही न थांबत असलेल्या वेळेला देखील थांबवून पार्थ धर्नुधर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता जगासाठी प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक नातं अगदी सचोटीने प्रमाणिक आणि न्याय पुर्ण निभवताना परिपुर्ण पुरूष होण्याचं भाग्य लाभलं ते भगवान कृष्ण यांना मानवी जीवन जगत आई वडील यांच्या छळाचा बदला घेतला , अनेक दुष्ट राक्षसांचा वध केला ,बाल लिला केल्या , धर्म-अधर्माचे युद्ध रचलं, इतकेच नाही तर तेही जिंकून दिलं आणि त्यामध्ये नितीच्या बळावर धर्माचा विजय घडवला. बहीणीच नातं म्हणुन पांचाली द्रौपदीचे अब्रुरक्षण केले, सुदामाचे मित्र प्रेम सांभाळले, भगवत गीता ज्ञान प्रकट केले, पत्नी म्हणून रुक्मीणी-सत्यभामा यांना योग्य न्याय दिला तर प्रेमिका म्हणून राधेला न्याय दिला पतीधर्म म्हणून पारिजातक फुल आणण्यासाठी देव इंद्रांशी युद्ध केले व पत्नीचा हट्ट पुरवुन तिला पारिजातक स्वर्गातून आणून दिले. बंधु म्हणून बलराम मोठया भावाचा मान यथायोग्य दिला. एकंदरीत सगळ्या नातेसंबंधात अगदी जबाबदारीने भुमिका अदा करून शेवटी ‘द्वारकाधीश’ म्हणून जनतेचे कल्याण केले आणि ज्ञान व भौतिक नातेसंबंध तसेच जीवनात येणार्या सुख दुःखांचा मेळ लावत-लावत जीवन पुर्णत्वास घेऊन जात असताना कर्म करत राहा न्याय धर्म निती पालन करा सात्विक कर्म करा आणि सुख दुःखाच्या चक्रव्युहातुन बाहेर पडा ज्ञान हाच सर्व दुःखा पासुन मुक्तिचा उपाय आहे याची जाणीव जागृती जगाला निर्माण करून देण्याचं महान कार्य भगवान श्रीकृष्ण यांनी करत असताना निति न्याय न्याय याचंभांडार निर्माण केलं . भगवान श्रीकृष्ण यांनी सृष्टी कल्याणासाठी निर्माण केलेलं ज्ञान समुद्र पेक्षाही विराट असुन युगो युगे कामी पडेल एवढ अगाध आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
,9011634301